संसदेत खासदारांच्या आरोग्याची घेतली जाणार काळजी (फोटो सौजन्य - iStock)
संसदेत होणाऱ्या चर्चेव्यतिरिक्त, खासदार आणि अधिकाऱ्यांना पौष्टिक अन्न देण्याची तयारी सुरू झाली आहे. खासदारांच्या तणावपूर्ण जीवनशैली लक्षात घेऊन, संसदेत एक नवीन आरोग्य मेनू आणण्याची योजना आहे. खासदारांचे आरोग्य लक्षात घेऊन या नवीन मेनूमध्ये नाचणी बाजरी इडली आणि ज्वारी उपमा ते मूगडाळ चिला आणि भाज्यांसह ग्रील्ड मासे यांचा समावेश आहे. २०२३ मध्ये संयुक्त राष्ट्रांनी घोषित केलेल्या आंतरराष्ट्रीय बाजरी वर्षात राष्ट्रीय स्तरावरील बातम्यांमध्ये स्थान मिळवण्यासाठी सज्ज असलेला बाजरी हे धान्य या नवीन मेनूमधील मुख्य आकर्षण आहे.
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या विनंतीवरून तयार करण्यात आलेल्या या नवीन मेनूमध्ये खासदारांच्या आरोग्याची काळजी घेऊन त्यांना योग्य पोषण प्रदान करण्याचा उद्देश आहे. निरोगी आहाराला प्रोत्साहन देण्यासाठी बिर्ला यांनी या मेनूमध्ये बाजरीशी निगडीत जेवण, फायबर-समृद्ध सॅलेड आणि प्रथिने-समृद्ध सूप, तसेच स्वादिष्ट कढी आणि थाळी यांचा समावेश केला आहे (फोटो सौजन्य – iStock – फोटो प्रातिनिधिक आहे)
पोषण लक्षात घेऊन मेन्यू
संसदेच्या या नवीन मेनूमध्ये समाविष्ट असलेले पदार्थ कार्बोहायड्रेट्स, सोडियम आणि कॅलरीज कमी असणारे असतील. ते आवश्यक पोषक तत्वांनी समृद्ध राहावे म्हणून काळजीपूर्वक तयार केले गेले आहे. याशिवाय, आरोग्य मेनूमधील पदार्थांच्या नावापुढे कॅलरीजची संख्यादेखील दिली आहे. मेनूमध्ये असे लिहिले आहे की, ‘प्रत्येक पदार्थ उच्चतम पौष्टिक मानकांची पूर्तता करण्यासाठी काळजीपूर्वक तयार केला गेला आहे – कमी कार्बोहायड्रेट्स, कमी सोडियम आणि कमी कॅलरीज, तसेच जास्त फायबर आणि प्रथिने समृद्ध.’
मुख्य आकर्षण काय आहे?
मुख्य आकर्षणांमध्ये ‘नाचणी बाजरी इडली’, ‘सांभार आणि चटणी’ (२७० किलोकॅलरी), ‘ज्वारी उपमा’ (२०६ किलोकॅलरी) आणि शुगर फ्री ‘मिक्स बाजरी खीर’ (१६१ किलोकॅलरी) यांचा समावेश आहे. ‘चना चाट’ आणि ‘मूग दाल चिल्ला’ सारख्या लोकप्रिय भारतीय पदार्थांचादेखील समावेश करण्यात आला आहे. हलक्याफुलक्या नाश्त्यासाठी, खासदार ‘बार्ली’ अर्थात सत्तू आणि ‘ज्वारी सॅलेड’ (२९४ किलोकॅलरी) किंवा ‘गार्डन फ्रेश सॅलेड’ (११३ किलोकॅलरी) सोबत ‘रोस्ट टोमॅटो’ आणि ‘तुलसी शोरबा’ आणि ‘व्हेजिटेबल क्लियर सूप’ अशा विविध सॅलडचा आस्वाद घेऊ शकतात.
मांसाहारी जेवण आवडणाऱ्या लोकांना अधिक पर्याय उपलब्ध नाहीत. फक्त ‘उकडलेल्या भाज्यांसह ग्रिल्ड चिकन’ (१५७ किलोकॅलरी) आणि ‘ग्रिल्ड फिश’ (३७८ किलोकॅलरी) सारखे पर्याय उपलब्ध आहेत. मेनूमध्ये पेयांसाठीही अनेक पर्याय आहेत, ज्यामध्ये ग्रीन टी आणि हर्बल टी, मसाला सत्तू आणि गुळाच्या चवीचे आंबा पन्हे इत्यादी पौष्टिक पदार्थांचा समावेश आहे.
‘मन की बात’मध्ये आरोग्यावर लक्ष केंद्रित
अलीकडेच, पंतप्रधान मोदींनी त्यांच्या ‘मन की बात’मध्ये आरोग्याशी संबंधित समस्यांवर चर्चा केली होती. त्यांच्या कार्यक्रमात, त्यांनी लठ्ठपणाचा सामना करण्यासाठी देशभरात जागरूकता पसरवण्याची आणि सामूहिक कृती करण्याची गरज यावर भर दिला. त्यांनी लोकांना खाद्यतेलाचा वापर कमी करण्याचा सल्लाही दिला.
यामुळेच खासदारांसाठी नियमित आरोग्य शिबिरे आयोजित केली जात आहेत. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला हे सभागृहाच्या अधिवेशनादरम्यान खासदारांसाठी नियमित आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित करत आहेत. संसदेतील अनेक तज्ज्ञांनी खासदारांसाठी निरोगी जीवनशैली आणि आहारावर व्याख्याने देखील दिली आहेत. ज्याचा उद्देश खासदारांना त्यांच्या आरोग्याची जाणीव करून देणे आहे. या वचनबद्धतेला बळकटी देत, सरकारने फिट इंडिया चळवळ, नॉन-कम्युनिकेबल डिसीज प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी राष्ट्रीय कार्यक्रम (एनपी-एनसीडी), पोषण अभियान, ईट राईट इंडिया आणि खेलो इंडिया यासह अनेक उपक्रम सुरू केले आहेत.