Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pahalgam Terror Attack: भारताच्या भीतीने पाकिस्तानमध्ये सत्तापालट? आर्मी PM शरीफांची हकालपट्टी करणार? वाचा…

पाकिस्तानचा बदला घेण्याची तयारी भारताने सुरू केली आहे. अनेक धोरणात्मक निर्णय घेऊन पाकिस्तानची कोंडी केली आहे. तसेच युद्धाभ्यास देखील सुरू आहे. त्यामुळे पाकिस्तान बिथरला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: May 01, 2025 | 06:26 PM
Pahalgam Terror Attack: भारताच्या भीतीने पाकिस्तानमध्ये सत्तापालट? आर्मी PM शरीफांची हकालपट्टी करणार? वाचा...

Pahalgam Terror Attack: भारताच्या भीतीने पाकिस्तानमध्ये सत्तापालट? आर्मी PM शरीफांची हकालपट्टी करणार? वाचा...

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली: पहलगाम हल्ल्याला एक आठवड्यापेक्षा जास्त कालावधी पूर्ण झाला आहे. या भ्याड दहशतवादी हल्ल्यात 28 निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशभरात संताप व्यक्त होत आहे. पाकिस्तानचा बदला घेण्याची तयारी भारताने सुरू केली आहे. अनेक धोरणात्मक निर्णय घेऊन पाकिस्तानची कोंडी केली आहे. तसेच युद्धाभ्यास देखील सुरू आहे. त्यामुळे पाकिस्तान बिथरला आहे. भारत हल्ला करेल या भीतीने पाकिस्तानच्या राजकारणात भूकंप येण्याची शक्यता आहे.

भारत पाकिस्तानवर हल्ला करेल या भीतीने पाकिस्तानमध्ये सत्तापालट होण्याची शक्यता आहे. पाकिस्तानी सैन्याचा दबदबा सरकारवर वाढल्याचे म्हटले जात आहे. भारताच्या भीतीने पाकिस्तानमधील सर्व मोठे निर्णय सेनाच घेत असल्याचे म्हटले जात आहे. पाकिस्तानी सेना आणि सरकारमध्ये तणाव असल्याचे सांगितले जात आहे. आयएसआय प्रमुख लेफ्टनंट जनरल मुहम्मद असीम मलिक यांना पंतप्रधान यांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

पाकिस्तान सैन्याचे प्रमुख जनरल असीम मुनिर देश सोडून पळून गेल्याचे म्हटले जात आहे. पाकिस्तानचे सैन्य प्रमुख परिवारासह देश सोडून गेल्याचे  म्हटले जात आहे. तसेच रावळपिंडी येथील सैन्य मुख्यालयात लपले असल्याची चर्चा सुरू आहे. भारताने आक्रमक पावले उचलली असल्याने पाकिस्तानमध्ये भीतीदायक वातावरण आहे.

भारताने आक्रमण युद्धाभ्यास सुरू केला आहे. नौदलाची ताकद असलेले आयएनएस विक्रांत अरबी समुद्रात तैनात आहे. भारतीय लष्कर देखील मोठ्या कारवाईच्या तयारीत आहे. राफेल आणि सुखोई लढाऊ विमाने सीमेजवळ घिरट्या घालत आहेत. त्यामुळे पाकिस्तान घाबरला आहे. भारताला उत्तर देण्याची तयारी करत आहे. मात्र अखेरच्या क्षणी पाकिस्तान आर्मी सरकारवर दवाब आणून काही महत्वाचे निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची खुर्ची राहणार की जाणार हे येत्या काळात पहावे लागणार आहे.

NIA च्या तपासात मोठा खुलासा

गेल्या आठवड्यात जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे टीआरएफच्या दहशतवाद्यांनी पर्यटकांवर भ्याड हल्ला केला होता. यामध्ये 28 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी देशभरात संतापाची लाट उसळली आहे. भारताने अनेक महत्वाची पावले उचलून पाकिस्तानची कोंडी केली आहे. दरम्यान पहलगाम हल्ल्याचा तपास एनआयए करत आहे. एनआयएच्या तपासात अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत.

Pahalgam Terror Attack: पहलगाम नव्हे तर दहशतवाद्यांच्या टार्गेटवर होती ‘ही’ ठिकाणे; NIA च्या तपासात मोठा खुलासा

एनआयएने केलेल्या तपासात अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. तिथे घटनास्थळी केलेल्या चौकशीत दहशतवादी बैसरन खोऱ्यात नव्हे तर अन्य ठिकाणी रक्तपात करू इच्छित होते. मात्र शेवटच्या क्षणी त्यांनी आपले टार्गेट बदलले आणि बैसरन खोऱ्यात पर्यटकांवर हल्ला केला. हल्ला करण्याच्या 2 दिवस आधीपासूनच दहशतवादी बैसरन खोऱ्यात उपस्थित होते.

 

Web Title: Pakistan army chief take charge of government and out the shahbaz sharif after pahalgam terror attack news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 01, 2025 | 06:16 PM

Topics:  

  • Modi government
  • Pahalgam Terror Attack
  • pakistan army
  • shahbaaz sharif

संबंधित बातम्या

पुन्हा शाहबाज आणि मुनीरच्या प्रेमात ट्रम्प! ASEAN परिषदेदरम्यान ‘महान व्यक्ती’ म्हणत केले कौतुक
1

पुन्हा शाहबाज आणि मुनीरच्या प्रेमात ट्रम्प! ASEAN परिषदेदरम्यान ‘महान व्यक्ती’ म्हणत केले कौतुक

Developed Maharashtra 2047: 8 शहरांमध्ये मेट्रोचा विस्तार तर ५ ट्रिलियन डॉलर्सच्या अर्थव्यवस्था गाठणार; CM फडणवीसांचे ठरले लक्ष्य
2

Developed Maharashtra 2047: 8 शहरांमध्ये मेट्रोचा विस्तार तर ५ ट्रिलियन डॉलर्सच्या अर्थव्यवस्था गाठणार; CM फडणवीसांचे ठरले लक्ष्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.