भारतासाठी आनंदाची बतमी आहे. भारताने अंतराळात मोठी झेप घेतली असून अंतराळवीर शुभांशू शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात पोहोचले आहेत. शुभांशू शुक्ला आणि त्यांच्या टीमला घेऊन जाणारे ड्रॅगन कॅप्सून देखील यशस्वीरित्या आयएसएसशी जोडले गेले आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभांशू शुक्ला यांच्याशी संवाद साधला आहे. त्याबाबत जाणून घेऊयात.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अंतराळात असणाऱ्या शुभांशू शुक्ला यांच्याशी संवाद साधला. याबाबत त्यांनी सोशल मिडिया एक्स वर पोस्ट देखील केली आहे. यामध्ये पंतप्रधान मोदी यांनी शुकला यांच्याशी संवाद साधल्याबबत सांगण्यात आले आहे. शुभांशू शुक्ला हे 14 दिवस अंतराळात वास्तव्य करणार आहेत.
काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
हा क्षण भारतासाठी अत्यंत अभिमानाचा आहे. शुभांशू शुक्ला तुम्हाला अंतराळात कसे वाटत आहे? तिथे तुम्हाला कसा अनुभव येत आहे?
काय म्हणाले शुभांशू शुक्ला?
अंतराळातून भारत देश पाहणे हा खूप अद्वितीय अनुभव आहे. तसेच आपल्या मातृभूमीला अंतराळातून पाहणे अत्यंत अभिमानास्पद आहे.
PM @narendramodi interacted with Group Captain Shubhanshu Shukla, who is aboard the International Space Station. pic.twitter.com/Q37HqvUwCd
— PMO India (@PMOIndia) June 28, 2025
ही मोहीम भारतासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. भारताचे विंग कमांडर राकेश यांच्यानंतर अंतराळात जाणारे दुसरे भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला ठरले आहेत. दोन आठवड्यांच्या कालावधीसाठी ही मोहीम असणार आहे. चारही अंतराळवीर १४ दिवस अंतराळात राहून विविध वैज्ञानिक, जैववैज्ञानिक आणि अभियांत्रिक प्रयोग करणार आहेत. या मोहिमेदरम्यान शुभांशू शुक्ला अंतराळात भारतीय संस्कृतीच्या विविध कलाकृतींचे आणि योगासनांचे सादरीकरण करणार आहेत.
28 तासांच्या प्रवासानंतर शुभांशू शुक्ला अंतराळात पोहोचले; आयएसएसला जोडले ड्रॅगन कॅप्सूल
या मोहिमेत शुभांशू शुक्ला यांच्यासह इतर तीन आंतरराष्ट्रीय अंतराळवीर नासाच्या अंतराळवीर आणि Ax-4 मोहिमेच्या प्रमुख पेगी व्हिटसन, तसेच पोलंडचे स्लावोस उजनास्की-विस्निवेस्की आणि हंगेरीचे तिबोर काबू सहभागी झाले आहेत.
दरम्यान शुभांशू शुक्ला अंतराळात पोहचल्यानंतर त्यांच्या वडिलांनी आनंद व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटले की, “आम्हाला खूप आनद होत आहे. मी देवाचे यशस्वी डॉकिंगबद्दल आभार मानतो. आम्हाला आमच्या मुलाचा खूप अभिमान आहे.”
शुभांशू शुक्ला यांनी अंतराळात पोहोचल्यानंतर त्यांनी देशवासियांना नमस्कार केला होता. त्यांनी म्हटले की, “अंतराळातून नमस्कार! मला खूप आनंद होत आहे. माझ्या सहकारी अंतराळवीरांसह मला एक अद्वितीय क्षण अनुभवायला मिळत आहे. ”शुभांशू यांनी त्यांचा हा प्रवास भारताच्या मानवी अंतराळ कार्यक्रमासाठी आणि आगामी मोहीमेसाठी एक सकारात्मक आणि मोठे पाऊल असल्याचे म्हटले.