Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pahalgam Terror Attack: भारताच्या ‘या’ कृतीमुळे पाकिस्तानची पळता भुई थोडी; एअर स्ट्राईकच्या भीतीने 18 फायटर जेट्स थेट…

पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारत घुसून कारवाई करण्याची भीती पाकिस्तानला सतावत आहे. सर्जिकल किंवा एअर स्ट्राईक करेल अशी भीती त्यांना वाटत आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 24, 2025 | 02:48 PM
Pahalgam Terror Attack: भारताच्या ‘या’ कृतीमुळे पाकिस्तानची पळता भुई थोडी; एअर स्ट्राईकच्या भीतीने 18 फायटर जेट्स थेट…
Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली: मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास टीआरएफ या दहशतवादी संघटनेने पहलगाममध्ये पर्यटकांवर भ्याड हल्ला केला होता. या भ्याड हल्ल्यात तब्बल 28 पर्यटकांचा मृत्यू झाला होता. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने आक्रमक भूमिका घेतली आहे. काल परराष्ट्र मंत्रालयाने घेतलेल्या अनेक निर्णयांनी पाकिस्तानची कोंडी होणार आहे. मात्र या हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानविरुद्ध मोठी कारवाई करणार असल्याची भीती पाकिस्तानल वाटत आहे.

पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारत घुसून कारवाई करण्याची भीती पाकिस्तानला सतावत आहे. सर्जिकल किंवा एअर स्ट्राईक करेल अशी भीती त्यांना वाटत आहे. भारत शांत बसणार नाही याची खात्री पाकिस्तानला आहे. भारत कशाप्रकरे कारवाई करणार किंवा कोणती पावले उचलणार यामुळे पाकिस्तानची झोप उडाली आहे. पाकिस्तानी सैन्य सतर्क झाली आहे.

पाकिस्तानची घाबर गुंडी उडलेली आहे. भारतीय सरकार कोणत्याही क्षणी महत्वाचे निर्णय घेण्याची शक्यता आहे. भारत एअर स्ट्राईक करेल या भीतीने पाकिस्तानची एअरफोर्स रात्रभर सीमेभोवती फेऱ्या मारत होते असे म्हटले जात आहे. पाकच्या संरक्षण मंत्रालयाने आणि अन्य वरिष्ठ  अधिकाऱ्यांनी संध्याकाळी उशिरा बैठक घेतली. भारताने हवाई हल्ला केल्यास त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी रात्री १८ लढाऊ विमाने कराचीला दाखल झाली आणि तीनही सैन्यांना सतर्क राहण्याचे आदेश दिले गेले.

पाकिस्तानला भीती आहे की यावेळी भारत बालाकोटपेक्षाही मोठा हवाई हल्ला करण्याची योजना आखत आहे. त्यामुळे पाकिस्तानचे एअरफोर्स देखील अलर्ट मोडवर आले आहे. भारत-पाकिस्तान सीमेजवळ त्यांची लढाऊविमाने गस्त घालत असल्याचे समजते आहे. मात्र भारत आता कोणती मोठी कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Big Breaking: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने श्रीनगरला रवाना; अडकलेल्या पर्यटकांना परत आणणार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने श्रीनगरला रवाना

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तातडीने जम्मू काश्मीरला रवाना झाले आहेत. तिथे अडकून पडलेल्या नागरिकांना परत आणण्यासाठी एकनाथ शिंदे रवाना झाले आहेत. काश्मीरमध्ये अडकेलेल्या पर्यटकांना परत आणण्यासाठी महाराष्ट्र सरकारने विशेष विमानांची व्यवस्था केली आहे. पर्यटकांना परत आणण्याचा सर्व खर्च राज्य सरकार करणार आहे. एकनाथ शिंदे हे सातत्याने पर्यटकांच्या संपर्कात आहेत. तेथील परिस्थितीचा आढावा घेत आहेत. श्रीनगरला पोहोचल्यावर एकनाथ शिंदे महाराष्ट्रातील पर्यटकांची भेट घेणार आहेत. त्यांना मुंबईत सुखरूप आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

पहलगाम हल्ल्यानंतर अमित शाह आक्रमक

पहलगाम येथे सैनिकी गणवेशात आलेल्या दहशतवाद्यांनी बैसरन खोऱ्यात पर्यटकांवर हल्ला केला होता. यामध्ये २८ पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. काही पर्यटक महाराष्ट्रातील देखील या घटनेत मृत्युमुखी पडले आहेत. दरम्यान काल झालेल्या हल्ल्याची जबाबदारी टिआरएफने स्वीकारली आहे.  हल्ल्याची माहिती कळताच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा काश्मीरला रवाना झाले. आज त्यांनी पहलगाममध्ये पाहणी केली. यावेळी त्यांनी दहशतवाद्यांना सज्जड इशारा दिला आहे.

 

Web Title: Pakistan in fear of indias airstrike airforce alert mode after pahalgam terror attack in jammu kashmir

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 24, 2025 | 02:46 PM

Topics:  

  • Indian Air Force
  • jammu kashmir
  • Pahalgam Terror Attack
  • pakistan

संबंधित बातम्या

Independence Day: पाकिस्तान 14 ऑगस्टला स्वातंत्र्यदिन साजरा करतो, मग बलुचिस्तानात 11 ऑगस्ट का महत्त्वाचा? जाणून घ्या इतिहास
1

Independence Day: पाकिस्तान 14 ऑगस्टला स्वातंत्र्यदिन साजरा करतो, मग बलुचिस्तानात 11 ऑगस्ट का महत्त्वाचा? जाणून घ्या इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.