Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सणासुदीपूर्वी सामान्यांना महागाईचा फटका; तूर, हरभरा, उडीद डाळींचे वाढले दर

तूर डाळ रोजच्या आहाराचा महत्त्वाचा भाग असताना हरभरा डाळीपासून बेसन, फरसाण, लाडू, मिठाई आणि अनेक पदार्थ तयार केले जातात. त्यामुळे हरभरा डाळ महागल्याने या सर्व उत्पादनांचा खर्च वाढत आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 08, 2026 | 07:36 AM
महागाईत होणार वाढ

महागाईत होणार वाढ

Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून जीवनावश्यक अनेक वस्तूंचे दर वाढताना दिसत आहे. त्यातच सणासुदीच्या तोंडावरच किराणा आणि खाद्यपदार्थांच्या किमतींमध्ये अचानक वाढ झाली असून, त्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होत आहे. रोजच्या जेवणाचा खर्च वाढला असून, येत्या सणासुदीत मिठाईही महाग होण्याची चिन्हे आहेत.

तूर, मूग, उडीद यांसह हरभरा डाळीच्या किमतीतही वाढ झाली आहे. उत्पादन आणि पुरवठ्यातील चढ-उतारांमुळे डाळी महाग राहिल्या आहेत. साखर, तूर, उडीद आणि हरभरा डाळींच्या वाढत्या किमतींचा परिणाम आता प्रत्येक घराच्या स्वयंपाकघरात जाणवू लागला आहे. तांदूळ, सोयाबीन तेल, बेसन आणि मैदा यांच्या किमतीही वाढल्या आहेत.

चहा, डाळी, मिठाई आणि नाश्त्याच्या अनेक पदार्थांच्या उत्पादन खर्चात वाढ झाल्याने कुटुंबाचे मासिक बजेट बिघडले आहे. मागील पाच महिन्यांत रोजच्या वापरातील अनेक आवश्यक किराणा वस्तूंच्या दरात लक्षणीय वाढ झाल्याचे बाजारातील चित्र आहे.

मिठाई महागण्याची शक्यता

सध्याची परिस्थिती कायम राहिल्यास आगामी सणांमध्ये मिठाईचे दर वाढू शकतात. साखरेचे दर सुमारे २५ टक्क्यांनी वाढले आहेत. बाजारातील उपलब्ध साठा कमी असणे, मागणी कायम राहणे आणि पुरवठ्यावर ताण वाढणे ही प्रमुख कारणे असल्याचे जाणकारांचे मत आहे. इथेनॉल धोरणामुळे उसाचा काही भाग इथेनॉल निर्मितीकडे वळत असला तरी केवळ त्यामुळंच साखर महाग झालेली नाही, असेही ते सांगतात.

डाळींमुळे वाढला खर्च

तूर डाळ रोजच्या आहाराचा महत्त्वाचा भाग असताना हरभरा डाळीपासून बेसन, फरसाण, लाडू, मिठाई आणि अनेक पदार्थ तयार केले जातात. त्यामुळे हरभरा डाळ महागल्याने या सर्व उत्पादनांचा खर्च वाढत आहे. तूर, मूग, उडीद यांसह हरभरा डाळीच्या किमतीतही वाढ झाली आहे. उत्पादन आणि पुरवठ्यातील चढ-उतारांमुळे डाळी महाग राहिल्या आहेत.

मिठाईचे दर वाढण्याची शक्यता

साखर आणि हरभरा डाळ दोन्ही महागल्याने बेसन लाडू, मोतीचूर लाडू, म्हैसूर पाक, बर्फी आदी मिठाईंची उत्पादन किंमत वाढली आहे. कच्च्या मालाचे दर कमी न झाल्यास रक्षाबंधन, जन्माष्टमी, गणेशोत्सव आणि दिवाळी दरम्यान मिठाईचे दर वाढण्याची शक्यता आहे.

दिलासादायक ! ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच LPG सिलेंडरच्या दरात कपात; थेट 200 रुपयांनी झाला स्वस्त

Web Title: Prices of tur gram and urad dal have risen

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 08, 2026 | 07:30 AM

Topics:  

  • Inflation News
  • national news

संबंधित बातम्या

Maharashtra Today’s Live News in Marathi: मान्सूनचा परतीचा प्रवास, एशियन गेम्समधील भारतीय महिला संघाची मुसंडी
1

Maharashtra Today’s Live News in Marathi: मान्सूनचा परतीचा प्रवास, एशियन गेम्समधील भारतीय महिला संघाची मुसंडी

Ajit Doval IIT Roorkee Speech:आमची टिम चिनी सैन्याच्या ताब्यात सापडली…”; IIT रुरकीत NSA अजित डोवालांनी सांगितला तो प्रसंग
2

Ajit Doval IIT Roorkee Speech:आमची टिम चिनी सैन्याच्या ताब्यात सापडली…”; IIT रुरकीत NSA अजित डोवालांनी सांगितला तो प्रसंग

Fertility Rate In India: नसबंदीचे नियम बदलणार?पंतप्रधान सल्लागार परिषदेची मोठी शिफारस!
3

Fertility Rate In India: नसबंदीचे नियम बदलणार?पंतप्रधान सल्लागार परिषदेची मोठी शिफारस!

सर्वसामान्यांना महागाईचा पुन्हा फटका; तांदळाच्या उत्पादनात मोठी घट, दरात 25 टक्क्यांनी वाढ
4

सर्वसामान्यांना महागाईचा पुन्हा फटका; तांदळाच्या उत्पादनात मोठी घट, दरात 25 टक्क्यांनी वाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.