Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

OLA-Uber सारख्या केंद्र सरकार टॅक्सी सेवा सुरू करणार, कॅब चालकांना मिळणार थेट नफा; अमित शाहांची मोठी घोषणा

Govt to launch Sahkar Taxi : केंद्र सरकारकडून लवकरच आता ओला आणि उबर सारखी टॅक्सी सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत घोषणा केली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Mar 27, 2025 | 12:21 PM
OLA-Uber सारख्या केंद्र सरकार टॅक्सी सेवा सुरू करणार

OLA-Uber सारख्या केंद्र सरकार टॅक्सी सेवा सुरू करणार

Follow Us
Close
Follow Us:

Govt to launch Sahkar Taxi in Marathi : गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत मोठी घोषणा केली आहे. सरकारच्या प्रयत्नांनी लवकरच सहकारी टॅक्सी सेवा सुरू होणार असल्याची माहिती अमित शाह यांनी संसदेत दिली. याअंतर्गत कार, ऑटो आणि बाईक टॅक्सी चालकांसाठी फायद्याची बातमी असून यातून मिळणारा संपूर्ण नफा थेट ड्रायव्हरला जाईल आणि त्याच्याकडून कोणतेही कमिशन घेतले जाणार नाही. अमित शहा हे सहकार मंत्रालय देखील सांभाळतात आणि यासंबंधी एका प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी संसदेत ही माहिती दिली. अमित शहा म्हणाले की, आतापर्यंत अशा टॅक्सी सेवांमधून मिळणारे कमिशन श्रीमंत लोकांच्या हातात जायचे आणि ड्रायव्हर बेरोजगार राहायचे. आता हे होणार नाही आणि एक सहकारी टॅक्सी सुरू करण्यात येईल, ज्यामुळे चालकांना त्यांचा थेट नफा मिळण्यास मदत होईल.

माजी मुख्यमंत्र्यांच्या घरी सीबीआयकडून छापेमारीची कारवाई; दिल्लीसह छत्तीसगडमध्येही धाड

अमित शहा काय म्हणाले…

अमित शहा यांनी बुधवारी लोकसभेत त्रिभुवन सहकारी विद्यापीठाच्या स्थापनेशी संबंधित विधेयकावरील चर्चेला उत्तर दिले. यावेळी अमित शहा यांनी सहकार मंत्रालयाची स्थापना आणि त्यानंतर मंत्रालयाने केलेल्या कामांची माहिती दिली. याच प्रश्नाला उत्तर देताना अमित शाह यांनी सांगितले की, “सरकार येत्या काही महिन्यांत ओला-उबर सारखे सहकारी टॅक्सी प्लॅटफॉर्म सुरू करणार आहे. तसेच दुचाकी, रिक्षा आणि चारचाकी वाहनांची नोंदणी देखील करण्यात येणार आहे. त्याचा नफा कोणत्याही श्रीमंत लोकांच्या हातात जाणार नाही…, तर थेट ड्रायव्हरकडे जाईल.”

यावेळी अमित शहा म्हणाले, ‘सहकारातून समृद्धीचा नारा हा केवळ एक नारा नाही तर आम्ही तो प्रत्यक्षात अंमलात आणला आहे. काही महिन्यांत सहकारी टॅक्सी सेवा येत आहे. ही सहकारी सेवा चारचाकी वाहने, ऑटो आणि दुचाकी वाहनांची नोंदणी करेल. या टॅक्सी सेवेत नोंदणी केल्यानंतर, संपूर्ण फायदा थेट ड्रायव्हरला मिळेल. मोठा भाग कोणत्याही श्रीमंत माणसाच्या हातात जाणार नाही. त्यांनी सांगितले की लवकरच एक सहकारी विमा कंपनी देखील येणार आहे. लवकरच ही देशातील सर्वात मोठी विमा कंपनी बनेल. खरं तर, उबर आणि ओला सारख्या कंपन्यांच्या सहकार्याने टॅक्सी चालवणाऱ्या चालकांना त्यांच्या कमाईचा काही भाग द्यावा लागतो. सबस्क्रिप्शन फी भरावी लागते आणि ड्रायव्हर्सना प्रत्येक राईडवर कंपनीला एक निश्चित कमिशन देखील द्यावे लागते.

सहकारी टॅक्सी सेवांमुळे, दिल्ली, मुंबई, लखनऊ, पटना, कोलकाता, चेन्नई, हैदराबाद आणि बेंगळुरूसारख्या शहरांमध्ये वाहतूक व्यवस्थेत मोठी सुधारणा होऊ शकते. आतापर्यंत लोकांना ओला आणि उबर सारख्या टॅक्सी सेवांवर अवलंबून राहावे लागत होते. सुरुवातीच्या टप्प्यात या टॅक्सी सेवांमुळे चालकांना खूप फायदा झाला, परंतु आता कंपन्यांनी त्यांचे कमिशन वाढवले ​​आहे. अशा परिस्थितीत टॅक्सी सेवेतून होणाऱ्या नफ्यात चालकांचा वाटा लक्षणीयरीत्या कमी झाला आहे. याकडे लक्ष वेधत अमित शहा म्हणाले की, आता टॅक्सी सेवेचा नफा श्रीमंतांकडे जाणार नाही तर त्याचा पूर्ण फायदा चालकांना मिळेल.

ओला आणि उबरच्या अडचणी वाढणार..

सहकारी टॅक्सी सेवा सुरू झाल्यानंतर ओला-उबेर सारख्या राइड-हेलिंग प्लॅटफॉर्म प्रदान करणाऱ्या कंपन्यांच्या समस्या वाढण्याची शक्यता आहे. या सहकारी प्रणालीमुळे लोकांना कमी किमतीत प्रवासाची सुविधा मिळेल, असा विश्वास आहे. याशिवाय या खाजगी कंपन्या लहान प्रवासासाठीही ग्राहकांकडून मनमानी दर आकारतात आणि कमिशनच्या नावाखाली चालकांना कमी पैसे देतात. कॅब चालक दररोज याबद्दल तक्रार करत राहतात. तसेच सरकारने अद्याप हे सहकारी टॅक्सी प्लॅटफॉर्म कसे काम करेल हे स्पष्ट केलेले नाही.

Rahul Gandhi News: लोकसभेत विरोधकांना बोलू दिलं जात नाही; राहुल गांधींचा ओम बिर्लांवर थेट आरोप

Web Title: Ola uber uber ola new competitor government to launch sahkar taxi that will benefit drivers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 27, 2025 | 12:21 PM

Topics:  

  • Amit Shah
  • india
  • taxi

संबंधित बातम्या

कोण चालवत आहे संपूर्ण जग? २०२५ मध्ये ‘हे’ आहेत जगातील सर्वात शक्तिशाली देश; यादीत भारताचे स्थान काय?
1

कोण चालवत आहे संपूर्ण जग? २०२५ मध्ये ‘हे’ आहेत जगातील सर्वात शक्तिशाली देश; यादीत भारताचे स्थान काय?

Viral Video: “याला म्हणतात खरी जिद्द…”, दोन्ही हात नाही तरी चालवली बाईक, गाडी चालवण्याची पद्धत पाहून व्हाल अवाक्
2

Viral Video: “याला म्हणतात खरी जिद्द…”, दोन्ही हात नाही तरी चालवली बाईक, गाडी चालवण्याची पद्धत पाहून व्हाल अवाक्

Defence Policy : पाकिस्तानविरोधात भारताचा आक्रमक पवित्रा; ‘New Normal’ सिद्धांतामुळे CISS ने व्यक्त केली युद्धाची भीती
3

Defence Policy : पाकिस्तानविरोधात भारताचा आक्रमक पवित्रा; ‘New Normal’ सिद्धांतामुळे CISS ने व्यक्त केली युद्धाची भीती

JD Busted : ‘तुम्ही उषाला भारतात पाठवा!’ Vance यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर सोशल मीडियावर हल्ला; ‘ढोंगी’ म्हणून निषेध
4

JD Busted : ‘तुम्ही उषाला भारतात पाठवा!’ Vance यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर सोशल मीडियावर हल्ला; ‘ढोंगी’ म्हणून निषेध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.