पुण्यात चोरीच्या घटना वाढल्या (फोटो- istockphoto )
या प्रकरणी सिंहगडरोड पोलिस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हा प्रकार 26 नोव्हेंबर रोजी दुपारी सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास घडला. याबाबत दिपक वसंत पवार (32, रा. दिपाली अपार्टमेंट, शाश्वत नगर, नर्हे) यांनी सिंहगडरोड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. यावेळी चोरट्याने 1 लाख 18 हजार रूपये किंमतीच्या दोन सोनसाखळ्या चोरी करून नेल्या.
घटनेच्या दिवशी एक जण ओम ज्वेलर्स दुकानात शिरला. त्याने वाढदिवस 30 तारखेला असल्याचे सांगून सोनसाखळी खरेदी करायची असल्याचे दुकानदाराला सांगितले. यावेळी दुकानदार सोनसाखळी दाखवत असताना त्याने दोन्ही सोनसाखळ्या गळ्यात घालून आरशात पाहत होता. मात्र काही समजण्या आदोगरच तो दुकानाच्या बाहेर पडला व बाहेर लावलेल्या ज्युपीटर दुचाकीवर त्याने धूम ठोकली.
दुसर्या गुन्ह्यात अशोक बन्सीलाल पटेल (26, रा. श्रीगंगा गॅलेक्सी, वडगाव बुद्रुक) यांचे सिंहगडरोड येथील वडगाव बुद्रुक परिसरात ज्योर्तीलिंग अपार्टमेंट येथे भाग्यलक्ष्मी ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. या दुकानातही एकजण शिरला त्याने दुकानदाराला सोनसाखळी पाहण्यास मागितली. यावेळी दुकानात चहा देणार्या मुलगाही होता. चोरटा यावेळी सोनसाखळी घालून आरशात पाहत असताना चहा देणार्या मुलाने बाहेर कोणाची तरी गाडी सुरू आहे असे सांगितले. त्यावर चोरटा गाडी बंद करण्याच्या बहाण्याने सोनसाखळीसह बाहेर आला. अन त्याने दुचाकीवर काही समजण्यापूर्वी धुम ठोकली.
१४ लाखांचे मेफेड्रोन जप्त; पिस्तूल आणि काडतूसेही जप्त
पुण्याच्या मध्यभागातून पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने पुन्हा एकदा सराईत गुन्हेगाराकडून ‘ड्रग्ज’साठा पकडला आहे. १४ लाख ६० हजार रुपयांचा मेफेड्रोन (एमडी) हा अमली पदार्थ पकडला असून, त्यासोबतच एक पिस्तूल आणि दोन काडतूसे जप्त केली आहेत. धक्कादायक म्हणजे, सराईताने “गेम” करण्यासाठी पिस्तूल बाळगल्याची माहिती समोर आली आहे.
हेही वाचा: Drugs Seized: पुणे गुन्हे शाखेची मोठी कारवाई! १४ लाखांचे मेफेड्रोन जप्त; पिस्तूल आणि काडतूसेही जप्त
बॉबी भागवत सुरवसे (वय २८, रा. गजराज हेल्थ क्लबजवळ, सर्वे नं. १२, लक्ष्मीनगर येरवडा) आणि तोसिम ऊफ लडडु रहिम खान (वय ३२, रा. १२८२ दर्गारोड, कसबा पेठ) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई अप्पर आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त निखील पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजय कुंभार, सहाय्यक पोलीस फौजदार सुनिल पवार, सुरेंद्र जगदाळे व त्यांच्या पथकाने केली आहे.