घरासमोर विष्ठा केल्याच्या वादात नऊ महिन्याच्या मुलावर कुऱ्हाडीने वार (फोटो सौजन्य : x)
Navi Mumbai Crime News : नवी मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बेलापुर गावात महिला आणि एका इस्माच्या वादात त्या इसमाने महिलेवर कुऱ्हाडीने वार केला. सदर वार तिच्या नऊ महिन्याच्या मुलाच्या डोक्यासह,कपाळ व नाकावर लागल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. जखमी मुलावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र या घटनेमुळे बेलापुर गावात खळबळ उडाली आहे.
बेलापूर गावातील स्मशान भूमी समोरील एका झोपडपट्टीतील एक महिला व एका इसमात वाद होते. या आधीही त्यांचे अनेक खटके उडाले असून सदर इसमाने या याधी या महिलेला एका लोखंडी रॉड ने मारले असल्याची माहिती समोर येत आहे. २८ तारखेला देखील या दोघात पुन्हा एकदा भांडण झाले.मात्र सदर भांडण हे 2 वर्षीय मुलाने घरासमोर विष्ठा केल्याने म्हणून झाले असल्याचे कारण दीले आहे. या भांडणात आरोपीने सदर महीलेवर कुऱ्हाडीने वार केला असता सदर वार तिच्या हातातील नऊ महिन्याच्या मुलाच्या डोक्यासह, कपाळ व नाकावर लागून तो जबर जखमी झाला आहे. दरम्यान सदर आरोपीवर एनआरआय सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला असून तो फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. बेलापूर गावात अशा घटना पुन्हा घडू नये म्हणून गावात बीट पोलीस गस्त वाढवण्याची मागणी ग्रामस्थांकडून जोर धरत आहे.
बाळावर वार करणारा आरोपी फरार असून त्याच्याविरोधात सागरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमध्ये जखमी झालेल्या नऊ महिन्याच्या बालकावर सध्या उपचार उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर परिसरात तणावाची स्थिती असून बाळावर वार झाल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहेत.
शेजाऱ्यात क्षुल्लक कारणावरून वाद झाला. या वादानंतर दोन्ही शेजाऱ्यात मोठा वाद झाला. या वादादरम्यान शेजारी कुऱ्हाड घेऊन घरात शिरला. त्यानंतर या शेजाऱ्याने रागाच्या भरात थेट चिमुकल्या बाळावर कुऱ्हाडीने वार केला. या हल्ल्यात चिमुकला गंभीर जखमी झाला. त्यानंतर या चिमुकल्याला जीव वाचवण्यासाठी आई धावली. आईने चिमुकल्याला कवटाळून हल्लेखोराचा हल्ला परतवून लावला. त्यानंतर हल्लेखोर शेजाऱ्याने पळ काढला. शेजाऱ्याने कुऱ्हाडीने हल्ला केल्यानंतर परिसरातील लोक घराबाहेर आले. या घटनेने लोकांमध्ये भीती पसरली. या प्रकारानंतर आरोपी अद्याप पोलिसांच्या हाताला लागला नाही. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरु असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.