
मोदी सरकारने तिजोरी उघडली! ८.८ लाख कोटींच्या ६ मोठ्या प्रकल्पांना मंजुरी (Photo Credit- X)
मंत्रिमंडळाच्या निर्णयांची माहिती देताना केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, ‘जल जीवन मिशन’ आता एका नव्या टप्प्यात प्रवेश करत आहे. या मोहिमेला २०२८ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून त्याचे बजेट ८.७० लाख कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात आले आहे.
#WATCH | Delhi | Union Minister Ashwini Vaishnaw says, “Today six big discussions were held in today’s cabinet… All these decisions are worth about Rs 8,80,000 crore. These are the Jal Jeevan Mission 2.0, Declaring Madurai airport as an international airport, making the fourth… pic.twitter.com/nc2MJHTdHK — ANI (@ANI) March 10, 2026
आता केवळ पायाभूत सुविधा निर्माण करण्यापेक्षा, ती सेवा लोकांपर्यंत कशी पोहोचते, यावर भर दिला जाणार आहे. या प्रकल्पाचे संपूर्ण पुनर्गठन करण्यात आले असून, ऑपरेशन्स आणि मेंटेनन्समध्ये स्थानिक समुदायांचा सहभाग वाढवण्यात येणार आहे.
पारदर्शकता आणि उत्तरदायित्व सुनिश्चित करण्यासाठी सरकारने “सुजलम भारत” नावाचा राष्ट्रीय डिजिटल आराखडा तयार केला आहे.
निवडणूक असलेल्या तामिळनाडू राज्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मदुराई विमानतळाला आता आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून घोषित करण्यात आले आहे. यामुळे मीनाक्षी अम्मान मंदिर, रामेश्वरम आणि इतर धार्मिक स्थळांसाठी जागतिक हवाई संपर्क वाढणार आहे. यामुळे केवळ पर्यटनालाच नव्हे, तर स्थानिक रबर, रसायन, ग्रॅनाइट आणि ऑटोमोबाईल उद्योगांनाही मोठी चालना मिळणार आहे.
१. जेवर विमानतळ कनेक्टिव्हिटी: उत्तर प्रदेशातील जेवर विमानतळाला फरीदाबादशी जोडण्यासाठी ३,६३१ कोटी रुपयांच्या ‘एलिवेटेड रोड’ला मंजुरी देण्यात आली आहे.
२. पश्चिम बंगाल रस्ते विकास: संतरागाछी ते खरगपूर दरम्यानच्या रस्त्याचे चौपदरीकरण करण्यासाठी २,९०५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
३. NH 752 अपग्रेडेशन: बदनावर-पेटलावद-थांदला-टिमरवानी खंडाच्या चौपदरीकरणासाठी ३,८३९ कोटी रुपयांच्या खर्चाला मंत्रिमंडळाने संमती दिली आहे.