Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pahalgam Terror Attack: पर्यटकांवर दहशतवादी हल्ला अन् PM मोदींनी सूत्र फिरवली; अमित शहांना फोनवरून थेट…

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदी यांनी फोनवरून या घटनेचा आढावा घेतला आहे. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी फोनवरून चर्चा देखील केली असल्याचे समजते आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 22, 2025 | 09:23 PM
Pahalgam Terror Attack: पर्यटकांवर दहशतवादी हल्ला अन् PM मोदींनी सूत्र फिरवली; अमित शहांना फोनवरून थेट…
Follow Us
Close
Follow Us:

पहलगाम: टीआरएफ या दहशतवादी संघटनेने पहलगाम येथे पर्यटकांच्या एक समूहावर हल्ला केला आहे. पोलिस गणवेश परिधान करून आलेल्या दहशतवाद्यांनी पर्यटकांना त्यांची नावे विचारली. त्यांचे ओळखपत्रे तपासली. त्यानंतर ते मुस्लिम नसल्याचे समजताच दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला. दरम्यान सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान मोदी यांनी गंभीर दखल घेत, तातडीने सूत्र फिरवली आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदी यांनी फोनवरून या घटनेचा आढावा घेतला आहे. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी फोनवरून चर्चा देखील केली असल्याचे समजते आहे. या प्रकरणी आवश्यक ती सर्व पावले उचलण्याचे निर्देश मोदी यांनी शहा यांना दिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत शोक देखील व्यक्त केला आहे.

पंतप्रधान मोदींचे ट्वीट काय? 

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध करतो. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे त्यांच्याबद्दल संवेदना व्यक्त करतो.  जखमी झालेले नागरिक लवकरात लवकर बरे व्हावेत अशी मी प्रार्थना करतो.

I strongly condemn the terror attack in Pahalgam, Jammu and Kashmir. Condolences to those who have lost their loved ones. I pray that the injured recover at the earliest. All possible assistance is being provided to those affected. Those behind this heinous act will be brought… — Narendra Modi (@narendramodi) April 22, 2025

बाधितांना सर्वतोपरी मदत केली जात आहे. या घृणास्पद कृत्यामागील लोकांना शिक्षा होईल. त्यांना सोडले जाणार नाही! त्यांचा दुष्ट अजेंडा कधीही यशस्वी होणार नाही. दहशतवादाविरुद्ध लढण्याचा आपला निर्धार अढळ आहे आणि तो आणखी मजबूत होईल.

महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू 

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील दोन पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. पोलिस युनिफॉर्ममध्ये आलेल्या दहशतवाद्यांनी तिथे बसलेल्या पर्यटकांना त्यांची नावे विचारली. ते पर्यटक मुस्लिम नसल्याचे समजताच त्यांनी गोळीबार सुरू केला. बैसरन खोऱ्यात दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेल्या लोकांनी सांगितले की, दहशतवाद्यांच्या एका गटाने मॅगी खाणाऱ्या पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला. पर्यटकांना त्यांची नावे विचारून दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला.

JK Terror Attack: ‘तो मुस्लिम नाहीये, त्याला…’; पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यात 27 पर्यटकांचा मृत्यू

दरम्यान या भ्याड हल्ल्यात आतापर्यंत 27 पर्यटकांचा मृत्यू झाल्याचे समोर येत आहे. यामध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचा समावेश आहे. हा हल्ला होताच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तातडीने जम्मू-काश्मीरला रवाना झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या घटनेचा निषेध केला आहे. दहशतवाद्यांनी पर्यटकांना त्यांची नावे विचारून त्यांच्यावर गोळीबार केला.

भारतीय लष्कराचे पथक पहलगांम परिसरात पोहोचले असून, या भागात दहशतवाद्यांचा शोध घेतला जात आहे. ज्या पर्यटकांवर हल्ला जल आहे ते पर्यटक राजस्थानचे असल्याचे समजते आहे. पाकिस्तानचे लष्कर पप्रमुखांनी हिंदूंच्या विरोधात वादग्रस्त भाषण केले होते. त्यानंतर लगेचच पर्यटकांवर हल्ला झाला आहे. हा हल्ला कोणत्या दहशतवादी संघटनेने केला आहे हे अद्याप समोर आलेले नाही.

Web Title: Pm narendra modi take information about pahlgam terror attack on tourist amit shaha visit jk marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 22, 2025 | 09:14 PM

Topics:  

  • amit shaha
  • indian army
  • PM Narendra Modi
  • terror attack

संबंधित बातम्या

Khaleda Zia: PM मोदींचा ‘तो’ खास संदेश! खालिदा झियांचे सुपुत्र तारिक रहमान व S. Jaishankar यांच्या भेटीने जागतिक राजकारणात खळबळ
1

Khaleda Zia: PM मोदींचा ‘तो’ खास संदेश! खालिदा झियांचे सुपुत्र तारिक रहमान व S. Jaishankar यांच्या भेटीने जागतिक राजकारणात खळबळ

PM Modi on Budget 2026: २०२६-२७ अर्थसंकल्पाची तयारी अंतिम टप्प्यात; PM मोदी यांनी घेतली अर्थतज्ज्ञांची भेट
2

PM Modi on Budget 2026: २०२६-२७ अर्थसंकल्पाची तयारी अंतिम टप्प्यात; PM मोदी यांनी घेतली अर्थतज्ज्ञांची भेट

Russia Ukraine War : युक्रेनच्या जखमेवर भारताने चोळले मीठ? झेलेन्स्की यांचा पंतप्रधान मोदींवर ‘हा’ गंभीर आरोप
3

Russia Ukraine War : युक्रेनच्या जखमेवर भारताने चोळले मीठ? झेलेन्स्की यांचा पंतप्रधान मोदींवर ‘हा’ गंभीर आरोप

India Politics: “एक-एक घुसखोराला हाकलवून…”; अमित शहांचा ममता बॅनर्जींवर प्रहार
4

India Politics: “एक-एक घुसखोराला हाकलवून…”; अमित शहांचा ममता बॅनर्जींवर प्रहार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.