Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rahul Gandhi News: १८०० कोटींची जमीन, मंत्र्यांच्या मुलाला ३०० कोटींमध्ये विकली… मोदी गप्प! राहुल गांधींनी मोदींनाच धारेवर धरलं

पुण्यातील कोरेगाव पार्कसारख्या उच्चभ्रू भागात तब्बल ४० एकर जमिनीचा संशयास्पद व्यवहार झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Nov 07, 2025 | 03:59 PM
Rahul Gandhi News

Rahul Gandhi News

Follow Us
Close
Follow Us:
  • पुण्यातील जमीन घोटाळ्याप्रकरणी पार्थ पवार, अजित पवार अडचणीत
  • १८०० कोटींची जमी ३०० कोटींना विकत घेतली
  • जमीन गैरव्यवहाराप्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Rahul Gandhi on Pune Land Scam: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांचा मुलगा पार्थ पवार यांच्या कंपनीशी संबंधित जमिनीसंबंधित गैरव्यवहारावरून अडचणीत आले आहेत. चारही बाजूंनी त्यांच्यावर गंभीर आरोप होत आहेत. हे आरोप गांभीर्याने घेत सरकारने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. या प्रकरणात त्यांच्या कथित भूमिकेसाठी सब-रजिस्ट्रारला निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणावरुन राजकारण तापलं असतानाच लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीया मुद्द्यावरून केंद्रातील मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. त्यांनी भाजपवर दलितांकडून जमीन हिसकावून मंत्र्यांच्या मुलाला दिल्याचा आरोप केला आहे.

अजित पवार यांनी या आरोपांचे स्पष्टीकरण दिले आहे. पुण्यातील कोट्यवधी रुपयांच्या या कथित जमिनीच्या व्यवहाराशी त्यांचा काहीही संबंध नाही असे त्यांनी सांगितले. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कोणालाही ते पाठिंबा देऊ शकत नाहीत असे त्यांनी सांगितले.

Delhi Airport : दिल्ली विमानतळावर मोठा गोंधळ! ATS सिस्टममधील बिघाडामुळे विमानसेवा विस्कळीत

राहुल गांधी काय म्हणाले?

या प्रकरणाबाबत राहुल गांधी यांनी ट्विट करत थेट मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. “दलितांसाठी राखीव असलेली महाराष्ट्रातील १८०० कोटी रुपयांची सरकारी जमीन मंत्र्यांच्या मुलाच्या कंपनीला फक्त ३०० कोटी रुपयांना विकण्यात आली. स्टॅम्प ड्युटी देखील माफ करण्यात आली – म्हणजे लूट आणि नंतर कायदेशीर मान्यता! ‘मत चोरी’ करून स्थापन झालेल्या सरकारची ही ‘जमीन चोरी’ आहे.” अशी टिका राहुल गांधी यांनी केली आहे.

तसेच, ” त्यांनी कितीही लुटमार केली तरी ते मतांची चोरी करून पुन्हा सत्तेत येतील, हे त्यांना माहिती आहे. त्यांना लोकशाहीची, जनतेची किंवा दलितांच्या हक्कांची पर्वा नाही. मोदीजी, तुमचे मौन बरेच काही सांगत आहे. तुम्ही गप्प आहात कारण तुमचे सरकार दलित आणि वंचितांचे हक्क हिसकावून घेणाऱ्या त्याच लुटारूंवर अवलंबून आहे?” असही त्यांनी म्हटलं आहे.

Bihar Elections 2025: बिहारच्या मोकामामध्ये मतदानावेळी उफाळला हिंसाचार; याचठिकाणी झाला होता दुलारचंदचा हत्याकांड

तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल

दरम्यान, पार्थ पवार यांच्याशी संबंधित कंपनीशी संबंधित या जमीन गैरव्यवहाराप्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिसांनी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (सपा) नेते एकनाथ खडसे यांनी जमीन घोटाळ्यातील कथित अनियमिततांची उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायाधीशांच्या देखरेखीखाली चौकशी करण्याची मागणी केली.

पुण्यातील कोरेगाव पार्कसारख्या उच्चभ्रू भागात तब्बल ४० एकर जमिनीचा संशयास्पद व्यवहार झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. बाजारभावानुसार या जमिनीची किंमत सुमारे १,८०० कोटी रुपये इतकी असताना, ती केवळ ३०० कोटी रुपयांत विकत घेतल्याचे समोर आले आहे.

याहूनही धक्कादायक म्हणजे, या व्यवहारावर लागणारी सुमारे २१ कोटी रुपयांची स्टॅम्प ड्युटी काही कागदोपत्री कारवायांद्वारे माफ करून घेण्यात आल्याचे आरोप आहेत. इतकंच नव्हे, तर फक्त ५०० रुपयांमध्ये एवढा प्रचंड व्यवहार पूर्ण झाल्याची माहिती समोर आली असून, या प्रकरणामुळे प्रशासन आणि महसूल विभागात खळबळ उडाली आहे.

महाराष्ट्र में ₹1800 करोड़ की सरकारी ज़मीन, जो दलितों के लिए आरक्षित थी, सिर्फ़ ₹300 करोड़ में मंत्री जी के बेटे की कंपनी को बेच दी गई। ऊपर से स्टाम्प ड्यूटी भी हटा दी गई – मतलब एक तो लूट, और उसपर कानूनी मुहर में भी छूट! ये है ‘ज़मीन चोरी’, उस सरकार की, जो खुद ‘वोट चोरी’ से… pic.twitter.com/HQeDmNvyYl — Rahul Gandhi (@RahulGandhi) November 7, 2025

Web Title: Rahul gandhi news rahul gandhi criticizes modi over parth pawar land scam in pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 07, 2025 | 03:45 PM

Topics:  

  • ajit pawar
  • Pune Politics
  • Rahul Gandhi

संबंधित बातम्या

Pune Land Scam प्रकरणी पार्थ पवारांच्या भागीदारांवर गुन्हा दाखल; अधिकारीही अडचणीत
1

Pune Land Scam प्रकरणी पार्थ पवारांच्या भागीदारांवर गुन्हा दाखल; अधिकारीही अडचणीत

मुलाच्या नावाने जमीन हडपणाऱ्या अजित पवारांची मंत्रीमंडळातून हाकालपट्टी करा; हर्षवर्धन सपकाळांची मागणी
2

मुलाच्या नावाने जमीन हडपणाऱ्या अजित पवारांची मंत्रीमंडळातून हाकालपट्टी करा; हर्षवर्धन सपकाळांची मागणी

Bihar Election Voting Day: “हा बिहारचे भविष्य ठरवण्याचा दिवस; मतचोरीचा चिमटा काढत राहुल गांधींचा बिहारी जनतेला सावधनतेचा इशारा
3

Bihar Election Voting Day: “हा बिहारचे भविष्य ठरवण्याचा दिवस; मतचोरीचा चिमटा काढत राहुल गांधींचा बिहारी जनतेला सावधनतेचा इशारा

राहुल गांधींनी थेट पाण्यात मारली उडी; बिहारमध्ये मारेल का बाजी त्यांची महागठबंधन आघाडी
4

राहुल गांधींनी थेट पाण्यात मारली उडी; बिहारमध्ये मारेल का बाजी त्यांची महागठबंधन आघाडी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.