जम्मू काश्मीरमध्ये पर्यटकांवर दहशतवादी हल्ला (फोटो -सोशल मिडिया/pti )
श्रीनगर: जम्मू काश्मीरमधील पर्यटकांच्या एका गटावर दहशतवाद्यांचा हल्ला झाला आहे. या हल्ल्यात ५ पर्यटक जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. दहशतवाद्यांनी हा हल्ला धर्माच्या आधारावर करण्यात आल्याचे म्हटले आहे. या हल्ल्याची जबाबदारी टीआरएफ संघटनेने घेतल्याचे म्हटले जात आहे.
पोलिस युनिफॉर्ममध्ये आलेल्या दहशतवाद्यांनी तिथे बसलेल्या पर्यटकांना त्यांची नावे विचारली. ते पर्यटक मुस्लिम नसल्याचे समजताच त्यांनी गोळीबार सुरू केला. बैसरन खोऱ्यात दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेल्या लोकांनी सांगितले की, दहशतवाद्यांच्या एका गटाने मॅगी खाणाऱ्या पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला. पर्यटकांना त्यांची नावे विचारून दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला.
ये सिर्फ जम्मू कश्मीर पर आतंकी हमला नहीं है पूरे देशवासियों पर हमला है।
पता नहीं कब तक ऐसा चलेगा।#Pahalgam#PahalgamTerroristAttack
pic.twitter.com/iPgEh73AOw— Rahul Bihari 🇮🇳 (@Rahulbihariii) April 22, 2025
दरम्यान या भ्याड हल्ल्यात आतापर्यंत 27 पर्यटकांचा मृत्यू झाल्याचे समोर येत आहे. यामध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचा समावेश आहे. हा हल्ला होताच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तातडीने जम्मू-काश्मीरला रवाना झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या घटनेचा निषेध केला आहे. दहशतवाद्यांनी पर्यटकांना त्यांची नावे विचारून त्यांच्यावर गोळीबार केला.
भारतीय लष्कराचे पथक पहलगांम परिसरात पोहोचले असून, या भागात दहशतवाद्यांचा शोध घेतला जात आहे. ज्या पर्यटकांवर हल्ला जल आहे ते पर्यटक राजस्थानचे असल्याचे समजते आहे. पाकिस्तानचे लष्कर पप्रमुखांनी हिंदूंच्या विरोधात वादग्रस्त भाषण केले होते. त्यानंतर लगेचच पर्यटकांवर हल्ला झाला आहे. हा हल्ला कोणत्या दहशतवादी संघटनेने केला आहे हे अद्याप समोर आलेले नाही.
पहलगाममध्ये पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाल्यावर भारतीय लष्कर अलर्ट मोडमध्ये आले आहे. लष्कराने संपूर्ण परिसराला वेढा घातला आहे. सर्च ऑपरेशन राबवले जात आहे. सीआरपीएफच्या अनेक तुकड्या या भगत दाखल जाळ्यात आहे. मोठ्या प्रमाणात लष्कर येथे दाखल झाले आहे. दहशतवाद्यांचा वेगाने शोध घेतला जात आहे.