• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Latest News »
  • Ncp Rohini Khadse Social Media Post For Husband Pranjal Khewalkar

Rohini Khadse :”योग्य वेळी सत्य बाहेर येईल…; पती प्रांजल खेवलकरसाठी रोहिणी खडसेंची खास पोस्ट

Rohini Khadse social media post : पुण्यातील रेव्ह पार्टीमध्ये प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आली असून ते रोहिणी खडसे यांचे पती आहे. रोहिणी खडसे यांनी पतीसाठी खास सोशल मीडिया पोस्ट केली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Jul 28, 2025 | 10:35 AM
ncp rohini khadse social media post for husband Pranjal Khewalkar

राष्ट्रवादी नेत्या रोहिणी खडसे यांची पती प्रांजल खेवलकर यांच्यासाठी खास सोशल मीडिया पोस्ट (फोटो - सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

Rohini Khadse social media post : पुणे : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांच्या जावयाला पुण्यातील रेव्ह पार्टीमध्ये अटक करण्यातआ आली आहे. महिला प्रदेशाध्यक्ष असलेल्या रोहिणी खडसे यांचे प्रांजल खेवलकर हे पती असून यामुळे राजकीय वर्तुळामध्ये एकच खळबळ उडाली आहे. पुण्यातील एका पार्टीवर पोलिसांनी छापा टाकला. यामध्ये अटक करण्यात आलेल्यांमध्ये प्रांजल खेवलकर हे देखील असून त्यांना कालपासून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यावरुन आता रोहिणी खडसे यांनी सोशल मीडिया पोस्ट करुन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

शरद पवार गटाच्या महाराष्ट्राच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी सोशल मीडिया पोस्ट केली आहे. यामध्ये रोहिणी खडसे यांनी पती प्रांजल खेवलकर यांच्यासोबत फोटो शेअर केला आहे. त्याचबरोबर संयम राखण्याचे देखील सांगितले आहे. रोहिणी खडसे यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले आहे की, कायद्यावर व पोलीस यंत्रणेवर माझा पूर्ण विश्वास आहे. प्रत्येक गोष्टीला वेळ हेच उत्तर असतं. योग्य वेळी सत्य बाहेर येईल ! जय महाराष्ट्र! अशा शब्दांत रोहिणी खडसे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

कायद्यावर व पोलीस यंत्रणेवर माझा पूर्ण विश्वास आहे. प्रत्येक गोष्टीला वेळ हेच उत्तर असतं. योग्य वेळी सत्य बाहेर येईल ! जय महाराष्ट्र! pic.twitter.com/9wMcarRLow — Adv Rohini Eknathrao Khadse (@Rohini_khadse) July 28, 2025

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

या प्रकरणावर रोहिणी खडसे यांचे वडील एकनाथ खडसे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ खडसे यांनी माध्यमांशी संवाद साधून घडलेला प्रकार हा षडयंत्र असेल तर आक्रमक पवित्रा घेतला जाईल असा इशारा दिला आहे. एकनाथ खडसे म्हणाले की, “गेल्या काही दिवसांमध्ये जे वातावरण सुरू होते, त्यावरून असे काहीतरी घडू शकते याचा अंदाज मला येत होता. पुण्यामध्ये जी घटना घडली आहे, ते मी चॅनेलच्या माध्यमातून पाहिले. माझे त्यांच्याशी (प्रांजल खेवलकर) बोलणे झालेले नाही. ते अजून पोलिसांच्या ताब्यात आहेत. जर पुण्यात घडलेली घटना खरोखर रेव्ह पार्टी असेल आणि माझे जावई त्यात असतील तर मी त्या गोष्टीचे समर्थन कधीही करणार नाही,” अशी भूमिका एकनाथ खडसे यांनी घेतली.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

पुढे ते म्हणाले की, “पोलीस यंत्रणेने खरोखर चांगल्या पद्धतीने तपास करायला पाहिजे. परंतु काही ठिकाणी असे होते की, पोलीस यंत्रणा तपास व्यवस्थित करत नाही. अशी जनमानसामध्ये प्रतिमा आहे. जर या प्रकरणामध्ये तथ्य असेल तर जावई असो किंवा कुणीही असो त्याचे समर्थन कधी करणार नाही. परंतु जर जाणूनबुजून अडकविण्याचा प्रयत्न केला असेल तर तेही सहन केले जाणार नाही.” असा सूचक इशारा देखील शरद पवार गटातील एकनाथ खडसे यांनी दिला आहे.

Web Title: Ncp rohini khadse social media post for husband pranjal khewalkar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 28, 2025 | 10:35 AM

Topics:  

  • eknath khadse
  • Pranjal Khewalkar
  • Rohini Khadse

संबंधित बातम्या

Maharashtra Politics : एकनाथ खडसेंनी थेट पोलिसांना धमकावलं? गृहमंत्र्यांबाबत वादग्रस्त वक्तव्यावरुन गुन्हा दाखल
1

Maharashtra Politics : एकनाथ खडसेंनी थेट पोलिसांना धमकावलं? गृहमंत्र्यांबाबत वादग्रस्त वक्तव्यावरुन गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

पुढे वाचा
IND vs NED, T20 World Cup : नेदरलँड्सविरुद्ध सूर्याआर्मी करणार नवे प्रयोग! प्लेइंग इलेव्हनमध्ये ‘या’ खेळाडूला मिळेल संधी?

IND vs NED, T20 World Cup : नेदरलँड्सविरुद्ध सूर्याआर्मी करणार नवे प्रयोग! प्लेइंग इलेव्हनमध्ये ‘या’ खेळाडूला मिळेल संधी?

Feb 17, 2026 | 07:41 PM
Mumbai : ‘टिपू सुलतान चौक’ प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप

Mumbai : ‘टिपू सुलतान चौक’ प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप

Feb 17, 2026 | 07:39 PM
पुणेकरांची सुटका होणार! आयटीयन्सचे ‘Metro’ स्वप्न पूर्ण; ‘या’ मार्गाचा लवकरच श्रीगणेशा

पुणेकरांची सुटका होणार! आयटीयन्सचे ‘Metro’ स्वप्न पूर्ण; ‘या’ मार्गाचा लवकरच श्रीगणेशा

Feb 17, 2026 | 07:36 PM
Suresh Dhas : एक दिवस थांबा, ब्रेन मॅपिंग आणि नार्कोटेस्ट मधून सत्य बाहेर येईल

Suresh Dhas : एक दिवस थांबा, ब्रेन मॅपिंग आणि नार्कोटेस्ट मधून सत्य बाहेर येईल

Feb 17, 2026 | 07:32 PM
1940 ची झलक, 2026 ची टेक्नोलॉजी! Indian Motorcycle ची नवी Chief Vintage, रेट्रो लुकमध्ये खास काय?

1940 ची झलक, 2026 ची टेक्नोलॉजी! Indian Motorcycle ची नवी Chief Vintage, रेट्रो लुकमध्ये खास काय?

Feb 17, 2026 | 07:26 PM
Mantralaya Bribe Case :  Narhari Zirwal यांच्या मंत्रालयातील ऑफिसमध्ये ACB ची धाड, लिपिकाला पकडले!

Mantralaya Bribe Case : Narhari Zirwal यांच्या मंत्रालयातील ऑफिसमध्ये ACB ची धाड, लिपिकाला पकडले!

Feb 17, 2026 | 07:21 PM
T20 World Cup 2026 मधून Australia बाहेर! भारताचे सुपर-८ चे वेळापत्र आले समोर; ‘या’ संघांशी होणार लढत

T20 World Cup 2026 मधून Australia बाहेर! भारताचे सुपर-८ चे वेळापत्र आले समोर; ‘या’ संघांशी होणार लढत

Feb 17, 2026 | 07:15 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ajit Pawar Plane Crash : रुपाली ठोंबरेंचा सरकारला इशारा; पार्थ पवार आणि पुणे महापौरांवरही डागली तोफ!

Ajit Pawar Plane Crash : रुपाली ठोंबरेंचा सरकारला इशारा; पार्थ पवार आणि पुणे महापौरांवरही डागली तोफ!

Feb 17, 2026 | 07:12 PM
Buldhana News : शहरातून काढण्यात आला भव्य मूक मोर्चा, जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

Buldhana News : शहरातून काढण्यात आला भव्य मूक मोर्चा, जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

Feb 17, 2026 | 07:07 PM
Sindhudurg : टिपू सुलतानच्या फोटोवरून हुसेन दलवाईंची समाजवादी पक्षावर टीका

Sindhudurg : टिपू सुलतानच्या फोटोवरून हुसेन दलवाईंची समाजवादी पक्षावर टीका

Feb 17, 2026 | 02:40 PM
Sindhudurg : शिवसेना नेते संतोष थेराडे यांचे उदय सामंतांना आव्हान

Sindhudurg : शिवसेना नेते संतोष थेराडे यांचे उदय सामंतांना आव्हान

Feb 17, 2026 | 02:12 PM
Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Feb 16, 2026 | 08:09 PM
Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Feb 16, 2026 | 07:54 PM
Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Feb 16, 2026 | 07:42 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.