
Congress Rahul Gandhi Social Media Post on Bihar Election 2025 First Phase of Voting
Rahul Gandhi on Bihar Election voting day 2025 : बिहार : बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी मतदान प्रक्रिया सुरु झाली आहे. आज (दि.06) पहिल्या टप्प्यात १८ जिल्ह्यांमधील १२१ जागांसाठी मतदान होणार आहे. सकाळी ७ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान पार पडणार आहे. बोगस मतदार, दुबार मतदार आणि मतदार याद्यांमधील प्रचंड घोळ यामुळे विरोधी कॉंग्रेस (Congress) पक्ष आक्रमक झाला आहे. याच पार्श्वभूमीवर बिहारमध्ये (Bihar) होत असलेल्या निवडणुकीमध्ये काय होणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. याच पार्श्वभूमीवर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून बिहारी जनतेला खास आवाहन केले आहे.
बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडत आहे. यामुळे राहुल गांधी यांनी एक्सवर पोस्ट लिहून बिहारी जनतेला मतदान करण्यापूर्वी देशातील सर्व परिस्थितीचा विचार करण्याचे आवाहन केले आहे. राहुल गांधी यांनी लिहिले आहे की, बिहारमधील माझ्या तरुण मित्रांनो, माझ्या Gen-Z बंधू आणि भगिनींनो,हा फक्त मतदानाचा दिवस नाही, तर बिहारचे भविष्य ठरवण्याचा दिवस आहे. तुमच्यापैकी बरेच जण पहिल्यांदाच मतदान करणार आहेत – हा फक्त तुमचा अधिकार नाही, तर लोकशाहीची सर्वात मोठी जबाबदारी आहे, असे राहुल गांधींनी Gen-Z ला आवाहन केले.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे राहुल गांधींनी लिहिले आहे की, “हरियाणामध्ये मत चोरीचा भयानक खेळ कसा खेळला गेला हे तुम्ही पाहिले आहे. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड – सर्वत्र या लोकांनी लोकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. आता त्यांचे डोळे बिहारवर, तुमच्या मतावर, तुमच्या भविष्यावर आहेत. उद्या मोठ्या संख्येने तुमच्या मतदान केंद्रावर पोहोचा आणि तुमच्या महाआघाडीच्या उमेदवाराला मतदान करा. बूथवर होणाऱ्या प्रत्येक कट आणि हेराफेरीपासून सावध रहा – लोकशाहीची सर्वात मोठी ताकद जागरूक जनता आहे. बिहारचे भविष्य तुमच्या हातात आहे “मत चोरी, सरकार चोरी” या कटाचा पराभव करा. सत्य आणि अहिंसेचा मार्ग अनुसरून, तुमच्या मताने लोकशाही वाचवा, बिहारला जागृत करा. जय हिंद, जय बिहार,” अशा भावना लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी व्यक्त केल्या आहेत.
बिहार के मेरे युवा साथियों,
मेरे Gen-Z भाइयों और बहनों, कल का दिन सिर्फ़ मतदान का दिन नहीं,
बल्कि बिहार के भविष्य की दिशा तय करने का दिन है। आपमें से कई पहली बार वोट डालने जा रहे हैं – यह सिर्फ़ आपका अधिकार नहीं,
बल्कि लोकतंत्र की सबसे बड़ी ज़िम्मेदारी है। आपने देखा, हरियाणा… pic.twitter.com/PpDhlmKsoB — Rahul Gandhi (@RahulGandhi) November 5, 2025
बिहार निवडणुकीसंबंधित अपडेट जाणून घेण्यासाठी क्लिक करा
बिहारमध्ये 1314 उमेदवारांचे भविष्य टांगणीला
बिहारमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रियेमध्ये एकूण 1314 उमेदवार निवडणूक लढवत आहेत, ज्यात 1192 पुरुष तर 122 महिला उमेदवारांचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यातील 102 जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव आहेत, तर 19 जागा अनुसूचित जातींसाठी राखीव आहेत. पहिल्या टप्प्यात एकूण ३७.५१३ दशलक्ष मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील. यामध्ये १९.८३५ दशलक्ष, ३२५ पुरुष, १७.६७ दशलक्ष, २१९ महिला आणि ७५८ तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. मतदान केंद्रांवर अपंग आणि वृद्ध मतदारांसाठी विशेष सुविधाही देण्यात आल्या आहेत. ३२२०७७ अपंग मतदार आणि ५३१४२३ ज्येष्ठ नागरिक मतदार (८० वर्षांवरील ५२४6८७ मतदार आणि १०० वर्षांवरील ६७३६ मतदारांसह) आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.