निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का! ६ वेळा आमदार राहिलेल्या नेत्याचा पक्षाला रामराम
ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसमध्ये दीर्घकाळ राहिलेले आणि पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष अशोक राम काँग्रेसला रामराम ठोकत जनता दल युनायटेडमध्ये प्रवेश करणार आहेत. आज अधिकृतरित्या ते जेडीयुमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यांच्या या राजकीय निर्णयामुळे बिहारमध्ये येत्या काळात अनेक राजकीय बदल पहायला मिळणार आहेत. दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसला हा मोठा धक्का माना जात आहेत.
राज्यातील विधानसभा निवडणुकीपूर्वी येथेही पक्षांतराचा खेळ सुरू झाला आहे. काँग्रेसमधील फेरबदलामुळे संतप्त अशोक राम यांनी आपला नवीन पक्ष शोधल्याचं सांगितलं जात आहे. अशोक राम हे काँग्रेसमध्ये पक्षाचा एक मोठा दलित चेहरा होते. ते ६ वेळा आमदार राहिले आहेत. याशिवाय, अशोक राम हे विधानसभेत काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते देखील होते.
राहुल गांधी बिहारमध्ये दलित मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत असतानाच मोठा दलित चेहरा असलेले अशोक रामच आता पक्ष सोडत आहेत अशोक राम हे ६ वेळा बिहार विधानसभेत निवडून आले होते. २००० मध्ये स्थापन झालेल्या राबडी सरकारमध्ये ते कॅबिनेट मंत्रीही झाले.अशोक राम हे एका मजबूत राजकीय कुटुंबातून आले आहेत, त्यांचे वडीलही बिहारच्या सक्रिय राजकारणात होते. त्यांचे वडील बालेश्वर राम १९५२ ते १९७७ पर्यंत ७ वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. ते केंद्रातही मंत्री होते. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या मंत्रिमंडळात ते राज्यमंत्रीही होते.
ठरलं तर! ५ ऑगस्ट अन् ठिकाण बेंगळुरू; राहुल गांधी निवडणूक आयोगावर टाकणार ॲटमबॉम्ब
गेल्या काही महिन्यांपासून अशोक राम यांच्याकडे पक्षाने दुर्लक्ष केलं आहे. कृष्णा अल्लावरू यांना बिहार काँग्रेस प्रभारी बनवण्यात आल्याने ते नाराज होते. शिवाय प्रदेशाध्यक्षपदही न मिळालेल्यामुळे त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. अशोक राम यांच्याच समाजातून येणारे राजेश राम यांना बिहार राज्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.याशिवाय पक्षाशी संबंधित कार्यक्रमांमध्ये त्यांना एकटं पाडण्यात आलं होतं. पक्षात अशा प्रकारे वागणूक मिळत असल्यामुळे संतप्त झाले होते. त्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला आहे.