Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rahul Gandhi ‘आमच्याकडे अणुबॉम्ब, फुटला तर निवडणूक आयोगाला तोंड..’; राहुल गांधींकडे नक्की आहे तरी काय?

निवडणूक आयोगात असे काम जो कोणी करत आहे. त्याला आम्ही सोडणार नाही, तुम्ही भारताविरुद्ध काम करत आहात, तुम्ही देशद्रोह करत आहात.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Aug 01, 2025 | 04:00 PM
Rahul Gandhi

Rahul Gandhi

Follow Us
Close
Follow Us:

Rahul Gandhi Accuse  Election Commission of India: मागील काही महिन्यांपासून लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी केंद्रीय निवडणूक आयोगावर सातत्याने मतदान चोरीचा आरोप करत आहेत. त्यावरून आतापर्यंत अनेकदा राहुल गांधी विरुद्ध निवडणूक आयोग, केंद्र सरकार असा वाद रंगला आहे. असे असतानाच राहुल गांधींनी पुन्हा एकदा निवडणूक आयोगावर हल्लाबोल केला आहे. “निवडणूक आयोग भारतीय जनता पक्षासाठी मतचोरी करत आहे. आपल्याकडे असलेले पुरावे अणुबॉम्बसारखे आहेत. ते समोर आल्यास निवडणूक आयोगाला तोंड लपवण्यासाठी जागा मिळणार नाही, असा गंभीर आरोप राहुल गांधींनी केला आहे.

संसदेच्या आवारात माध्यमांशी बोलताना राहुल गांधी म्हणाले की, ‘मते चोरीला जात आहेत, असे मी आधीच अनेक वेळा म्हटले आहे. पण आता आमच्याकडे याचे पूर्णपणे ठोस पुरावे आहेत. निवडणूक आयोग मत चोरीत सहभागी आहे आणि मी वरवर बोलत नाही, तर मी १०० टक्के पुराव्यांसह बोलत आहे.

मोठी बातमी! माजी पंतप्रधान देवेगौडांचे नातू प्रज्ज्वल रेवण्णा बलात्कार प्रकरणात दोषी

आम्ही हे जाहीर करताच संपूर्ण देशाला कळेल की आयोग मते चोरत आहे. निवडणूक आयोग हे सर्व भाजपसाठी करत आहे. पण त्यानंतर निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा मिळणार नाही. आम्हाला मध्य प्रदेशात (विधानसभा निवडणुकीत) शंका होत्या, लोकसभा निवडणुकीतही शंका होत्या, त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीतही अशाच पद्धतीने मतदार जोडण्यात आले. त्यानंतर आम्ही आमच्या बाजूने चौकशी सुरू केली आणि त्याला सहा महिने लागले. पण आम्हाला जे सापडले आहे ते अणुबॉम्बसारखे आहे, जेव्हा त्याचा स्फोट होईल तेव्हा तुम्हाला निवडणूक आयोग कुठेही दिसणार नाही.

निवडणूक अधिकारी देशद्रोही

निवडणूक आयोगात असे काम जो कोणी करत आहे. त्याला आम्ही सोडणार नाही, तुम्ही भारताविरुद्ध काम करत आहात, तुम्ही देशद्रोह करत आहात. तुम्ही निवृत्त झाले असाल किंवा कुठेही असाल,तरी आम्ही तुम्हाला शोधून काढू, असा इशारा राहुल गांधी यांनी दिला आहे. तसेच, कर्नाटकातील एका लोकसभा मतदारसंघात मतदार आम्ही मतदार याद्यांचे ऑडिट केले, त्यात मोठ्या प्रमाणात अनियमितता आढळल्याचा दावाही राहूल गांधी गेल्या काही दिवसांपूर्वी केला होता. या मतदार याद्यांचे ऑडित करताना मोठ्या प्रमाणात अनियमितता आढळून आल्या असून त्याची माहिती लवकरच सार्वजनिक केली जाईल, असा इशाराही राहुल गांधींनी दिला आहे.

Vice Presidential Election : उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक जाहीर, ‘या’ तारखेला होणार निवडणूक

२४ जुलै रोजी, निवडणूक आयोगाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या या दाव्यावर तीव्र आक्षेप घेतला होता. यावर निवडणूक आयोगानेही स्पष्टीकरण दिले आहे. राहुल गांधी यांनी निराधार आरोप केले असून एका संवैधानिक संस्थेला “धमकी” देण्याचा प्रयत्न केला आहे.

Rahul Gandhi, Election Commission of India, Madhya Pradesh Elections, Lokasabha Elections, Maharashtra Elections,

Web Title: Rahul gandhi again accuses election commission of vote rigging

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 01, 2025 | 04:00 PM

Topics:  

  • election commission of india
  • Rahul Gandhi

संबंधित बातम्या

ओम बिरला कोणच्या दबावाखाली करतायेत काम? विरोधकांचा अविश्वासाचा प्रस्ताव करणार घाव
1

ओम बिरला कोणच्या दबावाखाली करतायेत काम? विरोधकांचा अविश्वासाचा प्रस्ताव करणार घाव

Shrikant Shinde : “आधी स्वत:चे घर सांभाळा मग देशाचा विचार करा..”, डॉ. श्रीकांत शिंदे यांची राहुल गांधींवर घणाघाती टीका
2

Shrikant Shinde : “आधी स्वत:चे घर सांभाळा मग देशाचा विचार करा..”, डॉ. श्रीकांत शिंदे यांची राहुल गांधींवर घणाघाती टीका

Rahul Gandhi Loksabha Live : “ही ट्रेड डील नाही तर…; अमेरिकेच्या करारावर राहुल गांधींचा संसदेमध्ये जोरदार प्रहार
3

Rahul Gandhi Loksabha Live : “ही ट्रेड डील नाही तर…; अमेरिकेच्या करारावर राहुल गांधींचा संसदेमध्ये जोरदार प्रहार

“पुरावे नाहीत अन् आरोप मोठे…”, राहुल गांधींच्या दाव्यांवरून सरकार आक्रमक; रिजिजूंनी स्पष्ट केली भूमिका
4

“पुरावे नाहीत अन् आरोप मोठे…”, राहुल गांधींच्या दाव्यांवरून सरकार आक्रमक; रिजिजूंनी स्पष्ट केली भूमिका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.