
operation sindoor indian air force defeat pakistan swiss think tank report 2026
Operation Sindoor India Pakistan air war news : भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या (Republic Day 2026) मुहूर्तावर भारतीय हवाई दलाच्या शौर्याची एक अशी गाथा समोर आली आहे, ज्याने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. स्वित्झर्लंडमधील प्रसिद्ध सैन्य थिंक टँक ‘सेंटर डी’हिस्टोअर एट डी प्रॉस्पेक्टिव्हज मिलिटेअर्स’ (CHPM) ने आपल्या ताज्या अहवालात ‘ऑपरेशन सिंदूर’चा (Operation Sindoor) थरार उघड केला आहे. या अहवालात दावा करण्यात आला आहे की, गेल्या वर्षी झालेल्या हवाई युद्धात भारताने पाकिस्तानचा असा मानहानीकारक पराभव केला की, पाकिस्तानला केवळ एका दिवसात युद्धबंदीसाठी विनंती करावी लागली.
या संघर्षाची ठिणगी २२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर पडली होती. भारताने या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी ‘ऑपरेशन सिंदूर’ आखले. ९ आणि १० मे च्या रात्री जेव्हा पाकिस्तानी हवाई दलाने (PAF) आदमपूर आणि श्रीनगर तळांवर ९०० हून अधिक ड्रोन आणि पीएल-१५ क्षेपणास्त्रांच्या साहाय्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा भारतीय हवाई दलाने (IAF) आपले अजेय सामर्थ्य जगाला दाखवून दिले. भारताच्या S-400 हवाई संरक्षण प्रणालीने पाकिस्तानचे बहुतेक धोके हवेतच नष्ट केले.
हे देखील वाचा : Republic Day 2026: कर्तव्यपथावर भारताचा ‘रुद्रावतार’! 21 तोफांची सलामी, 29 फायटर जेट अन् जग पाहणार महासत्तेच्या शक्तीचे भव्य दर्शन
भारतीय हवाई दलाच्या राफेल आणि मिराज-२००० विमानांनी सीमेपलीकडे जाऊन बहावलपूरमधील जैश-ए-मोहम्मद आणि मुरीदके येथील लष्कर-ए-तैयबाच्या मुख्य तळांना लक्ष्य केले. या हल्ल्यात दहशतवाद्यांचे कंबरडे तर मोडलेच, पण पाकिस्तानच्या लष्करी पायाभूत सुविधांचेही अतोनात नुकसान झाले. भारताच्या अचूक नेमबाजीमुळे पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थांचे कमांड सेंटर पत्त्याच्या बंगल्यासारखे कोसळले.
No better day but our #RepublicDay2026 for this to come out. A detailed assessment by the Switzerland’s Centre for Military History and Perspective Studies (CHPM) concludes that during Operation Sindoor in May, 2025, the Indian Air Force decisively achieved air superiority over… pic.twitter.com/51qcQS8Nrp — Mahesh Jethmalani (@JethmalaniM) January 26, 2026
credit – social media and Twitter
१० मे च्या सकाळी भारताने ‘ब्रह्मोस’ आणि ‘स्कॅल्प-ईजी’ (SCALP-EG) सारख्या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांचा पाऊस पाडला. या हल्ल्याचा मुख्य उद्देश पाकिस्तानची प्रतिकार करण्याची क्षमता संपवणे हा होता. अवघ्या काही मिनिटांत पाकिस्तानची रडार केंद्रे निकामी झाली. पाकिस्तानच्या प्रमुख हवाई तळांवरील धावपट्ट्या (Runways) उद्ध्वस्त झाल्यामुळे त्यांची लढाऊ विमाने उड्डाणच करू शकली नाहीत. अहवालानुसार, जेव्हा पाकिस्तानी जनरलना कळाले की त्यांच्याकडे आता स्वतःचा बचाव करण्यासाठी कोणतेही साधन उरले नाही, तेव्हा त्यांनी तातडीने दिल्लीशी संपर्क साधून युद्धबंदीची याचना केली.
हे देखील वाचा : Padma Award 2026: तामिळनाडूत १३. बंगालमध्ये ११ पद्म पुरस्कार…; पाच राज्यांच्या निवडणुकांपूर्वी केंद्र सरकारची तिरपी चाल
स्विस थिंक टँकने आपल्या अहवालात नमूद केले आहे की, पाकिस्तानने चीनकडून घेतलेली प्रगत क्षेपणास्त्रे भारताच्या रशियन आणि फ्रेंच बनावटीच्या संरक्षण प्रणालीपुढे कुचकामी ठरली. भारतीय वैमानिकांचे कौशल्य आणि वेळेवर घेतलेले धाडसी निर्णय यामुळेच भारताने एक मोठे युद्ध टाळून पाकिस्तानला धडा शिकवला. या विजयामुळे दक्षिण आशियातील भारताचे लष्करी वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
Ans: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर आणि लष्करी तळांवर केलेल्या मोठ्या हवाई हल्ल्याला 'ऑपरेशन सिंदूर' असे नाव दिले आहे.
Ans: भारताने पाकिस्तानची रडार यंत्रणा, कमांड सेंटर्स आणि हवाई तळांच्या धावपट्ट्या उद्ध्वस्त केल्यामुळे पाकिस्तानची लढण्याची क्षमता संपली होती.
Ans: भारताने प्रामुख्याने राफेल (Rafale) आणि मिराज-२००० (Mirage-2000) लढाऊ विमानांचा तसेच ब्रह्मोस आणि स्कॅल्प क्षेपणास्त्रांचा वापर केला.