Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 18 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bengal Elections 2026: पहिल्या टप्प्यात चुरशीची लढत; ‘या’ दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

West Bengal Election 2026 Live: पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये १५२ जागांसाठी मतदान पार पडत आहे. यामध्ये राजकीय नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Apr 23, 2026 | 11:40 AM
Prestige of Trinamool Congress and BJP Leaders Is at Stake West Bengal Election Voting Updates 2026

Prestige of Trinamool Congress and BJP Leaders Is at Stake West Bengal Election Voting Updates 2026

Follow Us
Follow Us:
  • पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान पार
  • ममता बॅनर्जींसह भाजप नेत्यांमध्ये चुरशीची लढत
  • तृणमुल काँग्रेस व भाजपमधील अनेक नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
West Bengal Elections 2026: कोलकत्ता : पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून आज पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. तृणमुल काँग्रेस व ममता बॅनर्जी यांचा गड मानल्या जाणाऱ्या पश्चिम बंगालमध्ये सत्ता मिळवण्यासाठी भाजप (BJP Politics) पूर्ण प्रयत्न करत आहे. राजकीय आरोपांनी राजकीय मैदान गाजलेले असताना पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. यामध्ये तृणमूल काँग्रेससह भाजपच्या दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात आज (दि.23) १५२ जागांसाठी मतदान होत आहे. उत्तर बंगालमधील आठ जिल्हे, दक्षिण बंगालमधील तीन जिल्हे आणि जंगलमहाल प्रदेशातील पाच जिल्ह्यांमध्ये मतदान होत आहे, जिथे प्रमुख राजकीय पक्ष निवडणूक लढवत आहेत. राज्याच्या राजकीय भवितव्यासाठीही हा पहिला टप्पा निर्णायक मानला जात असून, यामध्ये अंदाजे ३.६ कोटी मतदार १,४७८ उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहेत.

हे देखील वाचा : गृहमंत्री अमित शाहच्या मोठ्या दाव्याने खळबळ, निवडणूक हरणार ‘दीदी’, सत्तेवर BJP आल्यास…

या टप्प्यात पुरुलिया, बांकुरा, झाडग्राम, पश्चिम मेदिनीपूर, पूर्व मेदिनीपूर आणि दक्षिण २४ परगणा या जिल्हांचा समावेश आहे. या टप्प्यात कोलकाता आणि हावडा येथील काही जागांवरही मतदान होणार आहे. नंदीग्राम, खरगपूर, पुरुलिया, बांकुरा आणि झाडग्राम या जागांवर तीव्र लढत अपेक्षित आहे, जिथे भाजप, टीएमसी आणि काँग्रेसमधील अनेक प्रमुख राजकीय दिग्गज निवडणूक लढवत आहेत.

नंदीग्राममध्ये सुवेंदूचे भवितव्य ठरणार

नंदीग्रामची जागा पुन्हा एकदा चर्चेत आहे, जिथे भाजपचे प्रमुख नेते सुवेंदू अधिकारी यांच्या विरोधात टीएमसीचे पवित्र कर उभे आहेत. २०२१ मध्ये अधिकारी यांनी याच जागेवरून ममता बॅनर्जी यांचा पराभव केला होता, त्यामुळे ही जागा राजकीय प्रतिष्ठेची लढाई बनली आहे.

आसनसोलमध्ये प्रतिष्ठेची लढाई
आसनसोल दक्षिण मतदारसंघात, भाजपच्या अग्निमित्रा पॉल २०२१ च्या विजयाची पुनरावृत्ती करण्याच्या प्रयत्नात आहेत. टीएमसीचे तापस बॅनर्जी कडवे आव्हान उभे करत आहेत. बॅनर्जी यांनी यापूर्वी ही जागा दशकभर राखली होती, त्यामुळे ही लढत अत्यंत चुरशीची झाली आहे.

हे देखील वाचा : West Bengal Election 2026 रक्ताचा सडा अन् किंकाळ्या! दांतनमध्ये भाजपच्या रॅलीवर शस्त्रसज्ज हल्ला; भाजप उमेदवार जखमी

अधीर रंजन चौधरी विरुद्ध सुभ्रत मैत्रा
बहरमपूर मतदारसंघात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी आणि भाजपचे सुभ्रत मैत्रा यांच्यात लढत आहे. चौधरी पाच वेळा खासदार राहिले आहेत आणि लोकसभेत विरोधी पक्षनेते होते. २०२४ च्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर, ते आता विधानसभा निवडणूक लढवत आहेत.

खरगपूर सदरमध्येही चुरशीची लढत
खरगपूर सदर मतदारसंघात अटीतटीची लढत आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष आणि टीएमसीचे प्रदीप सरकार यांच्यात सामना आहे. दिलीप घोष यांनी २०१६ मध्ये ही जागा जिंकली होती आणि आता ते ती पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत, तर प्रदीप सरकार यांनी २०१९ ची पोटनिवडणूक जिंकून टीएमसीला विजय मिळवून दिला होता.

Web Title: Prestige of trinamool congress and bjp leaders is at stake west bengal election voting updates 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 23, 2026 | 11:21 AM

Topics:  

  • Mamata Banerjee
  • West bengal
  • west bengal election
  • West Bengal Election Result 2026

संबंधित बातम्या

ममता बॅनर्जींना धक्का ! बँक खात्यांबाबत ईडीने दिलेला ‘तो’ आदेश कायम; हस्तक्षेपास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
1

ममता बॅनर्जींना धक्का ! बँक खात्यांबाबत ईडीने दिलेला ‘तो’ आदेश कायम; हस्तक्षेपास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

Supreme Court SIR Hearing: पश्चिम बंगाल SIR प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस
2

Supreme Court SIR Hearing: पश्चिम बंगाल SIR प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस

Suvendu Adhikari Helicopter Emergency Landing: सुवेंदू अधिकारींच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग
3

Suvendu Adhikari Helicopter Emergency Landing: सुवेंदू अधिकारींच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.