
PM Narendra Modi extended 77th Republic Day wishes through a social media post.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन 77 व्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान मोदींनी लिहिले की, प्रजासत्ताक दिनाच्या सर्व देशवासियांना खूप खूप शुभेच्छा. भारताच्या अभिमानाचे आणि वैभवाचे प्रतीक असलेला हा राष्ट्रीय सण तुमच्या सर्वांच्या आयुष्यात नवीन ऊर्जा आणि उत्साह निर्माण करो. विकसित भारताचा संकल्प आणखी दृढ होवो, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे.
सभी देशवासियों को गणतंत्र दिवस की बहुत-बहुत बधाई। भारत की आन-बान और शान का प्रतीक यह राष्ट्रीय महापर्व आप सभी के जीवन में नई ऊर्जा और नए उत्साह का संचार करे। विकसित भारत का संकल्प और अधिक सुदृढ़ हो, यही कामना है। — Narendra Modi (@narendramodi) January 26, 2026
हे देखील वाचा : ई-गव्हर्नन्स कार्यक्रमात कोण ठरले नंबर वन? CM फडणवीसांनी केली यादी जाहीर
पंतप्रधानांनी २०२६ च्या पद्म पुरस्कार विजेत्यांचेही केले अभिनंदन
पंतप्रधान मोदींनी सर्व पद्म पुरस्कार विजेत्यांचे राष्ट्रासाठी त्यांच्या उत्कृष्ट योगदानाबद्दल अभिनंदन केले. विविध क्षेत्रातील पुरस्कार विजेत्यांचे उत्कृष्टता, समर्पण आणि सेवा समाजाच्या जडणघडणीला समृद्ध करते असे पंतप्रधानांनी सांगितले आपल्या राष्ट्रासाठी त्यांच्या उत्कृष्ट योगदानाबद्दल सर्व पद्म पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन. विविध क्षेत्रातील त्यांची उत्कृष्टता, समर्पण आणि सेवा आपल्या समाजाची जडणघडण समृद्ध करते. हा सन्मान वचनबद्धता आणि उत्कृष्टतेच्या भावनेचे प्रतिबिंब आहे जो येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा देत राहतो, अशा भावना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केल्या आहेत.
हे देखील वाचा : महाराष्ट्र हा भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा…! CM फडणवीसांनी दिल्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा