Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

PM Modi Speech : माझ्या नसांमध्ये रक्त नाही, गरम सिंदूर वाहतोय! बिकानेरमधून PM मोदी कडाडले

आता माझ्या नसांमध्ये रक्त नाही तर गरम सिंदूर वाहत आहे. जे सिंदूर पुसण्यासाठी निघाले होते त्यांना धूळ चारली आहे. आता मोदी भारताचे सेवक आहेत याचा पाकिस्तानला विसर पडला आहे, अशा भाषेत नरेंद्र मोदींनी पाकिस्तानला ठणकावलं.

  • By संदीप गावडे
Updated On: May 22, 2025 | 05:57 PM
माझ्या नसांमध्ये रक्त नाही, गरम सिंदूर वाहतोय! बिकानेरमधून PM मोदी कडाडले

माझ्या नसांमध्ये रक्त नाही, गरम सिंदूर वाहतोय! बिकानेरमधून PM मोदी कडाडले

Follow Us
Close
Follow Us:

आता माझ्या नसांमध्ये रक्त नाही तर गरम सिंदूर वाहत आहे. जे सिंदूर पुसण्यासाठी निघाले होते त्यांना धूळ चारली आहे. आता मोदी भारताचे सेवक आहेत याचा पाकिस्तानला विसर पडला आहे, अशा भाषेत पतंप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानला ठणकावलं. ते राजस्थानमधील बिकानेरमध्ये देशनोक आणि पलाना परिसरात एका विशाल सभेला संबोधित करत होते. ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच मोदी बिकानेर दौऱ्यावर आले आहेत. मोदींनी भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेबाबत, दहशतवादी हल्ल्यांचा बदला घेण्याबाबत पाकिस्तानला कडक संदेश दिला. पंतप्रधान मोदींच्या भाषणातील मुख्य मुद्दे जाणून घेऊया….

नॅशनल हेराल्ड प्रकरण; सोनिया गांधी, राहुल गांधींनी अफरातफर करून कमवले १४२ कोटी , ED चा दावा

१. करणी मातेचा आशीर्वादामुळे “विकसित भारत” च्या संकल्पणेला बळ

पंतप्रधान मोदींनी देशनोकमधील करणी माता मंदिराला भेट देऊन आपल्या दौऱ्याची सुरुवात केली. ते म्हणाले की, आज मी करणी मातेच्या चरणी नतमस्तक होऊन आणि त्यांचे आशीर्वाद घेत तुमच्यामध्ये आलो आहे. त्यांच्या आशीर्वादाने ‘विकसित भारत’ चा संकल्प अधिक मजबूत झाला आहे.

From Bikaner, launching projects aimed at augmenting rail infrastructure, connectivity, water and energy sectors. https://t.co/T7NkCweVrY

— Narendra Modi (@narendramodi) May 22, 2025

२. ‘ऑपरेशन सिंदूर’ नंतरची पहिली भेट

पाकिस्तानला फटकारताना पंतप्रधान म्हणाले की, भारत आता प्रत्येक दहशतवादी कृत्याला त्वरित आणि निर्णायक उत्तर देईल. जो कोणी भारतीयांच्या रक्ताशी खेळेल त्याला सोडले जाणार नाही. पहलगाम हल्ल्याबाबत ते म्हणाले की, २२ एप्रिलच्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून ९ दहशतवादी अड्डे अवघ्या २२ मिनिटांत उद्ध्वस्त करण्यात आले.

३. “रक्त नाही तर गरम सिंदूर वाहतोय

पंतप्रधान मोदी यांनी पाकिस्तानवर टीका केली. त्यांनी पाकिस्तानला इशारा दिला आणि म्हटले की, “आता माझ्या नसांमध्ये रक्त नाही तर गरम सिंदूर वाहत आहे. ज्यांनी सिंदूर पुसण्यासाठी निघालो होतो त्यांना धूळ चारण्यात आली आहे. पाकिस्तान विसरला आहे की आता भारतमातेचे सेवक मोदी खंबीरपणे उभे आहेत.”

४. दहशतवादाचा शस्त्र म्हणून वापर करण्याचा खेळ उघडकीस

जनसभेला संबोधित करताना पंतप्रधानांनी पाकिस्तानला फटकारले आणि म्हणाले की, पाकिस्तान कधीही भारताविरुद्ध थेट युद्ध जिंकू शकत नाही. म्हणूनच ते दहशतवादाचा सामरिक शस्त्र म्हणून वापर करते. पण आता ही रणनीती पाकिस्तानला महागात पडणार आहे.

५. पाकिस्तानशी फक्त पीओके आणि दहशतवादावरच चर्चा

मोदींनी स्पष्ट संदेश दिला आहे की आता पाकिस्तानशी फक्त पीओके आणि दहशतवादावरच चर्चा होईल. जर पाकिस्तानने दहशतवादी पाठवणे थांबवले नाही तर त्याला प्रत्येक पैशाची किंमत मोजावी लागेल.

६. १०३ रेल्वे स्थानकांचे उद्घाटन आणि बिकानेर-वांद्रे ट्रेनची भेट

यादरम्यान, पंतप्रधानांनी देशनोक येथून देशातील १०३ रेल्वे स्थानकांचे उद्घाटन केले, तसेच बिकानेर-वांद्रे सुपरफास्ट ट्रेनला ग्रीन सिग्नल दिला. “आता रेल्वेच्या आधुनिकीकरणात पूर्वीपेक्षा दीड पट जास्त गुंतवणूक केली जात असल्याचंही ते म्हणाले.

७. २६ हजार कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन

“आज राजस्थानमध्ये २६,००० कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे पायाभरणी आणि उद्घाटन करण्यात आले आहे. यामध्ये रेल्वे, सौर ऊर्जा, कनेक्टिव्हिटी आणि औद्योगिक पायाभूत सुविधांशी संबंधित योजनांचा समावेश आहे.

८. ‘पीएम सूर्यघर योजने’द्वारे सौरऊर्जेमध्ये स्वावलंबन

राजस्थानमध्ये ‘पीएम सूर्यघर मोफत वीज योजने’अंतर्गत ४० हजारांहून अधिक लोक जोडले गेले आहेत. यामुळे लोकांचे वीज बिल शून्य झाले आहे आणि त्यांना उत्पन्नाचा एक नवीन स्रोत मिळाला आहे.

PM मोदींचं जिनिव्हात भाषण : ‘वन वर्ल्ड फॉर हेल्थ’ थीमअंतर्गत जगासमोर मांडला भारताचा आरोग्यदृष्टीकोन

९. नाल एअरबेसचे संरक्षण

मी बिकानेरच्या नाल एअरबेसवर उतरलो, ज्याला पाकिस्तानने लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु तो अयशस्वी झाला. रहिमयार खान एअरबेस आयसीयूमध्ये आहे.

१०. राजस्थानची वीर भूमी देशभक्तीचा धडा शिकवते

राजस्थानच्या संस्कृती आणि इतिहासाला आदरांजली वाहिली आणि म्हणाले, “ही भूमी महाराजा गंगा सिंह सारख्या महापुरुषांची आहे, ज्यांनी वाळूत हिरवळ आणली. राजस्थान शिकवते की देश आणि देशवासीयांपेक्षा काहीही मोठे नाही, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

Web Title: Pm narendra modi warn pakistan on opretion sindoor in bikaner speech latest marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 22, 2025 | 04:57 PM

Topics:  

  • Opreation Sindoor
  • PM Modi Speech
  • PM Narendra Modi

संबंधित बातम्या

सी पी राधाकृष्णन यांनी केला उपराष्ट्रपती पदाचा उमेदवारी अर्ज दाखल; PM मोदी बनले प्रस्तावक
1

सी पी राधाकृष्णन यांनी केला उपराष्ट्रपती पदाचा उमेदवारी अर्ज दाखल; PM मोदी बनले प्रस्तावक

Online Gaming Bill: ऑनलाइन सट्टेबाजीवर केंद्र सरकारचा मोठा प्रहार! ‘या’ नवीन कायद्यामुळे खेळाडू आणि सेलिब्रेटींनाही बसेल चाप
2

Online Gaming Bill: ऑनलाइन सट्टेबाजीवर केंद्र सरकारचा मोठा प्रहार! ‘या’ नवीन कायद्यामुळे खेळाडू आणि सेलिब्रेटींनाही बसेल चाप

नरेंद्र मोदींना नाही राहिले नेहरुंचे स्मरण; म्हणून शरद पवारांना नाही भावले पंतप्रधानांचे भाषण
3

नरेंद्र मोदींना नाही राहिले नेहरुंचे स्मरण; म्हणून शरद पवारांना नाही भावले पंतप्रधानांचे भाषण

Tariff War: PM मोदींना आला पुतीनचा फोन; ट्रम्पशी काय झाले बोलणं? एक-एक गोष्ट अशी सांगितली की…
4

Tariff War: PM मोदींना आला पुतीनचा फोन; ट्रम्पशी काय झाले बोलणं? एक-एक गोष्ट अशी सांगितली की…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.