
Narendra Modi : 2014 आधी काँग्रेस 'फोन बँकिंग'ने देशाची अर्थव्यवस्था चालवायचे, पंतप्रधानांचा काँग्रेसवर प्रहार
ओडिशाच्या भुवनेश्वरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi)यांनी रविवारी भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नवस्थापित डेटा सेंटर आणि सायबर सुरक्षा प्रशिक्षण संस्थेचे उद्घाटन केले. यावेळी ते म्हणाले की, आज भुवनेश्वर नव्या भारताला एक नव्या संस्था देत आहे. भुवनेश्वरमध्ये आरबीआयचं डेटा सेंटर आणि सायबर सिक्युरिटी ट्रेनिंग इन्स्टीट्यूटचं उद्घाटन एक महत्त्वपूर्ण बाब आहे. हे ओडिशा आणि देशातील लोकांसाठी खूपच हिताचे ठरणार आहे.
ते पुुढे म्हणाले की, मी या प्रकल्पाशी निगडीत सर्वांना शुभेच्छा देतो. आजचा हा कार्यक्रम भारतातील प्रशासनाची कार्यपद्धती आणि दृष्टिकोन कशा प्रकारे आणि किती वेगाने बदलत आहेत, याचा पुरावा आहे. आमचे ध्येय आहे की, विकासाची प्राथमिकता, विस्तार आणि शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहचणे. स्वातंत्र्यानंतर देशात मोठ-मोठ्या शहरांचा विकास झाला, मोठ्या संस्था बनल्या, मोठे रुग्णालय, मोठे विमानतळ बनले, पण देशातील एक खूप मोठा भाग पायाभूत सुविधांची अद्याप वाट पाहत आहे.
दिल्लीत मोठे रुग्णालय होते, पण छोट्या शहरांप्रमाणेच ग्रामीण भागातील लोकांना उपचारासाठी पायपीट करावी लागत होती. मोठ्या शहरांमध्ये विमान प्रवासाची सुविधा होती, पण छोट्या शहरांमध्ये एअर कनेक्टिविटीशी जोडण्यावर जास्त लक्ष केंद्रीत नव्हते. रेल्वे मार्गच सर्वसाधारण प्रवाशांचा महत्त्वपूर्ण भाग होता, पण तिथेही आधुनिक सुविधांचा अभाव होता. म्हणजेच विकासाचा लाभ देशातील प्रत्येक क्षेत्र व नागरिकापर्यंत पोहचवणे आमच्यासाठी मोठे आव्हान होते. आम्ही तेच बदलण्याचा प्रयत्न केला.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, आमच्यासाठी विकासाचा अर्थ भारताचा संतुलित विकास आणि गावांसाठी संधी निर्माण करणे. आमचे लक्ष्य आहे की, गरिब कुटुंबाला सन्मानासह जीवन जगण्याच्या सुविधा मिळाव्या. प्रत्येक नागरिकामध्ये हा विश्वास निर्माण करणे की, विकासाच्या या प्रवासात तो मागे राहणार नाही.
आज देशातील एक्स्प्रेस वे छोट्या शहरांनाही जोडण्यात येत आहेत. एम्स सारखे संस्था छोट्या शहरापर्यंतही पोहचल्या. गावागावांत पावने दोन लाख आयुष्यमान आरोग्य मंदीर सुरू करण्यात आले. ग्रामीण भागातही डिजिटल कनेक्टिविटीचा विस्तार होत आहे. हाच प्रशासनाच्या कार्यपद्धतीचा मुख्य हेतू आहे, तो म्हणजे नागरिकांचे जगणे सोप्पे बनवणे आणि त्यांच्या स्वप्नांना नवी संधी देणे.
काँग्रेसच्या कार्यपद्धतीवर टीका करताना पंतप्रधान म्हणाले की, सामान्य कुटुंबियांना अनेक दशकं सुविधांपासून वंचित राखण्यात आले. त्याचे एक मोठं उदाहरण म्हणजे बँकिंग सेक्टर आहे. गरिबांच्या नावाने 60-70 च्या दशताक बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले, पण 2014 पर्यंत देशातील अर्धी जनता बँकिंग सिस्टमच्या बाहेर होती.
ते पुढे म्हणाले की, आज भारतात डिजिटल बँकिंगने सर्वांना 24 तास बँकिंग सिस्टमशी जोडले आहे. परंतु 2014 च्या आधी वेगळ्याच फोन बँकिंगचा काळ होता. दिल्लीत काँग्रेसच्या काही खास लोकांना आणि कनेक्शन असलेल्यांना फोन बँकिंगच्या आधारे हजारो, करोडो रुपयांचे कर्ज दिले जायचे, पण गरीब व्यक्तीला बँकेत खाते खोलण्यासाठी गॅरंटरची गरज पडायची.
काँग्रेसच्या फोन बँकिंग स्कीममध्ये श्रीमंतांसाठी हजारो, करोडो रुपये नेहमीच उपलब्ध असायचे, ज्यामुळे भारताची बँकिंग प्रणाली ही एनपीएच्या अख्यारितेत गेली. कोणत्याही बदलासाठी विचार चांगले असायला हवे. नियत साफ हवी. इच्छाशक्ती हवी, तेव्हा अशक्य वाटणारे काम शक्य होते.
Ans: भारताचा संतुलित विकास करणे, ग्रामीण भागात संधी निर्माण करणे आणि प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जगण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे, हा विकासाचा अर्थ असल्याचे मोदी यांनी सांगितले.
Ans: आरोग्य सुविधा, महामार्ग, हवाई वाहतूक आणि डिजिटल कनेक्टिव्हिटीचा ग्रामीण भागात विस्तार करण्यावर भर देण्यात आला आहे.
Ans: फोन बँकिंगचे दोन अर्थ असू शकतात. सामान्य अर्थाने फोनद्वारे बँकिंग सेवा वापरणे; तर राजकीय आणि आर्थिक संदर्भात प्रभावशाली व्यक्तींच्या शिफारशीवरून बँकांकडून कर्ज मंजूर करून घेण्याच्या कथित पद्धतीला ‘फोन बँकिंग’ म्हटले जाते.