Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रजासत्ताक दिनी रंगले कोकणचे वैभव! छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथील संचलनात ‘कोकण पर्यटन’ चित्ररथाने वेधले लक्ष

दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानावर प्रजासत्ताक दिनानिमित्त संचालन आयोजित करण्यात आले होते. या संचलनात ‘कोकण पर्यटन’ चित्ररथाने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Jan 26, 2026 | 07:47 PM
छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथील संचलनात ‘कोकण पर्यटन’ चित्ररथाने वेधले लक्ष

छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथील संचलनात ‘कोकण पर्यटन’ चित्ररथाने वेधले लक्ष

Follow Us
Close
Follow Us:
  • मुंबईतील दादरमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
  • छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथील संचलनात कोकण पर्यटनाचे चित्ररथ
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची उपस्थिती
भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानावर आयोजित भव्य संचलनात पर्यटन विभागाच्या ‘कोकण पर्यटन’ या चित्ररथाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण झाल्यानंतर संचलनास सुरुवात झाली.

पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेतून साकारलेला हा चित्ररथ कोकणच्या समृद्ध संस्कृती, ऐतिहासिक वारसा आणि आधुनिक पर्यटन सुविधांचा प्रभावी संगम दाखवणारा ठरला. या वेळी कोकण विभागाच्या उपसंचालक (पर्यटन) डॉ. प्रज्ञा मनोहर यांच्यासह पर्यटन विभागातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

चित्ररथामधून कोकणची विस्तीर्ण किनारपट्टी, ऐतिहासिक स्थळे आणि साहसी पर्यटनाचे दर्शन घडवण्यात आले. अरबी समुद्राचे संरक्षण करणाऱ्या विजयदुर्ग किल्ल्याची भव्य प्रतिकृती, गणपतीपुळे मंदिराचा देखावा तसेच कोकणातील निसर्गरम्य होमस्टे व ग्रामीण पर्यटनाचे सादरीकरण प्रेक्षकांचे विशेष आकर्षण ठरले.

हायवेवर जळत्या कारचा थरार! Mahindra Electric SUV च्या सेफ्टीवर उठताय प्रश्नचिन्ह? किंमत तर…

यासोबतच स्कुबा डायव्हिंग, डॉल्फिन प्रतिकृती, जलक्रीडांमधील लोकप्रिय बनाना राइड यांचे कलात्मक सादरीकरण करण्यात आले. कोकणच्या दळणवळणात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या रो-रो फेरीची प्रतिकृती हे या चित्ररथाचे मुख्य आकर्षण ठरले. यामुळे कोकणचे नैसर्गिक सौंदर्य, साहसी पर्यटन आणि आधुनिक पायाभूत सुविधा यांचा एकत्रित अनुभव प्रेक्षकांना घेता आला.

चित्ररथासोबत सादर करण्यात आलेले कोकण पर्यटनावर आधारित विशेष गीतही उपस्थितांच्या पसंतीस उतरले. या संचलनाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या पर्यटन वैभवाचे देशभर प्रभावी सादरीकरण झाले आणि कोकण पर्यटनाला नवी ओळख मिळाली.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळवण्यासाठी पतीने केली फसवणूक, दुसऱ्या महिलेला बोलवलं अन्…

पर्यटन अधिकाऱ्यांच्या प्रतिक्रिया

पर्यटन विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे म्हणाले, “प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात ‘कोकण पर्यटन’ संकल्पनेवर आधारित चित्ररथ सादर करताना आम्हाला अभिमान वाटतो. कोकणचा नैसर्गिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक ठेवा देशभर पोहोचवण्याचा हा प्रभावी प्रयत्न आहे.”

पर्यटन संचालनालयाचे संचालक (भा.प्र.से.) डॉ. बी. एन. पाटील यांनी सांगितले, “या चित्ररथातून पारंपरिक वारसा आणि आधुनिक पर्यटन सुविधा यांचा समतोल साधण्यात यश आले आहे. विजयदुर्ग, गणपतीपुळे, जलक्रीडा आणि रो-रो फेरीमुळे प्रेक्षकांना कोकणचा सर्वांगीण अनुभव मिळाला.”

Web Title: Konkan tourism float attracts attention in procession at chhatrapati shivaji maharaj park

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 26, 2026 | 07:46 PM

Topics:  

  • Marathi News
  • Republic Day 2026
  • Shivaji Park

संबंधित बातम्या

Republic Day Seating Row: राहुल गांधींना मागे बसवल्याने काँग्रेस संतापली! “अडवाणींना आम्ही सन्मान दिला, मोदींनी शिष्टाचार मोडला”
1

Republic Day Seating Row: राहुल गांधींना मागे बसवल्याने काँग्रेस संतापली! “अडवाणींना आम्ही सन्मान दिला, मोदींनी शिष्टाचार मोडला”

‘मुंब्रा को हरा कर देंगे..’,  नगरसेविकेच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्याचा टोला; म्हणाला, ”अख्खा हिंदुस्थान हिरवा…”
2

‘मुंब्रा को हरा कर देंगे..’, नगरसेविकेच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्याचा टोला; म्हणाला, ”अख्खा हिंदुस्थान हिरवा…”

Kolhapur News : ऊसतोड मजुरांच्या मुलांसाठी शिक्षणासाठी महत्वाचं पाऊल; कृष्णा कारखान्याचा मोलाचा प्रयत्न
3

Kolhapur News : ऊसतोड मजुरांच्या मुलांसाठी शिक्षणासाठी महत्वाचं पाऊल; कृष्णा कारखान्याचा मोलाचा प्रयत्न

Virar :  पोलिसांच्या पाठपुराव्याला यश;  25 लाखांहून अधिक किमतीचे हरवलेले मोबाईल मालकांच्या हाती
4

Virar : पोलिसांच्या पाठपुराव्याला यश; 25 लाखांहून अधिक किमतीचे हरवलेले मोबाईल मालकांच्या हाती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.