Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोठी बातमी! पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची तब्येत बिघडली; तात्काळ रूग्णालयात केले दाखल

Punjab Chief Minister:

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 05, 2025 | 08:59 PM
मोठी बातमी! पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची तब्येत बिघडली; तात्काळ रूग्णालयात केले दाखल

मोठी बातमी! पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची तब्येत बिघडली; तात्काळ रूग्णालयात केले दाखल

Follow Us
Close
Follow Us:

भगवंत मान हे पंजाबचे मुख्यमंत्री 
दोन दिवसांपासून तब्येत खराब 
आजच्या कॅबिनेट मीटिंगल देखील अनुपस्थित 

Punjab CM Bhagvant Mann: पंजाबमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना डॉक्टरांच्या सल्ल्याने मोहालीच्या एक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या दोन दिवसांपासून त्यांची तब्येत  ठीक नसल्याचे समोर आले आहे.

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान हे गेल्या दोन दिवसांपासून आजारी आहेत. त्यांना आज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना व्हायरल ताप आणि डायजेशन संबंधित आजार असल्याचे समजते आहे. मुख्यमंत्री भगवंत मान हे त्यांच्या घरीच आराम करत असल्याचे समजते आहे. मात्र त्यांच्या तब्येतीत फरक पडत नसल्याने त्यांना आज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आज पंजाब सरकारची मंत्रिमंडळ बैठक होणार होती. मात्र भगवंत मान यांची तब्येत ठीक नसल्याने आजची मंत्रिमंडळ बैठक रद्द करण्यात आली आहे. मुख्यमंत्री मान हे आजच्या बैठकीचे अध्यक्षपद भूषवणार होते. मात्र तब्येत ठीक नसल्याने ते उपस्थित राहू शकले नाहीत. गुरुवारी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या निवासस्थानी जाऊन तब्येतीची विचारपूस केली  होती.

देशभरात पावसाचा कहर सुरूच; पंजाबमध्ये पूर, उत्तराखंड-जम्मूमध्ये भूस्खलन, रस्ते वाहतूक ठप्प

मुसळधार पावसामुळे पंजाब आणि हरियाणामध्ये पूर परिस्थिती गंभीर झाली आहे. सतलज, बियास आणि रावी नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ आणि हंगामी नाल्यांमध्ये वाढ झाल्यामुळे पंजाब गंभीर पुराच्या विळख्यात सापडला आहे. पठाणकोट, गुरुदासपूर, फाजिल्का, कपूरथला, तरणतारन, फिरोजपूर, होशियारपूर आणि अमृतसर जिल्ह्यातील गावे सर्वाधिक बाधित झाली आहेत. एनडीआरएफ, लष्कर, बीएसएफ, पंजाब पोलिस आणि जिल्हा अधिकाऱ्यांकडून बाधित भागात मदत आणि बचाव कार्य सुरू आहे.

हवामान विभागाने जारी केलेल्या रेड अलर्ट दरम्यान जम्मू-काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, छत्तीसगड आणि ओडिशामध्ये मुसळधार पाऊस पडला. उत्तर बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे, त्याच्या प्रभावामुळे पुढील पाच दिवसांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामुळे पूर परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते.

Punjab Flood: पुराच्या संकटात पंजाबला मदतीचा हात! खासदार राघव चड्ढाकडून 3.25 कोटींची मदत

खासदार राघव चड्ढाकडून 3.25 कोटींची मदत

आम आदमी पार्टी (आप) चे पंजाबमधील राज्यसभा खासदार राघव चड्ढा (Raghav Chadha) यांनी पूरग्रस्त राज्यासाठी आपल्या स्थानिक क्षेत्र विकास (एलएडी) निधीतून 3.25 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. बुधवारी जारी केलेल्या निवेदनात ही माहिती देण्यात आली. खासदारांच्या कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी पंजाबमधील सर्वात जास्त पूरग्रस्त जिल्ह्यांपैकी एक असलेल्या गुरदासपूरमध्ये रावी नदीच्या बांधांच्या दुरुस्तीसाठी 2.75 कोटी रुपये आणि अमृतसरमधील मदत व पुनर्वसन कार्यासाठी 50 लाख रुपये मंजूर केले आहेत.

Web Title: Punjab cm bhagwant mann admitted in hospital health issue breaking marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 05, 2025 | 08:36 PM

Topics:  

  • Bhagwant Mann
  • Health News
  • Punjab News

संबंधित बातम्या

पंजाबचे मुख्यमंत्री Bhagwant Mann यांच्या Fake Video प्रकरणी न्यायालयाचा मोठा आदेश; Facebook आणि Instagram ला दिले निर्देश
1

पंजाबचे मुख्यमंत्री Bhagwant Mann यांच्या Fake Video प्रकरणी न्यायालयाचा मोठा आदेश; Facebook आणि Instagram ला दिले निर्देश

Health News: शरीरातील ही 5 लक्षणे ठरू शकतात घातक, दुर्लक्ष करण्याची चूक पडू शकते महागात
2

Health News: शरीरातील ही 5 लक्षणे ठरू शकतात घातक, दुर्लक्ष करण्याची चूक पडू शकते महागात

Cough Syrup Dead : कफ सिरप प्यायल्याने महिलेचा मृत्यू; ५०० हून अधिक बाटल्या जप्त
3

Cough Syrup Dead : कफ सिरप प्यायल्याने महिलेचा मृत्यू; ५०० हून अधिक बाटल्या जप्त

Polluted cities: ‘ही’ आहेत जगातील सर्वात प्रदूषित शहरे; पहिल्या १० मध्ये भारतीय शहरांचा समावेश
4

Polluted cities: ‘ही’ आहेत जगातील सर्वात प्रदूषित शहरे; पहिल्या १० मध्ये भारतीय शहरांचा समावेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.