देवेंद्र फडणवीसांनी ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमाचे विजेते जाहीर केले आहे (फोटो - सोशल मीडिया)
याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘एक्स’ वर पोस्ट माहिती दिली आहे. राज्यातील नागरिकांना त्यांनी प्रजासत्ताक दिनाच्याशुभेच्छा दिल्या असून, ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमातील विजेत्या कार्यालयांचे अभिनंदन केले आहे. त्यांनी लिहिले आहे की, 150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांनी केलेल्या कामगिरीचे अंतिम मूल्यमापन भारतीय गुणवत्ता परिषद (Quality Council of India) तर्फे करण्यात आले. कार्यालयाची वेबसाईट, आपले सरकार प्रणाली, ई-ऑफीस, कार्यालयाचा डॅशबोर्ड, व्हॉट्सऍप चॅटबॉट, AI व Blockchain चा शासकीय कामकाजात वापर आणि GIS चा कामात वापर अशा 7 सर्वंकष मुद्यांवर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कार्यालयांची निवड आज प्रजासत्ताक दिनी जाहीर करताना अतिशय आनंद होत आहे, अशा भावना फडणवीसांनी व्यक्त केल्या आहेत. त्याचबरोबर निकाल जाहीर केला आहे.
हे देखील वाचा : महाराष्ट्र हा भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा…! CM फडणवीसांनी दिल्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा
काय आहे निकाल?
ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत राज्यातील सर्वोत्कृष्ट कार्यालये: –
पुढे देवेंद्र फडणवीस यांनी लिहिले आहे की, उपरोक्त विविध संवर्गातील राज्यातील उत्कृष्ट कार्यालयांची नावे सोबत जोडली आहेत. (उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जिल्हा परिषदांची नावे दि. 8 फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात येतील.) 150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स कार्यक्रमात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या या सर्व कार्यालयांचे प्रमुख आणि त्यांच्या चमूचे हार्दिक अभिनंदन! सर्व विजेत्यांचा लवकरच राज्य शासनातर्फे गौरव करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
सर्वांना प्रजासत्ताक दिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा! 150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांनी केलेल्या कामगिरीचे अंतिम मूल्यमापन भारतीय गुणवत्ता परिषद (Quality Council of India) तर्फे करण्यात आले. कार्यालयाची वेबसाईट, आपले सरकार… pic.twitter.com/lNajc9FRnC — CMO Maharashtra (@CMOMaharashtra) January 26, 2026






