Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ganeshotsav 2026: अरे चाललंय तरी काय? बाप्पाच्या आगमन मिरवणुकीवर इमारतीतून अंडी फेकली? माझगावमध्ये दोन गटांत बाचाबाची

Ganeshotsav 2026: गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला मुंबईतील माझगाव परिसरात ‘माझगावचा मौर्य’ गणपतीच्या आगमन मिरवणुकीवर शेजारील इमारतीतून अंडी फेकल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेनंतर दोन गटांत वाद आणि बाचाबाची झाल्याने परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 04, 2026 | 05:59 PM
अरे चाललंय तरी काय? बाप्पाच्या आगमन मिरवणुकीवर इमारतीतून अंडी फेकली? माझगावमध्ये दोन गटांत बाचाबाची, पोलिसांचा फौजफाटा

अरे चाललंय तरी काय? बाप्पाच्या आगमन मिरवणुकीवर इमारतीतून अंडी फेकली? माझगावमध्ये दोन गटांत बाचाबाची, पोलिसांचा फौजफाटा

Follow Us
Follow Us:
  • मुंबईत गणपती आगमन मिरवणुकीला गालबोट!
  • ‘माझगावचा मौर्य’च्या मिरवणुकीवर अंडी फेकल्याचा आरोप
  • माझगावमध्ये दोन गटांत बाचाबाची, पोलिसांचा फौजफाटा
Ganeshotsav 2026: मुंबईतील ‘भुलेश्वरचा राजा’च्या आगमन सोहळ्याच्या मिरवणुकीत मूर्ती मंडपात आणत असताना अपघात घडल्यामुळे दोन जण जखमी झाले असून दोघांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना, ‘माझगावचा मौर्य’ गणपती मंडळाच्या आगमन मिरवणुकीच्या दिशेने शेजारील एका इमारतीतून अंडी फेकण्यात आल्याचा गंभीर आरोप मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. हे सर्व पाहता यंदाच्या गणेशोत्सवाच्या काळात चाललंय तरी काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे. (Ganeshostav 2026)

गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला मुंबईतील माझगाव परिसरात गणपती बाप्पाच्या आगमन मिरवणुकीदरम्यान तणाव निर्माण झाल्याची घटना समोर आली आहे. ‘माझगावचा मौर्य’ गणपती मंडळाच्या आगमन मिरवणुकीच्या दिशेने शेजारील एका इमारतीतून अंडी फेकण्यात आल्याचा गंभीर आरोप मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.

मुंबईची मैदानं वाचवण्यासाठी आदित्य ठाकरे मैदानात; फडणवीस सरकारला दाखवलं ‘रेड कार्ड’

इमारतीतून अंडी फेकल्याचा आरोप

‘माझगावचा मौर्य’ गणपती मंडळाचे उपसचिव विवेक राणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंडळाच्या गणपती बाप्पाची वाजतगाजत आगमन मिरवणूक काढण्यात आली होती. मोठ्या संख्येने भाविक आणि स्थानिक नागरिक या मिरवणुकीत सहभागी झाले होते. मिरवणूक मंडपाच्या दिशेने जात असताना मंडपापासून सुमारे ३० ते ४० मीटर अंतरावर असलेल्या एका इमारतीतून मिरवणुकीच्या दिशेने अंडी फेकण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकारामुळे मिरवणुकीत सहभागी भाविकांमध्ये संतापाची लाट उसळली. हा प्रकार भाविकांच्या भावना दुखावणारा असून, यामागे असलेल्या व्यक्तींवर पोलिसांनी तातडीने कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

दोन गटांत बाचाबाची

अंडी फेकल्याचा प्रकार समोर आल्यानंतर घटनास्थळी उपस्थित नागरिक आणि भाविक संतप्त झाले. त्यानंतर दोन गटांमध्ये वाद आणि बाचाबाची झाल्याचे सांगण्यात येत आहे. रस्त्यावर मोठी गर्दी असल्याने परिस्थिती आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली होती.या घटनेची माहिती मिळताच मुंबई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करून दोन्ही बाजूंच्या नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन करण्यात आले. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर गर्दी पांगवण्यात आली आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली.

सीसीटीव्ही फुटेजची तपासणी

अंडी नेमकी कोणी फेकली, ती कोणत्या इमारतीतून फेकण्यात आली आणि या घटनेमागील नेमके कारण काय होते, याचा शोध पोलीस घेत आहेत. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले जात असून त्यातून संबंधित व्यक्तींची ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरू आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ही घटना संवेदनशील असल्याने परिसरातील परिस्थितीवर पोलिसांकडून लक्ष ठेवण्यात येत आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवा किंवा अप्रमाणित माहितीवर विश्वास ठेवू नये तसेच सामाजिक सलोखा आणि शांतता कायम राखावी, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, अंडी फेकल्याबाबत मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या आरोपाची स्वतंत्रपणे पडताळणी आणि पोलीस तपास सुरू असल्याने दोषी कोण, तसेच या घटनेमागील हेतू काय होता, हे तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.

Adani Group Ganeshotsav: अंबानींनंतर अदानींचीही गणेशोत्सवात एन्ट्री! १०७ वर्षे जुन्या मंडळासोबत खास हातमिळवणी

Web Title: Ganeshotsav 2026 eggs thrown at mazgaoncha maurya ganpati arrival in mazgaon

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 24, 2026 | 11:24 AM

Topics:  

  • Ganesh Chaturthi 2026
  • Ganeshotsav
  • Ganeshotsav 2026
  • Ganpati Festival
  • Mumbai

संबंधित बातम्या

MMRDA News: कोपरी पुलावर काळजाचा ठोका चुकवणारी घटना! कारवर कोसळल्या लोखंडी सळ्या; MMRDA ने ठोठावला २ कोटींचा दंड
1

MMRDA News: कोपरी पुलावर काळजाचा ठोका चुकवणारी घटना! कारवर कोसळल्या लोखंडी सळ्या; MMRDA ने ठोठावला २ कोटींचा दंड

Mumbai Hotel Price Hike: हॉटेलमध्ये खाणं आता महागणार! इडली, डोसा ते जेवणाच्या थाळीपर्यंत दरवाढ; ‘आहार’ संघटनेचे मोठे संकेत
2

Mumbai Hotel Price Hike: हॉटेलमध्ये खाणं आता महागणार! इडली, डोसा ते जेवणाच्या थाळीपर्यंत दरवाढ; ‘आहार’ संघटनेचे मोठे संकेत

Mumbai Credit Card: सणासुदीच्या खरेदीत मुंबईकर देशात अव्वल! क्रेडिट कार्डचा सर्वाधिक वापर; ७७ टक्के शहरी भारतीयांचा खर्च वाढला
3

Mumbai Credit Card: सणासुदीच्या खरेदीत मुंबईकर देशात अव्वल! क्रेडिट कार्डचा सर्वाधिक वापर; ७७ टक्के शहरी भारतीयांचा खर्च वाढला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.