वर्षाअखेरीस बिहारमध्ये निवडणूक होणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहार दौऱ्यावर
बिहारमध्ये एसआयआरवरुण राजकारण तापले
Bihar Assembly Election: बिहारमध्ये लवकरच विधानसभा निवडणूक होणार आहे. वर्षाअखेरीस विधानसभा निवडणूक होणार आहे. सर्व पक्षांनी निवडणुकीची तयारी केली आहे. एसआयआरवरून देखील बिहारमध्ये राजकारण तापले आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहार दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी सभेला संबोधित केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बिहारमध्ये 36 हजार कोटींच्या विकासकामांचे लोकार्पण आणि उद्घाटन केले आहे. पंतप्रधान मोदी यांनी पूर्णिया एअरपोर्टच्या नवीन टर्मिनलचे लोकार्पण देखील केले आहे. गरिबांचा विकास, गरिबांची सेवा हेच आमचे ध्येय आहे, असे पंतप्रधान मोदी सभेला संबोधित करताना म्हणाले आहेत.
बिहारमधील सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “आमच्या सरकारने गेल्या 11 वर्षांमध्ये 4 कोटीपेक्षा जास्त पक्की घरे बांधली आहेत. आता आम्ही आणखी 3 कोटी नवीन घरे बांधत आहोत. जोवर गरिबांना पक्की घरे मिळत नाहीत, तोवर मोदी थांबणार नाही.” यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरजेडी आणि कॉँग्रेसवर टीका केली आहे.
बिहार के लोगों का जीवन आसान बनाने के लिए डबल इंजन सरकार लगातार काम कर रही है। आज पूर्णिया से हजारों करोड़ रुपये के विकास कार्यों का लोकार्पण-शिलान्यास कर अत्यंत प्रसन्न हूं। https://t.co/mHT2VGjbOV
— Narendra Modi (@narendramodi) September 15, 2025
पुढे बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलताना म्हणाले, “कॉँग्रेस घुसखोरांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. घुसखोरांना वाचवणे ही एनडीएची प्राथमिकता आहे. जो कोणी घुसखोर असतील त्यांना बाहेर जावेच लागेल. बिहारमधील माता-भगिनी एनडीसोबत आहेत.देशाच्या विकासासाठी बिहारचा विकास आवश्यक आहे. बिहारच्या विकासासाठी पूर्णिया व सीमांचलचा विकास महत्वाचा आहे. आरजेडी व कॉँग्रेसच्या कुशासनामुळे या भागात मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. मात्र आता एनडीए सरकार येथील स्थिती बदलत आहे.”
मणिपूर दौऱ्यात नरेंद्र मोदींचे सूचक विधान
मणिपूर दौऱ्यावर असताना चुराचांदपुर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला संबोधित केले. जनतेस संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “मणिपूरची जनता आता विकासाच्या मार्गावर पुढे जात आहे. हा प्रदेश लोकांसाठी आता उदाहरण बनत आहे. मणिपूरमधील प्रत्येक नागरिकाचा विकास व्हावा यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. मणिपूरचे नाव ‘मणी’ आहे जे या भागाची ओळख बनेल.”
PM Modi Manipur Visit: “माझे तुम्हाला वचन आहे, मी….; मणिपूर दौऱ्यात नरेंद्र मोदींचे सूचक विधान
पुढे बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “हिंसाचाराने मणिपूर प्रभावित झाले. मात्र आता येथील नागरिक शांततेच्या मार्गाने पुढे जात आहेत. सर्व संघटना आणि गटांना सामाजिक सद्भावनेने पुढे जाण्याचे आवाहन करतो. भारत सरकार आणि मणिपूर सरकार विस्थापित झालेल्या लोकांचे योग्य ठिकाणी पुनर्वसन करण्यासाठी एकत्रितपणे काम करत आहे.”