
Narendra Modi : अन् अचानक पंतप्रधान मोदी म्हणाले, योगीजींचे आभार माना
मुलींना घराच्या बाहेर पाठवण्याआधी कुटुंबाच्या मनात त्यांच्या सुरक्षिततेबाबत अनेक प्रश्न असतात. वाराणसीच्या एका महिला कर्मचारीने पंतप्रधान नरेंद्र मोदींना (Narendra Modi) सांगितले की, आता आमच्या गावात ही चिंता कमी होऊ लागली आहे. कुटुंब मुलींना नोकरीसाठी बाहेर पाठवण्यास तयार आहे. याचे कारण सांगताना तिने सुरक्षित वातावरणाचा उल्लेख केला. तिने याबाबत पंतप्रधानांचे आभार मानले, पण पंतप्रधान मोदींनी स्मितहास्याने सांगितले की, मग यासाठी योगीजींचे आभार माना. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
पंतप्रधानांचे उत्तर ऐकल्यानंतर त्या महिलेनेही स्मितहास्य देत धन्यवाद सर, सर्वांना धन्यवाद सर असे म्हटले. टाळ्यांच्या कडकडाटात झालेल्या या छोटाशा संवादाने महिला सुरक्षिततेबाबत योगी सरकारचे प्रयत्न आणि गावांतील वाढत्या विश्वासाला एकत्रितपणे समोर आणले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीत अरविंद गारमेंट कंपनीच्या नव्या संस्थेच्या उद्घाटनासाठी येथे आले होते. उद्घाटनानंतर त्यांनी येथे काम करणाऱ्या महिलांशी संवाद साधला. या काळात महिला कर्मचाऱ्यांनी सांगितले की, या कंपनीमुळे आम्हाला रोजगारांची संधी उपलब्ध झाली आहे. गावातील कुटुंबाच्या विचारांमध्येही बदल घडला आहे. आता आमची इच्छा आहे की, आमच्या मुलींनी घराबाहेर पडावे व रोजगार मिळवावा.
महिलेने या बदलामागील एक महत्त्वाचे कारण म्हणजे कार्यस्थळी मिळणारी सुरक्षितता असल्याचे सांगितले. महिला कर्मचाऱ्याने पंतप्रधानांना सांगितले, ‘सर, ही कंपनी सुरू झाल्यापासून गावातील लोकही जागरूक झाले आहेत. आपल्याही मुलीने घराबाहेर पडून काम करायला हवे, असा विचार आता लोक करू लागले आहेत. त्यामुळे या कंपनीचे मी मनापासून आभार मानते. या कंपनीमुळे आम्हाला घराबाहेर पडून काम करण्याची संधी मिळत आहे. कारण येथे सुरक्षितता खूप आहे. त्यामुळे आमच्या कुटुंबातील लोकही…’
या संवादातील विशेष बाब म्हणजे महिलेने कोणत्याही सरकारी योजनेचे नाव घेतले नाही किंवा आकडेवारी मांडली नाही. त्याऐवजी तिने आपल्या आजूबाजूच्या कुटुंबांमध्ये होत असलेल्या बदलांचा अनुभव सांगितला. सुरक्षिततेच्या मुद्द्यावर पंतप्रधानांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे नाव घेतल्याने हा सहज संवाद कार्यक्रमातील एक लक्षवेधी क्षण ठरला.
उत्तर प्रदेशात २०१७ नंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली महिला सुरक्षेला शासनाच्या प्रमुख प्राधान्यांमध्ये स्थान देण्यात आले. शाळा, महाविद्यालये आणि सार्वजनिक ठिकाणी महिलांची छेडछाड रोखण्यासाठी ‘अँटी रोमिओ स्क्वॉड’ सुरू करण्यात आले.
‘मिशन शक्ती’ अभियानाच्या माध्यमातून महिला आणि मुलींना सुरक्षा, सन्मान आणि स्वावलंबनाशी जोडण्यावर भर देण्यात आला. तसेच पोलीस ठाण्यांमध्ये महिला हेल्प डेस्क आणि प्रमुख सार्वजनिक ठिकाणी ‘पिंक बूथ’सारख्या सुविधाही सुरू करण्यात आल्या. महिलांच्या तक्रारींची दखल घेणे सोपे व्हावे आणि गरजेच्या वेळी त्यांना मदत मिळावी, हा या उपक्रमांचा उद्देश आहे. वाराणसीतील महिला कर्मचाऱ्याने सांगितलेला अनुभव या प्रयत्नांच्या मानवी पैलूवर प्रकाश टाकतो.
महिलेच्या म्हणण्यानुसार, सुरक्षित वातावरणाचा विश्वास निर्माण झाल्यामुळे कुटुंबे आपल्या मुलींना कामासाठी घराबाहेर पाठवण्यास पूर्वीपेक्षा अधिक तयार होत आहेत. ‘अरविंद गारमेंट’च्या नव्या युनिटमध्ये स्थानिक महिलांना प्रशिक्षणासह रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. घराजवळच काम मिळत असल्याने महिलांसाठी उत्पन्नाचे नवे मार्ग खुले झाले आहेत.
मात्र, या महिलेच्या बोलण्यातून नोकरी मिळण्याइतकीच कुटुंबाची संमतीही महत्त्वाची असल्याचे स्पष्ट झाले. मुलींना रोजगाराची संधी मिळाली आणि त्यांच्या सुरक्षिततेबाबत कुटुंबाला विश्वास वाटला, तर स्वावलंबी होण्याचा मार्ग अधिक सोपा होतो.
यामुळेच या महिलेने पंतप्रधानांसमोर रोजगाराच्या संधींपेक्षा गावांमध्ये बदलत असलेल्या मानसिकतेचा उत्साहाने उल्लेख केला. पंतप्रधान मोदी यांनीही तिच्या बोलण्यातून सुरक्षिततेचा मुद्दा अधोरेखित केला. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत त्यांनी केलेल्या एका वाक्यातून त्या विश्वासाचे महत्त्व स्पष्ट झाले. याच विश्वासाच्या बळावर गावांतील मुली घराची चौकट ओलांडून रोजगाराच्या क्षेत्रात पाऊल टाकत आहेत.
Ans: महिला कर्मचाऱ्याने सुरक्षित वातावरणामुळे गावातील कुटुंबांचा मुलींना नोकरीसाठी घराबाहेर पाठवण्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत असल्याचे सांगितले.
Ans: महिलेने सुरक्षिततेबद्दल पंतप्रधानांचे आभार मानल्यानंतर मोदींनी स्मितहास्याने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे आभार मानण्यास सांगितले.
Ans: कंपनीच्या नव्या युनिटमुळे स्थानिक महिलांना प्रशिक्षण आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत.