Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Andaman Military Project: भारताने आवळला चीनचा गळा; ग्रेट निकोबार 10 अब्ज डॉलर्सच्या महाप्रकल्पामुळे ड्रॅगॉनच्या पोटात गोळा

ग्रेट निकोबार आयलंड (GNI) प्रकल्प २०२१ मध्ये नीती आयोगाने सुरू केला होता. त्याचे उद्दिष्ट आंतरराष्ट्रीय कंटेनर ट्रान्सशिपमेंट टर्मिनल (ICTT), ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय विमानतळ, टाउनशिप आणि गॅस-सोलर पॉवर प्लांट बांधणे आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Jan 25, 2026 | 01:29 PM
great nicobar project strategic importance india china malacca strait 2026

great nicobar project strategic importance india china malacca strait 2026

Follow Us
Follow Us:
  • चीनच्या ‘मानेवर’ भारताचा हात
  • आंतरराष्ट्रीय विरोधाचा कट
  • न बुडणारे विमानवाहू जहाज’

Great Nicobar Project strategic importance 2026 : जागतिक राजकारणात ज्या बेटांना भारताचे “न बुडणारे विमानवाहू जहाज” (Unsinkable Aircraft Carrier) मानले जाते, त्या अंदमान आणि निकोबार द्वीपसमूहात (Andaman and Nicobar) सध्या एक मोठी क्रांती घडत आहे. ‘नीती आयोगा’ने २०२१ मध्ये सुरू केलेला आणि आता २०२६ मध्ये निर्णायक टप्प्यावर असलेला ‘ग्रेट निकोबार आयलंड’ (GNI) प्रकल्प केवळ भारताचे भविष्यच नाही, तर संपूर्ण दक्षिण-पूर्व आशियातील सत्तेचे समीकरण बदलणारा ठरणार आहे. मात्र, जसा भारताचा (India) अणुकार्यक्रम थांबवण्यासाठी ३० वर्षांपूर्वी प्रयत्न झाले होते, तसेच काहीसे आता या प्रकल्पाबाबत होताना दिसत आहे.

ग्रेट निकोबार: चीनची सर्वात मोठी कमजोरी (Malacca Dilemma)

जगातील ८०% तेल व्यापार आणि चीनचा बहुतांश व्यापार ‘मलाक्का सामुद्रधुनी’ (Strait of Malacca) या अरुंद सागरी मार्गातून होतो. भारताचे इंदिरा पॉईंट या सामुद्रधुनीच्या प्रवेशद्वारापासून अवघ्या १४०-१५० किलोमीटर अंतरावर आहे. जर भारताने ग्रेट निकोबारमध्ये आपले लष्करी सामर्थ्य वाढवले, तर युद्धाच्या स्थितीत भारत चीनचा श्वास रोखू शकतो. याच ‘मलाक्का डिलेमा’मुळे चीन सध्या प्रचंड अस्वस्थ आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :  Article 5 : इतिहासाची थट्टा! 9/11 नंतरच्या मदतीवर ट्रम्प यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यामुळे जॉर्जियो मेलोनी आक्रमक

काय आहे हा ७२,००० कोटींचा प्रकल्प?

हा प्रकल्प केवळ सिमेंट-काँक्रीटचे बांधकाम नाही, तर तो भारताच्या सामरिक आणि आर्थिक शक्तीचे प्रदर्शन आहे. यात मुख्यत्वे चार गोष्टींचा समावेश आहे: १. आंतरराष्ट्रीय कंटेनर ट्रान्सशिपमेंट टर्मिनल (ICTT): गॅलेथिया बे येथे बांधले जाणारे हे बंदर सिंगापूर आणि कोलंबो बंदरांना थेट टक्कर देईल. २. ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय विमानतळ: हे विमानतळ नागरी वापरासोबतच लष्करी विमानांसाठी ‘बेस’ म्हणून काम करेल. ३. टाऊनशिप आणि स्मार्ट सिटी: या बेटावर ५०,००० हून अधिक रोजगाराच्या संधी निर्माण करणारी आधुनिक शहरे. ४. गॅस आणि सौर ऊर्जा प्रकल्प: बेटाला स्वावलंबी बनवण्यासाठी ४५० MVA क्षमतेचा हायब्रीड पॉईंट.

This map tells you exactly why China, Pakistan & Sonia Gandhi are against the Great Nicobar Island Project. By developing Great Nicobar into a deep-sea port, airport, and military hub, India gains a vital strategic foothold just 160 km from the Malacca Strait, a vital chokepoint… https://t.co/vNNUMzubqD pic.twitter.com/6pNkI5lOaa — Savitri Mumukshu – सावित्री मुमुक्षु (@MumukshuSavitri) September 9, 2025

credit – social media and Twitter

प्रकल्पाला विरोध करणारी ‘इको-सिस्टम’ आणि परकीय कट

गेल्या काही महिन्यांपासून डझनभर पर्यावरणवादी, कार्यकर्ते आणि काही राजकीय नेत्यांनी या प्रकल्पाविरुद्ध मोहीम उघडली आहे. त्यांचा मुख्य युक्तिवाद ‘जंगलतोड’ आणि ‘आदिवासींचे हक्क’ हा आहे. मात्र, तज्ज्ञांच्या मते हा विरोध नैसर्गिक नसून प्रायोजित आहे. चीन आणि काही पाश्चात्य शक्तींना भारताचे हिंदी महासागरातील वर्चस्व मान्य नाही. अमेरिकन कार्यकर्ते आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रांमधून याच्या विरोधात लिहित आहेत, तर बांगलादेशसारखे देश चीनच्या इशाऱ्यावर याला ‘प्रादेशिक धोका’ म्हणत आहेत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Syria Ceasefire : सीरियात 15 दिवसांची ‘शांतता’! 9,000 ISIS दहशतवाद्यांच्या नशिबाचा फैसला होणार; अमेरिकेचा मोठा प्लॅन

सुरक्षा आणि पर्यावरण: संतुलन की गरज?

हे खरे आहे की या प्रकल्पामुळे काही लाख झाडे तोडली जातील, परंतु राष्ट्रीय सुरक्षेचा विचार करता हा त्याग अपरिहार्य आहे. चीन ज्या गतीने म्यानमारच्या ‘कोको आयलंड’वर तळ उभारत आहे आणि श्रीलंकेत ‘हंबनतोता’ बंदर विकसित करत आहे, ते पाहता भारताने अंदमानमध्ये निष्क्रिय राहणे आत्मघातकी ठरेल. ३०-४० वर्षांपूर्वीच्या उदासीनतेमुळे आपण आज लढाऊ विमानांच्या कमतरतेला तोंड देत आहोत, तीच चूक पुन्हा करणे देशाला परवडणारे नाही.

💡

Frequently Asked Questions

  • Que: ग्रेट निकोबार प्रकल्प भारतासाठी का महत्त्वाचा आहे?

    Ans: हा प्रकल्प भारताला मलाक्का सामुद्रधुनीवर नियंत्रण मिळवून देतो, जिथून जगातील ९०% व्यापार होतो. यामुळे भारताची सामरिक आणि आर्थिक ताकद प्रचंड वाढणार आहे.

  • Que: या प्रकल्पाचा चीनवर काय परिणाम होईल?

    Ans: चीनचा ८०% तेल व्यापार मलाक्का मार्गे होतो. भारताने येथे लष्करी तळ उभारल्यास युद्धाच्या काळात भारत चीनची पुरवठा साखळी तोडू शकतो.

  • Que: पर्यावरणवादी याला विरोध का करत आहेत?

    Ans: झाडांची कत्तल आणि शोम्पेन व निकोबारी जमातींच्या विस्थापनाचा मुद्दा पुढे केला जात आहे, मात्र सरकार यावर पर्यायी वनीकरण आणि विशेष आदिवासी धोरण राबवत आहे.

Web Title: Great nicobar project strategic importance india china malacca strait 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 25, 2026 | 01:29 PM

Topics:  

  • andman and nicobar
  • China
  • india
  • international news

संबंधित बातम्या

Iran-US Tension : अमेरिका तयार ;UN मध्ये इराणसोबत चर्चा होऊ शकते?
1

Iran-US Tension : अमेरिका तयार ;UN मध्ये इराणसोबत चर्चा होऊ शकते?

Itel A300C Launch: वारंवार चार्जिंगची कटकट संपणार? 12GB पर्यंत RAM, Android 16 Go अन्…; 6000mAh बॅटरीसह itel A300C बाजारात
2

Itel A300C Launch: वारंवार चार्जिंगची कटकट संपणार? 12GB पर्यंत RAM, Android 16 Go अन्…; 6000mAh बॅटरीसह itel A300C बाजारात

World News : महाकाय जहाजाची छोट्या बोटीला धडक! सिंगापूरजवळ समुद्रात थरारक अपघात कॅमेऱ्यात कैद
3

World News : महाकाय जहाजाची छोट्या बोटीला धडक! सिंगापूरजवळ समुद्रात थरारक अपघात कॅमेऱ्यात कैद

World News : ‘रेअर अर्थ’चा दबाव! शींच्या भेटीआधी ट्रम्प नरमले
4

World News : ‘रेअर अर्थ’चा दबाव! शींच्या भेटीआधी ट्रम्प नरमले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.