Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

इंधन टंचाईचे सावट गडद! पंतप्रधानांनी बोलावली तातडीची बैठक; परराष्ट्र आणि पेट्रोलियम मंत्र्यांसोबत खलबते

इराण-इस्रायल युद्धामुळे भारतात एलपीजी गॅसची टंचाई निर्माण झाली आहे. केंद्र सरकारने घरगुती पुरवठा कायम ठेवण्यासाठी एस्मा लागू केला असून परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पीएम मोदींनी बैठक घेतली.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 10, 2026 | 04:43 PM
इंधन टंचाईचे सावट गडद! पंतप्रधानांनी बोलावली तातडीची बैठक (Photo Credit- X)

इंधन टंचाईचे सावट गडद! पंतप्रधानांनी बोलावली तातडीची बैठक (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

  • इंधन टंचाईचे सावट गडद!
  • पंतप्रधानांनी बोलावली तातडीची बैठक
  • परराष्ट्र आणि पेट्रोलियम मंत्र्यांसोबत खलबते
LPG Gas Shortage: मध्यपूर्वेतील वाढत्या तणावाचा थेट फटका आता भारतातील सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघराला बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. इराण आणि इस्रायलमधील संघर्षामुळे देशात एलपीजी (LPG) सिलेंडची टंचाई निर्माण झाली असून, केंद्र सरकारने (Central Goverment) परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी ‘एस्मा’ (ESMA – अत्यावश्यक सेवा संरक्षण कायदा) लागू केला आहे. घरगुती ग्राहकांना गॅसचा पुरवठा विस्कळीत होऊ नये, यासाठी सरकारने हा कठोर निर्णय घेतला आहे.

पंतप्रधान मोदींकडून उच्चस्तरीय बैठकीत आढावा

इंधन संकटाच्या गांभीर्याची दखल घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी एक उच्चस्तरीय बैठक बोलावली होती. या बैठकीला पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर उपस्थित होते. इराणने ‘स्ट्रेट ऑफ होर्मुज’ हा सागरी मार्ग रोखल्यामुळे भारत आणि इतर आशियाई देशांना होणारा गॅस आणि कच्च्या तेलाचा पुरवठा ठप्प झाला आहे. या पार्श्वभूमीवर पुरवठ्याचे पर्यायी मार्ग शोधण्यावर बैठकीत चर्चा करण्यात आली.

औद्योगिक आणि व्यावसायिक पुरवठ्यात कपात; हॉटेल व्यावसायिक चिंतेत

सरकारचे सध्याचे संपूर्ण लक्ष घरगुती ग्राहकांचा पुरवठा सुरळीत ठेवण्यावर आहे. यासाठी औद्योगिक युनिट्सना होणाऱ्या गॅस पुरवठ्यात मोठी कपात करण्यात आली आहे. तसेच व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठाही मर्यादित करण्यात आला आहे. यामुळे हॉटेल इंडस्ट्रीमध्ये खळबळ उडाली आहे. व्यावसायिक सिलेंडर्स कमी मिळाल्यास हॉटेल आणि रेस्टॉरंट्सचे कामकाज ठप्प होण्याची भीती व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे. आगामी काही दिवस भारतासाठी अत्यंत कळीचे ठरणार आहेत.

LPG Gas Shortage : गॅसच्या तुटवड्यावर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; संपूर्ण देशात ESMA कायदा लागू

आयातीवरील अवलंबित्व आणि संकटाची व्याप्ती

भारत आपल्या गरजेच्या एकूण ६२ टक्के एलपीजी आयात करतो, तर कच्च्या तेलाच्या बाबतीत हे अवलंबित्व ८५ टक्क्यांच्या घरात आहे. भारताला मिळणाऱ्या गॅसचा ८५ टक्के हिस्सा हा सौदी अरेबियातून ‘स्ट्रेट ऑफ होर्मुज’ मार्गे येतो. हा मार्ग बंद राहिल्यास देशात मोठे ऊर्जा संकट ओढवू शकते. सध्या देशातील ८७ टक्के एलपीजीचा वापर हा घरगुती कारणांसाठी होतो, तर उर्वरित १३ टक्के हॉटेल आणि उद्योगांसाठी वापरला जातो.

‘एस्मा’ लागू करण्यामागची कारणे

दोन दशकांपूर्वीच्या तुलनेत आज भारतातील ग्रामीण आणि शहरी भागात स्वयंपाकासाठी एलपीजीवर असणारे अवलंबित्व प्रचंड वाढले आहे. गॅस टंचाईमुळे जनतेमध्ये असंतोष निर्माण होऊ नये, यासाठी सरकारने ‘एस्मा’ लागू करून गॅस पुरवठ्याचे वर्गीकरण केले आहे. यामध्ये घरगुती ग्राहकांना सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. सध्या भारत दरवर्षी सुमारे ३१.३ मिलियन टन एलपीजीचा वापर करतो, त्यामुळे ही टंचाई दूर करणे सरकारपुढील मोठे आव्हान आहे.

LPG Gas Shortage : भारताला बसली युद्धाची झळ! LPG गॅसचा आढावा घेण्यासाठी टास्क फोर्सची स्थापना

Web Title: Fuel shortage looms large prime minister calls emergency meeting

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 10, 2026 | 04:43 PM

Topics:  

  • Central Governement
  • Iran Israel Conflict
  • LPG
  • PM Narendra Modi

संबंधित बातम्या

Modi Mimicry : मोदींच्या मिमिक्रीमुळे रंगला राजकीय वाद! ‘इंदूरचा कार्यक्रम बालिशपणाचा’ म्हणत प्रफुल्ल पटेलांची राहुल गांधींवर टीका
1

Modi Mimicry : मोदींच्या मिमिक्रीमुळे रंगला राजकीय वाद! ‘इंदूरचा कार्यक्रम बालिशपणाचा’ म्हणत प्रफुल्ल पटेलांची राहुल गांधींवर टीका

Devendra Fadnavis on Rahul Gandhi : ‘राहुल गांधींनी पक्ष सोडून स्टँडअप कॉमेडियन व्हावं’; मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा घणाघात
2

Devendra Fadnavis on Rahul Gandhi : ‘राहुल गांधींनी पक्ष सोडून स्टँडअप कॉमेडियन व्हावं’; मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा घणाघात

Sindhudurg News : सावंतवाडीत ‘सेवा संकल्प अभियान’ला सुरुवात; आरोग्य तपासणीसह नागरिकांसाठी विविध उपक्रम
3

Sindhudurg News : सावंतवाडीत ‘सेवा संकल्प अभियान’ला सुरुवात; आरोग्य तपासणीसह नागरिकांसाठी विविध उपक्रम

Dombivli News : मोदींच्या वाढदिवसानिमित्त डोंबिवलीत ‘आशीर्वादाचा दिवा’, रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते ‘सेवा संकल्प अभियान’ सुरु
4

Dombivli News : मोदींच्या वाढदिवसानिमित्त डोंबिवलीत ‘आशीर्वादाचा दिवा’, रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते ‘सेवा संकल्प अभियान’ सुरु

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.