Republic Day 2026: २१ तोफांची सलामी आणि २९ लढाऊ विमाने: प्रजासत्ताक दिनी ५ पहिले उड्डाणे ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
Republic Day 2026 Delhi highlights Marathi : आज संपूर्ण देश ७७ वा प्रजासत्ताक दिन (Republic Day 2026) मोठ्या अभिमानाने आणि उत्साहात साजरा करत आहे. राजधानी दिल्लीतील ‘कर्तव्यपथावर’ आज केवळ लष्करी संचलन झाले नाही, तर एका नव्या आणि शक्तिशाली भारताचे दर्शन जगाला घडले. यावर्षीचा सोहळा अनेक अर्थांनी ऐतिहासिक ठरला असून, त्यात अनेक गोष्टी पहिल्यांदाच पाहायला मिळाल्या. ‘वंदे मातरम’ या गीताच्या १५० व्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित या सोहळ्याने भारतीयांची छाती अभिमानाने फुलून आली आहे.
दशकांपासून प्रजासत्ताक दिनी २१ तोफांची सलामी देण्यासाठी ब्रिटिशकालीन ‘२५-पाऊंडर’ तोफांचा वापर केला जात असे. मात्र, यावर्षी भारताने पूर्णपणे स्वदेशी बनावटीच्या १०५ मिमी लाईट फील्ड गन (LFG) वापरून एक नवा इतिहास रचला. ५२ सेकंदात २१ गोळ्या झाडून या तोफांनी भारताच्या ‘आत्मनिर्भर’ संरक्षण शक्तीची ओळख करून दिली. हे केवळ एक शस्त्र नसून, संरक्षण क्षेत्रात भारताने मिळवलेल्या स्वावलंबनाचे प्रतीक आहे.
हे देखील वाचा : २६ जानेवारीला लहान मुलांच्या भाषणासाठी ‘हे’ प्रभावी मुद्दे, ५ मिनिटांचे भाषण ऐकून सारेच करतील कौतुक
परंपरेनुसार होणाऱ्या संचलनात यावर्षी मोठा बदल करण्यात आला. भारतीय लष्कराच्या तुकड्यांनी पहिल्यांदाच ‘बॅटल ॲरे’ (Phased Battle Array) फॉरमॅटमध्ये मार्च केला. यामध्ये सैनिक त्यांच्या नियमित गणवेशाऐवजी युद्धभूमीवर वापरल्या जाणाऱ्या आधुनिक गिअर, कॉम्बॅट ड्रेस आणि शस्त्रास्त्रांसह उतरले होते. भारताची युद्धसज्जता किती प्रगत आहे, याचा संदेश या माध्यमातून शत्रू राष्ट्रांना देण्यात आला.
यावर्षीच्या परेडचे सर्वात मोठे आकर्षण ठरले ते म्हणजे ‘भैरव लाईट कमांडो’ (Bhairav Light Commando) बटालियन. ऑक्टोबर २०२५ मध्ये स्थापन झालेल्या या विशेष युनिटने पहिल्यांदाच कर्तव्यपथावर संचलन केले. हे कमांडो शहरी भागातील सर्जिकल स्ट्राईक आणि कठीण भौगोलिक परिस्थितीत मोहिमा फत्ते करण्यासाठी विशेष प्रशिक्षित आहेत. त्यांचे काळे गणवेश आणि अत्याधुनिक उपकरणांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले.
गणतंत्र दिवस हमारी स्वतंत्रता, संविधान और लोकतांत्रिक मूल्यों का सशक्त प्रतीक है। यह पर्व हमें एकजुट होकर राष्ट्र निर्माण के संकल्प के साथ आगे बढ़ने की नई ऊर्जा और प्रेरणा देता है। पारतन्त्र्याभिभूतस्य देशस्याभ्युदयः कुतः। अतः स्वातन्त्र्यमाप्तव्यमैक्यं स्वातन्त्र्यसाधनम्॥ pic.twitter.com/i0XjjgL38x — Narendra Modi (@narendramodi) January 26, 2026
credit – social media and Twitter
हवाई दलाच्या २९ लढाऊ विमानांनी यावर्षी आकाशात थरार निर्माण केला. राफेल, तेजस आणि सुखोई-३० सारख्या विमानांनी पहिल्यांदाच ‘वज्र’ आणि ‘सिंदूर’ यांसारखी गुंतागुंतीची फॉर्मेशन्स तयार केली. ‘ऑपरेशन सिंदूर’ च्या यशाला समर्पित असलेल्या या एअर शोमध्ये भारतीय वैमानिकांनी आपल्या कौशल्याचे दर्शन घडवले. स्वदेशी बनावटीचे ‘प्रचंड’ हेलिकॉप्टरही या ताफ्यात सामील होते.
गणतंत्र दिवस की पूर्व संध्या पर राष्ट्रपति जी ने देश के नाम एक अत्यंत प्रेरणादायी संबोधन दिया है। उन्होंने हमारे संविधान की विशेषता को रेखांकित करते हुए उस सामूहिक भावना की सराहना की, जिसने हमारे राष्ट्र को निरंतर आगे बढ़ाया है। उनका यह संबोधन हर देशवासी को लोकतंत्र को सशक्त… https://t.co/eZkhkOZHdk — Narendra Modi (@narendramodi) January 25, 2026
credit – social media and Twitter
हे देखील वाचा : तिरंग्याचा सन्मान, संविधानाचा अभिमान…! प्रजासत्ताक दिनानिमित्त नातेवाईक आणि प्रियजनांना पाठवा भक्तिमय शुभेच्छा
राजनैतिक दृष्टीनेही हा प्रजासत्ताक दिन महत्त्वाचा ठरला. पहिल्यांदाच युरोपियन युनियनचे (EU) दोन प्रमुख नेते – युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन आणि युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष अँटोनियो कोस्ट एकाच वेळी मुख्य पाहुणे म्हणून उपस्थित राहिले. यामुळे भारत आणि युरोपमधील आर्थिक आणि धोरणात्मक संबंधांना नवी उंची मिळाली आहे. याशिवाय, १०,००० विशेष पाहुण्यांमध्ये ४० देशांतील बौद्ध भिक्षू, आत्मनिर्भर भारत योजनेचे लाभार्थी आणि ‘वीर गाथा’ विजेते विद्यार्थी यांची उपस्थिती या सोहळ्याला ‘लोकसहभाग’ (People’s Participation) या संकल्पनेत गुंफणारी ठरली.
Ans: युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन आणि युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा हे या वर्षीचे मुख्य पाहुणे होते.
Ans: 'वंदे मातरमची १५० वर्षे' आणि 'समृद्धीचा मंत्र - आत्मनिर्भर भारत' ही यावर्षीची अधिकृत थीम होती.
Ans: ही भारतीय लष्कराची नवीन विशेष तुकडी आहे, जी प्रामुख्याने शहरी भागातील विशेष मोहिमांसाठी (Special Operations) प्रशिक्षित आहे.






