Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Today’s Live News in Marathi: मान्सूनचा परतीचा प्रवास, एशियन गेम्समधील भारतीय महिला संघाची मुसंडी

22 September 2026 Trending News: आज २२ सप्टेंबर रोजी मान्सूनच्या परतीच्या प्रवासादरम्यान उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे हवामान विभागाने महाराष्ट्रातील २२ जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे

  • By anuradha sagar
Updated On: Sep 22, 2026 | 10:00 AM
LIVE
Maharashtra Breaking News Today 22. 09.2026

Maharashtra Breaking News Today 22. 09.2026

Follow Us
Follow Us:
  • 22 Sep 2026 10:00 AM (IST)

    22 Sep 2026 10:00 AM (IST)

    राज्यातील तब्बल साडेपाच लाख शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत

    मुंबई : राज्य सरकारकडून जाहीर शेतकरी कर्जमाफी योजनेत २ लाख रुपयांपर्यंत थकीत कर्ज असलेल्या आणखी ५ लाख ५० हजार शेतकऱ्यांना लाभ मिळण्यास विलंब होत आहे. संबंधित शेतकऱ्यांची यादी सहकार विभागाने ४ ते ५ बँकांकडे परत पाठवली आहे. बँकांकडून सादर करण्यात आलेल्या कर्जाच्या आकडेवारीत तफावत आढळल्याने यादी परत पाठवण्यात आल्याची माहिती दिली.

  • 22 Sep 2026 09:50 AM (IST)

    22 Sep 2026 09:50 AM (IST)

    IIT Bombay Sahil Wakode Death: आयआयटी मुंबईत साहिल वाकोडे प्रकरणी विद्यार्थ्यांमध्ये दोन गट 

    IIT Bombay Sahil Wakode Death:  आयआयटी मुंबई येथील विद्यार्थी साहिल वाकोडे आत्महत्या प्रकरणानंतर पेटलेल्या आंदोलनात आता विद्यार्थ्यांमध्ये दोन गट पडले आहेत. प्रशासनाने काही मागण्या मान्य केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर एका गटाने आंदोलन मागे घेतले आहे, तर दुसऱ्या गटाने कडक कारवाईची मागणी करत आंदोलन सुरूच ठेवले आहे.

    विद्यार्थ्यांच्या जनरल बॉडीने मांडलेल्या मागण्यांपैकी प्राध्यापक सूर्यनारायण डुल्ला यांना डीन पदावरून निलंबित करण्याची मागणी आयआयटी प्रशासनाने मान्य केली आहे.संचालकांच्या या निवेदनानंतर समाधान व्यक्त करत एका विद्यार्थी गटाने आपले आंदोलन मागे घेतले.

  • 22 Sep 2026 09:40 AM (IST)

    22 Sep 2026 09:40 AM (IST)

    Share Market Today: शेअर बाजारात आज काय घडणार? काय म्हणाले तज्ज्ञ? ‘

    India Share Market Update: २२ सप्टेंबर रोजी आज भारतीय शेअर बाजार सकारात्मक पातळीवर उघडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. निफ्टी गॅप-अप ओपनिंगचे संकेत देत आहे. त्यामुळे आज भारतीय शेअर बाजारात व्यवहार करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी कमाईची संधी असू शकते. सोमवारी प्रमुख निर्देशांक वधारले, सेन्सेक्स ५६४ अंकांनी वधारला आणि निफ्टीने सलग चौथ्या सत्रात तेजी कायम ठेवली.

  • 22 Sep 2026 09:30 AM (IST)

    22 Sep 2026 09:30 AM (IST)

    Monsoon Update: राज्यातील अनेक भागांत पावसाचा अंदाज

    पुणे : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. दिवसाचा उन्हाचा फटका बसत आहे. मात्र, रविवारी आणि सोमवारी राज्यातील अनेक भागांत हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाल्याचे पाहिला मिळाले. असे असताना आजही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरसह अनेक जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

     

  • 22 Sep 2026 09:20 AM (IST)

    22 Sep 2026 09:20 AM (IST)

     Tapovan School Controversy: विद्यार्थ्याला दंड आकारल्याप्रकरणी मीरा-भाईंदरमधील तपोवन शाळेला पालिकेची नोटीस

    Tapovan School Controversy:  शालेय विद्यार्थ्यांच्या आहारावर निर्बंध घालण्याच्या आणि शिस्तीच्या नावाखाली अवाजवी नियम लादण्याच्या मुद्द्यावरून मीरा-भाईंदरमध्ये नवा वाद पेटला आहे. जेवणाच्या डब्यात मेथीची भाजी आणल्याप्रकरणी एका विद्यार्थ्याकडून तब्बल ५० रुपये दंड वसूल केल्याची घटना समोर आल्यानंतर, मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने भाईंदर येथील तपोवन विद्यालयाला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.शाळेत डब्यामध्ये मेथीची भाजी आणल्याच्या कारणावरून विद्यार्थ्याला ५० रुपयांचा दंड ठोठावण्यात आल्याची तक्रार दाखल झाली आहे

  • 22 Sep 2026 09:15 AM (IST)

    22 Sep 2026 09:15 AM (IST)

    Maharashtra Drought Kharif Crop Damage: दुष्काळसदृश परिस्थितीचा आढावा, राज्य सरकार केंद्राकडे मदत मागणार

    Maharashtra Drought Kharif Crop Damage:  राज्यातील अनेक भागांत पावसाने दिलेल्या मोठ्या खंडामुळे खरीप हंगामातील पिके धोक्यात आली आहेत. विशेषतः मराठवाडा आणि विदर्भात परिस्थिती गंभीर बनली असून सोयाबीन, कापूस, मका, तूर, मूग आणि बाजरी यांसारखी पिके पाण्याअभावी सुकू लागली आहेत. या गंभीर पार्श्वभूमीवर राज्य सरकारने दुष्काळसदृश परिस्थितीचा प्राथमिक आढावा घेण्यास सुरुवात केली आहे.

    मराठवाडा आणि विदर्भात पावसाअभावी मुख्य खरीप पिकांवर विपरीत परिणाम झाला असून शेतकरी संकटात सापडले आहेत. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी मराठवाड्यासह विविध बाधित भागांचा प्रत्यक्ष दौरा करून पीक परिस्थितीची पाहणी केली आहे

Maharashtra to World Breaking News : 

महाराष्ट्रातील मान्सूनच्या परतीच्या काळात उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे हवामान विभागाने (IMD) मुंबई, कोकण आणि मराठवाड्यासह राज्यातील २२ जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. जपानमधील एशियन गेम्समध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला असून, भारताने नेमबाजीत सुवर्ण आणि रौप्य पदकांची कमाई करत पदकांची संख्या वाढवली आहे.

अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढत्या लष्करी तणावामुळे आंतरराष्ट्रीय हवाई मार्ग विस्कळीत झाले असून, अमेरिकेने मध्यपूर्वेतील काही सागरी व हवाई मार्गांवर अतिरिक्त निर्बंध लादले आहेत.आंतरराष्ट्रीय तणाव आणि जागतिक महागाईच्या चिंतेमुळे आशियाई आणि भारतीय शेअर बाजारात (सेन्सेक्स व निफ्टी) आज सावध व्यवहार सुरू आहे

Web Title: 22 september 2026 breaking news asian games maharashtra rain alert crude oil updates 2

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 22, 2026 | 08:54 AM

Topics:  

  • maharashtra breaking news
  • Maharashtra Politics
  • Marathi News
  • national news

संबंधित बातम्या

World News : चांगलंच महाग पडलं Googleला ;आयर्लंडकडून तब्बल 403 दशलक्ष युरोचा दंड
1

World News : चांगलंच महाग पडलं Googleला ;आयर्लंडकडून तब्बल 403 दशलक्ष युरोचा दंड

World News : महाकाय जहाजाची छोट्या बोटीला धडक! सिंगापूरजवळ समुद्रात थरारक अपघात कॅमेऱ्यात कैद
2

World News : महाकाय जहाजाची छोट्या बोटीला धडक! सिंगापूरजवळ समुद्रात थरारक अपघात कॅमेऱ्यात कैद

World Politics :नेतन्याहू यांना अटक? बंद करतो तुम्हाला मिळणारा पैसा फुकट
3

World Politics :नेतन्याहू यांना अटक? बंद करतो तुम्हाला मिळणारा पैसा फुकट

world news : अमेरिकेला स्वर्ग नकोच आहे का ? पलाऊवर संकट
4

world news : अमेरिकेला स्वर्ग नकोच आहे का ? पलाऊवर संकट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.