28 तासांच्या प्रवासानंतर शुभांशू शुक्ला अंतराळात पोहोचले, आयएसएसला जोडले ड्रॅगन कॅप्सूल
भारतासाठी आनंदाची बतमी आहे. भारताने अंतराळात मोठी झेप घेतली असून अंतराळवीर शुभांशू शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात पोहोचले आहेत. शुभांशू शुक्ला आणि त्यांच्या टीमला घेऊन जाणारे ड्रॅगन कॅप्सून देखील यशस्वीरित्या आयएसएसशी जोडले गेले आहे. गुरुवारी दुपारी ४ वाजता शुंभांशू शुक्ला यांचे ड्रॅगन कॅप्सूल आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात पोहोचले. २८ तासांच्या प्रवासानंतर शुभांशू शुक्ला यांच्या ड्रॅगन कॅप्सूलची सध्या डॉकिंग प्रक्रिया सुरु आहे.
अमेरिकेच्या स्पेसएक्स आणि अॅक्सिओम स्पेस यांच्या अॅक्सिओम -4 मोहिमेअंतर्गत अंतराळात बुधवारी २५ जून रोजी शुभांशू शुक्ला यांनी आपल्या टीमसह उड्डाण केले होते. नासाच्या फ्लोरिडातील केनेडी स्पेस सेंटरमधून त्यांनी उड्डाण केले. स्पेसएक्सच्या फाल्कन-९ रॉकेटचा यामध्ये वापरण्यात आले आहे.
LIVE: @Axiom_Space‘s #Ax4 mission is scheduled to dock with the @Space_Station at approximately 6:30am ET (1030 UTC). Watch with us as the multinational crew starts their two-week stay aboard the orbiting laboratory. https://t.co/NrThYrmRrN
— NASA (@NASA) June 26, 2025
ही मोहीम भारतासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. भारताचे विंग कमांडर राकेश यांच्यानंतर अंतराळात जाणारे दुसरे भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला ठरले आहेत. दोन आठवड्यांच्या कालावधीसाठी ही मोहीम असणार आहे. चारही अंतराळवीर १४ दिवस अंतराळात राहून विविध वैज्ञानिक, जैववैज्ञानिक आणि अभियांत्रिक प्रयोग करणार आहेत. या मोहिमेदरम्यान शुभांशू शुक्ला अंतराळात भारतीय संस्कृतीच्या विविध कलाकृतींचे आणि योगासनांचे सादरीकरण करणार आहेत.
या मोहिमेत शुभांशू शुक्ला यांच्यासह इतर तीन आंतरराष्ट्रीय अंतराळवीर नासाच्या अंतराळवीर आणि Ax-4 मोहिमेच्या प्रमुख पेगी व्हिटसन, तसेच पोलंडचे स्लावोस उजनास्की-विस्निवेस्की आणि हंगेरीचे तिबोर काबू सहभागी झाले आहेत.
दरम्यान शुभांशू शुक्ला अंतराळात पोहचल्यानंतर त्यांच्या वडिलांनी आनंद व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटले की, “आम्हाला खूप आनद होत आहे. मी देवाचे यशस्वी डॉकिंगबद्दल आभार मानतो. आम्हाला आमच्या मुलाचा खूप अभिमान आहे”
#WATCH लखनऊ: शुभांशु शुक्ला के पिता शंभू दयाल शुक्ला ने कहा, “हमें बहुत खुशी है। सफल डॉकिंग हुई है इसके लिए हम भगवान का धन्यवाद करते हैं। हमें ये देख कर बहुत अच्छा लगा। हमें अपने बच्चे पर गर्व है।”#AxiomMission4 https://t.co/aaDwNohKsc pic.twitter.com/s5iDgUVIZC
— ANI_HindiNews (@AHindinews) June 26, 2025
शुभांशू शुक्ला यांनी अंतराळात पोहोचल्यानंतर त्यांनी देशवासियांना नमस्कार केला होता. त्यांनी म्हटले की, “अंतराळातून नमस्कार! मला खूप आनंद होत आहे. माझ्या सहकारी अंतराळवीरांसह मला एक अद्वितीय क्षण अनुभवायला मिळत आहे. ”शुभांशू यांनी त्यांचा हा प्रवास भारताच्या मानवी अंतराळ कार्यक्रमासाठी आणि आगामी मोहीमेसाठी एक सकारात्मक आणि मोठे पाऊल असल्याचे म्हटले.