पी चिदंबरम यांनी ऑपरेशन सिंदूर आणि पहलगाम हल्लयावरुन मोदी सरकारवर निशाणा साधला (फोटो - सोशल मीडिया)
नवी दिल्ली : सध्या संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. आजच्या दिवशी सभागृहामध्ये अत्यंत महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे. भारतीय सैन्याकडून करण्यात आलेल्या ऑपरेशन सिंदूरवर आज सभागृहामध्ये चर्चा होणार आहे. याबाबत चर्चा व्हावी अशी विरोधकांची पहिल्या दिवसापासून मागणी होती. अखेर यावर चर्चा होणार असून संपूर्ण देशाचे लक्ष याकडे लागले आहे. दरम्यान, माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनी धक्कादायक वक्तव्य केले आहे. पहलगाम हल्ल्यांमधील दहशतवादी हे भारतीय होते की पाकिस्तानी होते असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
दहशतवाद्यांकडून पहलगाममध्ये पर्यटकांवर हल्ला करण्यात आला. याला सडेतोड उत्तर देताना भारतीय सैन्याकडून ऑपरेशन सिंदूर ही लष्करी कारवाई करण्यात आली. मात्र त्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध थांबवले असल्याचे वक्तव्य केल्यामुळे विरोधकांनी टीकेची झोड उठवली. यावर आता माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांच्या वक्तव्यामुळे जोरदार वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
काय म्हणाले पी. चिदंबरम?
एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये पी. चिदंबरम यांनी पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरवर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, NIA ने तीन महिन्यांपूर्वी झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील दहशतवाद्यांची ओळख पटवली आहे का? ओळख पटवली असेल तर ते कुठून आले होते? पाकिस्तानातूनच आले कशावरून? भारतातच तयार झालेले दहशतवादी नसतील हे कशावरुन? दहशतवादी पाकिस्तानातून आले होते याचा पुरावा काय? सरकारकडून पाकिस्तानशी संघर्ष करताना काय नुकसान झालं ते का लपवलं गेलं?” असा सवाल पी. चिदंबरम यांनी उपस्थित केला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
ऑपरेशन सिंदूरबाबत पी चिदंबरम म्हणाले, “ऑपरेशन सिंदूरला बरेच आठवडे झाले आहेत. पंतप्रधान म्हणतात ऑपरेशन सिंदूर संपलेलं नाही. जर ऑपरेशन सिंदूर संपलेलं नाही तर नंतर काय पाऊले उचलली? पहलगामसारखा आणखी एखादा हल्ला झाला तर तो रोखण्यासाठी तयारी झाली आहे का? पहलगामचे दहशतवादी कुठे आहेत? हल्लेखोरांना अटक झाली असं सांगण्यात आल, त्याचं काय झालं? खूप आमचे प्रश्न आहेत. असं पी. चिदरबरम यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पी. चिदंबरम यांचं वक्तव्य समोर आल्यानंतर भाजपाने त्यांच्यावर टीका केली आहे. भाजपाच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय म्हणाले, पुन्हा एकदा काँग्रेस पाकिस्तानला क्लीन चिट देण्यासाठी धावाधाव करते आहे. आपले लष्कर पाक पुरस्कृत दहशतवादाचा सामना करते. मात्र आता कांग्रेसचे नेते इस्लामाबादचे वकील वाटत आहेत अशी ठीका अमित मालवीय यांनी केली.