Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chakan : स्थानिक बाजारपेठांना युद्धाच्या झळा; बाजारपेठेत मंदी, गॅस दरवाढ अन्…

अमेरिका–इस्त्राईल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचे परिणाम आता जागतिक स्तरावरच नव्हे तर स्थानिक बाजारपेठांपर्यंत पोहोचू लागले आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 07, 2026 | 04:46 PM
स्थानिक बाजारपेठांना युद्धाच्या झळा; बाजारपेठेत मंदी, गॅस दरवाढ अन्...

स्थानिक बाजारपेठांना युद्धाच्या झळा; बाजारपेठेत मंदी, गॅस दरवाढ अन्...

Follow Us
Follow Us:

चाकण/अतिश मेटे : अमेरिका–इस्त्राईल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचे परिणाम आता जागतिक स्तरावरच नव्हे तर स्थानिक बाजारपेठांपर्यंत पोहोचू लागले आहेत. त्याची झळ पुणे जिल्ह्यातील औद्योगिक शहर असलेल्या चाकण परिसरालाही बसू लागल्याचे चित्र दिसत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या दरात वाढ होण्याची शक्यता निर्माण झाल्याने वाहतूक खर्च वाढत असून, त्याचा थेट परिणाम गॅस पुरवठा, बांधकाम साहित्य, उद्योग तसेच शेतीमालाच्या बाजारभावांवर होत असल्याचे दिसून येत आहे.

 

सध्या घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात तब्बल ६० रुपयांची वाढ झाली असून, व्यावसायिक (कमर्शियल) गॅस सिलेंडरच्या दरात ११५ रुपयांची वाढ झाली आहे. या वाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांसह हॉटेल, ढाबे, खानावळी, मिठाई दुकाने तसेच लघुउद्योग आणि छोटे व्यवसाय करणाऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. वाढत्या खर्चामुळे अनेक व्यावसायिकांना खाद्यपदार्थांच्या दरात वाढ करण्याचा विचार करावा लागत आहे.

दरम्यान, चाकणमधील महात्मा जोतीराव फुले उपबाजार तसेच परिसरातील विविध भाजी मंडईतही या परिस्थितीचा परिणाम दिसू लागला आहे. बाजारात कांदा आणि बटाटाची मोठ्या प्रमाणावर आवक होत असली तरी मागणी घटल्याने दरात घसरण झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षित भाव मिळत नसल्याने आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.

यामध्ये आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे युद्धामुळे कांद्याच्या निर्यातीवर आलेले निर्बंध आणि एक्स्पोर्टमध्ये झालेली घट यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत अस्थिर परिस्थितीमुळे कांदा निर्यात मोठ्या प्रमाणावर कमी झाली असून, त्यामुळे स्थानिक बाजारात कांद्याचा साठा वाढत आहे. कांद्याला घाऊक बाजारात दहा रूपये किलो भाव मिळत असल्याने शेतकरी मेटकुला आला आहे. परिणामी आधीच कमी झालेला दर आणखी कोसळण्याची शक्यता निर्माण झाली असून, याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसत आहे.

शेतकऱ्यांवर आधीच बँक कर्ज, खत-बियाण्यांचा खर्च, मजुरी आणि वाहतूक खर्च यांचे मोठे ओझे आहे. अशा परिस्थितीत शेतीमालाला योग्य दर मिळत नसल्याने अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. काही शेतकऱ्यांना कर्जाचे हप्ते भरणेही कठीण होत असल्याने त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

बांधकामासाठी लागणाऱ्या स्टीलच्या दरात वाढ

बांधकाम क्षेत्रावरही या परिस्थितीचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. बांधकामासाठी लागणाऱ्या स्टीलच्या दरात सुमारे २ रुपयांनी वाढ झाल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगितले जात असून, सिमेंटच्या दरातही लवकरच वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे बांधकाम व्यावसायिक तसेच घर बांधण्याचे नियोजन करणाऱ्या नागरिकांच्या खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय परिस्थिती अधिकच तणावपूर्ण राहिल्यास पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. इंधन दर वाढल्यास वाहतूक खर्च वाढून त्याचा परिणाम भाजीपाला, फळे, अन्नधान्य तसेच इतर जीवनावश्यक वस्तूंच्या दरांवर होऊ शकतो. परिणामी सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन खर्चात आणखी वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

हे सुद्धा वाचा : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरुन काँग्रेस आक्रमक; ‘या’ तारखेला कळमनुरी ते हिंगोली पदयात्रा

वाहतूक अन् उत्पादन खर्च वाढण्याची शक्यता

चाकण परिसरात मोठ्या प्रमाणावर औद्योगिक वसाहत असून, येथे वाहन निर्मिती तसेच विविध उत्पादन उद्योग कार्यरत आहेत. जागतिक पुरवठा साखळीवर युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम झाल्यास कच्च्या मालाचा पुरवठा, वाहतूक खर्च आणि उत्पादन खर्च वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे उद्योग क्षेत्रातही आर्थिक ताण निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे. एकूणच अमेरिका–इस्त्राईल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या तणावपूर्ण परिस्थितीचा परिणाम आता स्थानिक स्तरावरही जाणवू लागला असून, बाजारपेठेतील मंदी, शेतीमालाच्या घसरलेल्या किमती, वाढती महागाई आणि बँक कर्जाचा ताण यामुळे शेतकरी, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणित विस्कटत असल्याचे चित्र चाकण परिसरात दिसून येत आहे.

Web Title: The ongoing war between america israel and iran has caused inflation in the market in chakan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 07, 2026 | 04:46 PM

Topics:  

  • Chakan News
  • CM Devedra Fadnavis
  • Iran-Israel War
  • PM Narendra Modi

संबंधित बातम्या

पुणे-लोणावळा लोहमार्गावरील तिसऱ्या-चौथ्या ट्रॅकच्या अहवालातील त्रुटी दुरुस्त करा; खासदार बारणेंची मागणी
1

पुणे-लोणावळा लोहमार्गावरील तिसऱ्या-चौथ्या ट्रॅकच्या अहवालातील त्रुटी दुरुस्त करा; खासदार बारणेंची मागणी

India Japan Summit: ‘धाकटी बहीण’ म्हणत मोदींनी जिंकले सनाए ताकाइची यांचे मन; संरक्षण, फार्मा आणि तंत्रज्ञानात मोठी भागीदारी
2

India Japan Summit: ‘धाकटी बहीण’ म्हणत मोदींनी जिंकले सनाए ताकाइची यांचे मन; संरक्षण, फार्मा आणि तंत्रज्ञानात मोठी भागीदारी

पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या मुख्यालयाचा मार्ग मोकळा; 50 एकर जागा मंजूर; परेड ग्राऊंडसह प्रशासकीय संकुल उभारणार
3

पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या मुख्यालयाचा मार्ग मोकळा; 50 एकर जागा मंजूर; परेड ग्राऊंडसह प्रशासकीय संकुल उभारणार

Sanae Takaichi: आशियात नव्या शक्तीचा उदय! मोदींच्या भेटीसाठी ताकाइची भारतात; इंडो-पॅसिफिकमध्ये ‘असे’ फिरणार जागतिक राजकारण
4

Sanae Takaichi: आशियात नव्या शक्तीचा उदय! मोदींच्या भेटीसाठी ताकाइची भारतात; इंडो-पॅसिफिकमध्ये ‘असे’ फिरणार जागतिक राजकारण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.