नवी दिल्ली: आज स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती. आज स्वातंत्र्यवीर सावरकरांची १४१ वी जयंती आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सावरकरांना नमन केले आहे. सोशल मिडिया ‘एक्स’वर पोस्ट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांना श्रद्धांजली वाहिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या पोस्टमध्ये सावरकरांना भारतमातेचे खरे सुपुत्र म्हटले आहे. तसेच त्यांनी आपल्या पोस्टमध्ये सावरकरांचे भारताच्या स्वातंत्र्यात असलेल्या अमूल्य योगदानाचे देखील स्मरण केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मिडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पोस्टमध्ये काय?
भारतमातेचे सुपुत्र स्वातंत्र्यवीर सावरकर यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरपूर्वक श्रद्धांजली. परकीय सरकारने केलेल्या कठोर छळाने देखील त्यांची मातृभूमीवरील भक्ती अजिबात कमी झाली नाही. स्वातंत्र्याच्या आंदोलनाूतील त्यांचे अद्भुत साहस आणि त्यांचा त्याग आणि संघर्ष कृतज्ञ राष्ट्र कधीही विसरू शकत नाही.
भारत माता के सच्चे सपूत वीर सावरकर जी को उनकी जन्म-जयंती पर आदरपूर्ण श्रद्धांजलि। विदेशी हुकूमत की कठोर से कठोर यातनाएं भी मातृभूमि के प्रति उनके समर्पण भाव को डिगा नहीं पाईं। आजादी के आंदोलन में उनके अदम्य साहस और संघर्ष की गाथा को कृतज्ञ राष्ट्र कभी भुला नहीं सकता। देश के लिए… pic.twitter.com/3OsxSN905I
— Narendra Modi (@narendramodi) May 28, 2025
स्वातंत्र्यवीर सावरकरांचा त्याग आणि समर्पण विकसित भारताच्या निर्मितीमध्ये नेहमीच मार्गदर्शक ठरत राहील.
ब्रिटीशांंच्या अनैतिकतेला पुरुन उरणारं नाव म्हणजे सावरकर
“देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो, आणि या देशाचे आपण देणं लागतो”, हे वाक्य ऐकलं किंवा वाचलं की एक नाव आपसूकचं आठवतं, ते नाव म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. सावरकरांची आज 141वी जयंती. ब्रिटीशांचा जुलुम आणि गुलामी दिडशे वर्ष देशाने झेलला होता. या ब्रिटीशांच्या जाचाविरुद्ध अनेक क्रांतिकारकांनी बंड पुकारलं. केवळ बंड पुकारलंच नाही तर साम, दाम, दंड, भेद या मार्गांचा अवलंब करत मातृभूमीचा उद्धार करण्यासाठी प्राणांची बाजी या क्रातिकारकांनी लावली आणि त्यातले एक नाव म्हणजे स्वातंत्र्यावीर सावरकर. मातृभूमीवरील अपार प्रेम आणि ब्रिटीशांंच्या अनैतिकतेला पुरुन उरणारं नाव म्हणजे सावरकर.
अंंदमानच्या काळ्या पाण्याची शिक्षा किंवा जन्मठेप सावकरांचं धाडस, प्राण हातावर घेऊन निडर लढण्याची वृत्ती या सगळ्या गोष्टी प्रेरणादायी आहेत. देशाच्या स्वातंत्र्यासाठी सावरकर शस्त्रानिशी लढले खरे पण हे शस्त्र फक्त ब्रिटीशांना किंवा देशद्रोहींना रक्तबंबाळ करणारंच नव्हे, तर देशवासियांना आपल्या अस्तित्वाची आणि आपल्या मातृभूमी वरील प्रेम जागृत करणारं देखील शस्त्र होतं आणि ते शस्त्र म्हणजे सावरकरांची लेखणी. सावरकरांचं देशाप्रति किती प्रेम होतं याची साक्ष सावरकरांचं वाड्मय देतं. स्वातंत्र्यवीर सावरकर हे फक्त क्रांतिकारकच नव्हते, तर ते वीरकवी देखील होते.