Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Parliament Session 2024:  लोकसभेतील नवनिर्वाचित खासदारांच्या खास गोष्टी; एकदा वाचाच

या लोकसभेतील नवनिर्वाचित खासदारांपैकी 78 टक्के खासदारांनी पदवीपूर्व शिक्षण पूर्ण केले आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jun 24, 2024 | 01:38 PM
सौजन्य- सोशल मीडिया

सौजन्य- सोशल मीडिया

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : 18 व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली. नव्या लोकसभेत अनेक खास गोष्टी आहेत. विशेष म्हणजे, वेगवेगळ्या राज्यातून निवडून आलेल्या या खासदारांची काही खास वैशिष्ट्ये आहेत. आपण निवडून दिलेला उमेदवार किती शिकलेला आहे, किती उमेदवार पहिल्यांदाच निवडून आलेत, ते काय करतात,  याबाबत अनेकांच्या मनात कुतूहल असते. याबाबत या लेखात जाणून घेणार आहोत.

खासदारांचे शिक्षण

या लोकसभेतील नवनिर्वाचित खासदारांपैकी 78 टक्के खासदारांनी पदवीपूर्व शिक्षण पूर्ण केले आहे. तर 22 टक्के खासदार आहेत ज्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेतले नाही. 17 व्या लोकसभेत अशा खासदारांची संख्या 27 टक्के होती. म्हणजे यावेळी महाविद्यालयीन शिक्षण घेतलेल्या खासदारांची संख्या वाढली आहे.

व्यवसायाचा विचार करता, 48 टक्के खासदार सामाजिक कार्यकर्ते आहेत, तर 37 टक्के शेती, 32 टक्के व्यापार आणि व्यवसाय, 7 टक्के न्यायशास्त्रज्ञ आणि न्यायाधीश आहेत, चार टक्के वैद्यकीय आणि पॅरामेडिकल क्षेत्रातील आहेत. तीन टक्के खासदार कला आणि मनोरंजन क्षेत्रातील आहेत तर दोन टक्के सेवानिवृत्त सरकारी कर्मचारी आहेत.

लोकसभेतील चार सर्वात मोठे पक्ष

18व्या लोकसभेत 240 जागांसह भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 98 जागांसह दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे, तर समाजवादी पक्ष 37 जागांसह तिसऱ्या स्थावर आहे. तृणमूल काँग्रेस 29 जागांसह चौथ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे.

बहुतेक सदस्य 50-60 वयोगटातील

लोकसभेतील खासदारांचे वय पाहिल्यास सर्वाधिक 166 खासदार 50-60 या वयोगटातील आहेत. तर 161 खासदार 60-70 या वयोगटातील, 110 हे 40-50 वयोगटातील, तर 52 खासदार 70-80 वयोगटातील आहेत. 45 खासदार 30-40 वयोगटातील आहेत, 7 खासदार हे 20-30 या वयोगटातील आणि संसदेतील केवळ एक खासदार असे आहेत ज्यांचे वय 80 वर्षांहून अधिक आहेत. यातील ३४६ खासदारांनी राष्ट्रीय पक्षांकडून निवडणुका लढल्या आणि जिंकल्या आहेत. 179 खासदार राज्यस्तरीय पक्षांमधून निवडून आले आहेत. तर, 11 खासदार अपरिचित पक्षांचे आहेत आणि सात अपक्ष आहेत.

 पहिल्यांदाच निवडून आलेले खासदार

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत 281 खासदार (52 टक्के) आहेत जे निवडणूक जिंकून पहिल्यांदाच संसदेत पोहोचले आहेत. 17व्या लोकसभेत ही संख्या 267 होती, मात्र 2014 मध्ये 16व्या लोकसभेसाठी पहिल्यांदाच विजयी होऊन विक्रमी 314 खासदार सभागृहात पोहोचले. दोन खासदार आठव्यांदा सभागृहात पोहोचले. 18व्या लोकसभेत 35 चार टर्म खासदार, 19 पाच टर्म खासदार, 114 दोन टर्म खासदार, 74 तीन टर्म खासदार,  10 सहा टर्म खासदार, सात सात टर्म खासदार आणि दोन आठ टर्म खासदार निवडून आले आहेत. .

 

Web Title: Parliament session 2024 education age occupation of newly elected mps in lok sabha

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 24, 2024 | 01:38 PM

Topics:  

  • BJP
  • Congress
  • Latest Political News
  • New Delhi
  • Samajwadi Party

संबंधित बातम्या

स्वतंत्र भारतात पहिल्यांदाच भारतीय मुद्रेवर भारत मातेचं चित्र…, नरेंद्र मोदी RSS विशेष तिकीट अन् नाण्याबद्दल काय म्हणाले?
1

स्वतंत्र भारतात पहिल्यांदाच भारतीय मुद्रेवर भारत मातेचं चित्र…, नरेंद्र मोदी RSS विशेष तिकीट अन् नाण्याबद्दल काय म्हणाले?

Congress News: गांधींच्या छातीत गोळ्या घालणाऱ्यांच्या औलादी आजही वळवळ करतायेत; सपकाळांनी संघाच्या जखमेवर मीठ चोळलं
2

Congress News: गांधींच्या छातीत गोळ्या घालणाऱ्यांच्या औलादी आजही वळवळ करतायेत; सपकाळांनी संघाच्या जखमेवर मीठ चोळलं

Kolhapur : मराठवाड्यासह सोलापूरातील पूरग्रस्तांसाठी कौटुंबिक साहित्यांचे ट्रक रवाना
3

Kolhapur : मराठवाड्यासह सोलापूरातील पूरग्रस्तांसाठी कौटुंबिक साहित्यांचे ट्रक रवाना

Bihar Election 2025: बिहारच्या राजकारणात नवीन पक्षांचा प्रवेश, ‘हे’ पक्ष पहिल्यांदाच निवडणूक लढवणार, २०२० मध्ये किती उमेदवार होते?
4

Bihar Election 2025: बिहारच्या राजकारणात नवीन पक्षांचा प्रवेश, ‘हे’ पक्ष पहिल्यांदाच निवडणूक लढवणार, २०२० मध्ये किती उमेदवार होते?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.