
पंतप्रधान मोदींच्या हस्ते भव्य राममूर्तीचे अनावरण
श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी जिवोत्तम मठाला 550 वर्षे पूर्ण
77 फुटांची मूर्ती आशियातील सर्वात मोठी मूर्ती असणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गोवा राज्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी गोवा दौऱ्यात श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी जिवोत्तम मठामध्ये भेट दिली. या मठाला 550 वर्षे पूर्ण झाली आहेत. या मठाच्या परिसरात आज एक ऐतिहासिक सोहळा पार पडला. मठाच्या 550 वर्षपूर्तीनिमित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भव्य श्री राम मूर्तीचे अनावरण केले.
मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामांच्या 77 फूट उंच भव्य मूर्तीचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. भगवान श्रीरामांची ही मूर्ती आशिया खंडातील सर्वात भव्य मूर्ती असणार आहे. यामुळे काणाकोन भागाच्या विकासाला मदत होणार आहे. या परिसराचा धार्मिक पर्यटन म्हणून विकास होणार आहे.
#WATCH | Goa | Prime Minister Narendra Modi unveiled a 77-foot statue of Lord Ram made up of bronze at Shree Samsthan Gokarn Partagali Jeevottam Math. The Prime Minister is visiting the math on the occasion of ‘Sardha Panchashatamanotsava’, the 550th-year celebration of the… pic.twitter.com/LgSQEvASbc — ANI (@ANI) November 28, 2025
श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी जिवोत्तम मठाच्या परिसरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या सोहळ्याला गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि अन्य वरिष्ठ नेते उपस्थित होते. प्रभू श्रीरामांची मूर्ती शिल्पकार राम सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. या मूर्तीच्या परिसरात संग्रहालय देखील उभारले जाणार आहे.
नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिरावर ध्वजारोहण
अखेर ५०० वर्षांची प्रतीक्षा संपली असली असून अयोध्येत बांधलेल्या भव्य श्री राम जन्मभूमी मंदिराच्या शिखरावर भगवा ध्वज फडकवण्यात आला आहे. पंतप्रधान मोदींनी शुभ मुहूर्तावर २२ फूट लांब, ११ फूट रुंद आणि अंदाजे ३ किलो वजनाचा धर्मध्वज फडकवला. यावेळी पंतप्रधान मोदींनी सांगितले की, “आज, अयोध्या शहर भारताच्या सांस्कृतिक जाणिवेतील आणखी एक वळण पाहत आहे. श्री राम जन्मभूमी मंदिरात ध्वजारोहण सोहळ्याचा हा क्षण अद्वितीय आणि असाधारण आहे. हा धर्मध्वज केवळ एक ध्वज नाही… तो भारतीय संस्कृतीच्या पुनर्जागरणाचा ध्वज आहे. हा ध्वज संघर्षातून निर्माण झालेल्या निर्मितीची गाथा आहे, शतकानुशतके जुन्या स्वप्नांचे मूर्त स्वरूप आहे, संतांच्या आध्यात्मिक साधना आणि समाजाच्या सहभागाचा अर्थपूर्ण कळस आहे.”
पंतप्रधान मोदी म्हणाले, “आपण असा समाज निर्माण करूया जिथे गरिबी नसेल, कोणीही दुःखी किंवा असहाय्य नसेल. जे काही कारणास्तव मंदिरात येऊनही दूरवरून मंदिराच्या ध्वजाला आदरांजली वाहण्यास असमर्थ आहेत, त्यांनाही तेच पुण्य मिळते. हा धर्मध्वज या मंदिराच्या ध्येयाचे प्रतीक आहे. हा ध्वज दूरवरून राम लल्लाच्या जन्मस्थानाची झलक देईल. तो येणाऱ्या युगानुयुगे सर्व मानवजातीला श्री रामाच्या आज्ञा आणि प्रेरणा देईल. या अनोख्या प्रसंगी मी जगभरातील लाखो रामभक्तांना माझ्या शुभेच्छा देतो.”