जयपूर : पाकिस्तानातील महागाईचा (Pakistan Inflation) परिणाम पाकिस्तानातून भारतात आलेल्या यात्रेकरूंवर (Pilgrims) दिसून आला. अजमेरच्या उर्समध्ये (Ajmer Urs) दर्शनासाठी आलेल्या यात्रीकरुंनी हेल्मेटपासून प्रेशर कुकरपर्यंत सर्व काही बाजारातून विकत घेतले आणि सोबत नेले. पाकिस्तानी यात्रेकरूंनी सांगितले की ही वस्तू पाकिस्तानमध्ये इतकी महाग आहे की ती खरेदी करणे अशक्य आहे. पाकिस्तानातून आलेल्या यात्रेकरुंनी भारतासोबतचे संबंध सुधारावेत, जेणेकरून पाकिस्तान संकटातून बाहेर पडू शकेल, अशी प्रार्थना केली.
[read_also content=”आता दुधालाही महागाईचा फटका! अमूलने दुधाचे दर वाढवले,आता लिटरमागे ३ रुपयांची वाढ https://www.navarashtra.com/india/amul-hikes-milk-prices-now-increase-by-rs-3-per-litre-nrps-366922.html”]
अजमेरच्या वार्षिक उर्समध्ये अजमेर शरीफमध्ये पाकिस्तानी भाविक आले होते. पण परतण्यापूर्वी पाकिस्तानी यात्रेकरुंनी बाजारात पोहोचून प्रेशर कुकर, हेल्मेट, मिक्सर यासारख्या घरगुती वस्तूंची मोठी खरेदी केली. ही यात्रेकरुंची तुकडी 25 जानेवारीला पोहोचली आणि 01 फेब्रुवारीला ट्रेनने अजमेर अमृतसरला रवाना झाली.
रेल्वे स्थानकावर पोहोचलेल्या बॅचजवळ जड बॅग आणि सामान पाहून सुरक्षा यंत्रणांचे अधिकारी चक्रावले. पाकिस्तानी जरीन म्हणाल्या की, पाकिस्तानमध्ये ही महागाई जास्त आहे. भारतासोबतचे संबंध सुधारावेत, अशी आम्ही प्रार्थना करतो, असे यात्रेकरूंनी सांगितले.






