ठरलं तर! ५ ऑगस्ट अन् ठिकाण बेंगळुरू; राहुल गांधी निवडणूक आयोगावर टाकणार ॲटमबॉम्ब
वडणूक आयोग भाजपसाठी मतांची चोरी करत आहे. हा फक्त आरोप नाही तर यासंदर्भात १०० टक्के पुरावे असून आयोगावर अॅटमबॉम्ब पडणार आहे. त्यानंतर निवडणूक आयोगाला तोंड लपवायलाही जागा उरणार नाही, असा गंभीर इशारा लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दिला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान राहुल गांधी यांच्या आरोपांचं खंडण केलं असून दररोज असे निराधार आरोप केले जात आहेत. त्याकडे लक्ष देत नसल्याचं म्हटलं आहे.
मतदार यादीतून नाव वगळल्याचा फायदा नक्की कोणाला? NDA की महाआघाडी, वाचा सविस्तर
बिहारमध्ये विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. त्याआधी निवडणूक आयोगाने मतदार यादी विशेष फेरपडताळणी मोहीम सुरू केली. परिणाम ६५ लाख मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली. त्यावरून विरोधी पक्षांनी आयोग आणि सरकारवर टीकेची झोड उठवली. आता पाच राज्यामध्ये मतदार यादीची फेरपडताळणी करण्यात येणार आहे. राहुल गांधी यांनी यावरूनच निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. दरम्यान भाजपनेही राहुल गांधींचीही भाषा लोकशाहीविरोधी आणि अशोभनीय अशल्याचं म्हटलं आहे.
राहुल गांधी पुढे म्हणाले की, “मी आधीही म्हटलं आहे की मतांची चोरी केली जात आहे. निवडणूक आयोग यात सहभागी असल्याचा आमच्याकडे आता ठोस पुरावा देखील आहे. मनाला वाटलं म्हणून मी आरोप करत नाही. माझ्याकडे 100 टक्के पुरावा आहे. ते पुरावे सार्वजनिक केल्यानंतर संपूर्ण देशासमोर निडणूक आयोगाची पोलखोल होणार आहे. हे सर्व भाजपसाठी केले जात आहे, हे ही समोर येणार आहे. महाराष्ट्रात राज्यभर मतदानात गैरप्रकार घडला आहे, याची खात्री आहे. मतदार यादीचे पुनरावलोकन झाले आणि एक कोटी नवीन मतदार जोडले गेले. त्यानंतर आम्ही अधिक तपशीलात गेलो. आयोगाने सहकार्य न केल्यामुळे स्वतः चौकशी केली. सहा महिने तपास केल्यानंतर जो पुरावा मिळाला, तो ‘अणुबॉम्ब’ आहे. तो फुटल्यावर आयोगाला लपण्यासाठी कुठेच जागा शिल्लक राहणार नाही,” अशी टीका त्यांनी केली आहे.
यामध्ये जे निवडणूक आयोगाचे अधिकारी सहभागी आहेत, त्यांना कोणत्याही परिस्थितीत सोडणार जाणार नाही. हा देशद्रोह आहे. तुम्ही निवृत्त झालात, कुठेही असाल तरी आम्ही तुम्हाला शोधून काढू, असा इशारा त्यांनी दिला आहे.
राहुल गांधी व इतर विरोधी पक्षांच्या नेत्यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून बिहारमधील मतदार यादी पुनरावलोकनावर विशेष चर्चा घेण्याची मागणी केली आहे. मतदारांचा मतदानाचा हक्क हिरावून घेण्यासाठी बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी SIR मोहीम आखण्यात आली. आयोगाचा हाच उद्देश आहे, असं यातून स्पष्ट होतं.
दरम्यान गुरुवारी ५ ऑगस्ट रोजी कर्नाटकमध्ये राज्य निवडणूक आयोगाने मतदार यादीत जाणीवपूर्वक घोटाळा केल्याचा पुरावा सादर केला जाणार आहे. अशा निवडणूक गैरप्रकारांना चालू देणार नाही, असं कॉंग्रेसने म्हटलं आहे.
निवडणूक आयोगाकडून आरोपांचं खंडण
निवडणूक आयोगावर दररोज निराधार आरोप केले जात आहेत. अशा आरोपांकडे लक्ष देत नाही. अशा धमक्यांना न घाबरता, सर्व निवडणूक अधिकारी निष्पक्ष आणि पारदर्शकपणे काम करत आहेत. तसंच आयोगाच्या अधिकाऱ्यांना भेटून त्यांचे मुद्दे मांडण्यासाठी १२ जून रोजी राहुल गांधींना ईमेलद्वारे आमंत्रण दिले होतं. मात्र त्यांनी त्याला उत्तर दिले नाही. तसंच राहुल गांधी यांनी आयोगाकडे औपचारिकरित्या कधीच कोणतीही तक्रार केली नव्हती, असं आयोगाने स्पष्ट केलं आहे.
Vice Presidential Election : उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक जाहीर, ‘या’ तारखेला होणार निवडणूक
भाजपची टीका
राहुल गांधी यांचा तो अॅटमबॉम्ब फुसका निघणार आहे. लोकसभेच्या विरोधी पक्षनेत्यांची निवडणूक आयोगाविषयी अशी भाषा लोकशाहीविरोधी आणि अशोभनीय असल्याची टीका भाजपने केली आहे.
संबित पात्रा म्हणाले, “राहुल गांधी बॉम्ब फोडणार का? तुम्हाला काय वाटतं? त्यांचं कामच आहे फुटणे. त्यांनी दुसरे काही काम उरलेले नाही. विचार करा ही कोणत्या प्रकारची भाषा आहे. तुम्ही म्हणता, मी सर्वोच्च न्यायालयात जाईन, लोकशाही मार्गाने आंदोलन करीन’, पण बॉम्ब फोडणारी भाषा, लोकशाहीला शोभणारी नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.