Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वाराणसी रेल्वेस्थानकात अग्नीतांडव; पार्किंगमधील तब्बल 200 वाहने जळून खाक

वाराणसी कॅंट रेल्वे स्थानकाच्या वाहन पार्किंगमध्ये काल रात्री भीषण आग लागली. या आगीत तब्बल 200 हून अधिक दुचाकी वाहने जळून खाक झाली आहेत. या घटनेचा तपास पोलिस, रेल्वेकडून सुरु करण्यात आला आहे.

  • By नारायण परब
Updated On: Nov 30, 2024 | 07:37 PM
फोटो सौजन्य- सोशल मीडिया

फोटो सौजन्य- सोशल मीडिया

Follow Us
Close
Follow Us:

शुक्रवारी (काल दि. 29 नोव्हेंबर) रात्री  उत्तर प्रदेशातील वाराणसी कॅंट रेल्वे स्थानकाच्या वाहन पार्किंग परिसरामध्ये भीष आग लागल्याने तब्बल 200 हून अधिक दुचाकी वाहने जळून खाक झाल्या आहेत. फायर ब्रिगेडने येथे तात्काळ पोहचत शर्थीचे प्रयत्न करत आग नियंत्रणात आणली. रिपोर्ट्नुसार सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही आहे. येथे आग विझवण्यासाठी सुमारे 12 अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या होत्या. जीआरपी, आरपीएफ, रेल्वे आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने या  घटनेचा तपास सुरू केला आहे.

Pune Crime News: ज्वेलर्सच्या दुकानात खरेदीला गेले, गळ्यात सोनसाखळी घातली अन् थेट…

शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागल्याचे प्राथमिक निष्कर्ष काढला जात असून या ठिकणी फॉरेन्सिक पथक दाखल झाले असून त्यांनी  पुरावे गोळा केले आहेत. प्रयागराज जीआरपीचे एसपी अभिषेक यादव यांनी आज  सकाळी घटनास्थळाची पाहणी केली, आगीमध्ये झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला आणि घटनेची माहिती गोळा केली आहे. जीआरपी एसपीनी अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक (एडीआरएम) आणि वाराणसी कॅन्ट स्टेशन संचालक यांच्यासोबत बैठकही बोलावली आहे.

More than 200 bikes and scooters of railway employees were burnt to ashes due to a sudden fire caused by a short circuit in the parking lot of Varanasi Cantt Railway Station in UP. This accident happened at 3 am. 6 fire brigade vehicles extinguished the fire after hours of effort pic.twitter.com/ItdxIAdNa1

— Siraj Noorani (@sirajnoorani) November 30, 2024

व्हिडिओ व्हायरल

या भीषण अग्नीतांडवाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये फायर ब्रिगेड आणि पोलीस विभागाचे अधिकारी आग विझवण्यात गुंतले असताना पार्किंग परिसरात मोठी आग असल्याचे दिसत आहे. तसेच त्यासोबतच्या फोटोमध्ये असंख्य दुचाकी भस्मसात झाल्याचे दिसत आहे.

Navi Mumbai : क्रूरतेचा कळस! घरासमोर विष्ठा केल्याच्या वादात नऊ महिन्याच्या मुलावर कुऱ्हाडीने वार

रेल्वे स्थानकावर लागलेल्या आगीसंबंधी रेल्वे कर्मचाऱ्याने सांगितले  की,  “मी माझी बाईक रेल्वे स्थानक पार्किंगमध्ये सकाळी 12 च्या सुमारास उभी केली होती. तेथील एका व्यक्तीने मला सांगितले की रात्री 11 च्या सुमारास एक शॉर्ट सर्किट आधीच झाले होते आणि ते काही वेळातच दुरुस्त करण्यात आले, मात्र  काही तासांनंतर, एका प्रवाशाने मला सांगितले की तेथे खूप मोठा अपघात झाला आहे. बाहेर आग लागली. मी माझी बाईक बाहेर काढली आणि ती दुसऱ्या बाजूला उभी केली. काही वेळातच आग संपूर्ण पार्किंगमध्ये पसरली,”

या अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार दोन तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली गेली.

या आगीत रेल्वे स्थानकाच्या जवळ असलेल्या चाइल्ड लाईन कार्यालयाचेही मोठे नुकसान झाले असून फर्निचर, एसी युनिट आणि इतर उपकरणे जळून खाक झाली आहेत.

 

Web Title: Over 200 vehicles gutted in fire at varanasi railway station parking lot

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 30, 2024 | 07:37 PM

Topics:  

  • varanasi

संबंधित बातम्या

PM Modi: वाराणसीतून पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल; म्हणाले, “Operation Sindoor मुळे यांच्या…”
1

PM Modi: वाराणसीतून पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल; म्हणाले, “Operation Sindoor मुळे यांच्या…”

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.