Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 10 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रयागराजमध्ये राहुल गांधींचे तरुणांना संबोधन; रोजगार आणि पेपरफुटीवरून सरकारवर निशाणा

प्रयागराजमध्ये राहुल गांधींनी तरुणांना संबोधित करत रोजगार, शिक्षण आणि पेपरफुटीच्या मुद्द्यावर सरकारवर टीका केली. “युवांनी देशाला मार्ग दाखवला आहे,” असे म्हणत त्यांनी तरुणांच्या संघर्षाचा उल्लेख केला.

  • By विवेक
Updated On: Aug 08, 2026 | 09:07 PM
Rahul Gandhi, Congress Politics,

Rahul Gandhi, Congress Politics,

Follow Us
Follow Us:
  • प्रयागराजमध्ये राहुल गांधींचे मोठ्या संख्येने उपस्थित तरुणांशी संवाद
  • शिक्षण, पेपरफुटी आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावर सरकारवर टीका
  • “द्वेष आणि हिंसेने नाही, प्रेमाने व्यवस्था बदलायची” असा तरुणांना संदेश
उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित तरुण आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी देशातील युवकांसमोरील शिक्षण, रोजगार आणि स्पर्धा परीक्षांशी संबंधित प्रश्नांवर भाष्य केले. राहुल गांधींच्या या भाषणाचा व्हिडीओ त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरही शेअर करण्यात आला असून, ‘छात्रों की गूंज’ असे कॅप्शन देण्यात आले आहे.

तरुणांना संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले, “मी वेदना, डेटा आणि दौलतीची गोष्ट करणार आहे.” देशातील युवकांनी अनेकदा देशाला दिशा दाखवली आहे. त्यांनी भीतीचा सामना केला आणि भीतीला दूर केले, असेही राहुल गांधी यांनी म्हटले.

“कोट्यवधी रुपये खर्च करूनही नोकरी मिळत नाही”

शिक्षण आणि रोजगाराच्या मुद्द्यावर बोलताना राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांच्या अडचणींचा उल्लेख केला. कुटुंबांकडून शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात पैसा खर्च केला जातो. त्यानंतर विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मिळते; मात्र हे प्रमाणपत्र नोकरी मिळवून देत नाही, असा दावा त्यांनी केला.

Narendra Modi: ‘मी बाबा बागेश्वर नाही…’, IIT दिल्लीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधताना PM मोदींचा मिश्कील अंदाज

स्पर्धा परीक्षांमध्ये पेपरफुटी होत असल्याचा आरोप करत राहुल गांधी म्हणाले की, गरीब आणि सामान्य कुटुंबातील विद्यार्थी मेहनत करून परीक्षेची तयारी करतात. मात्र, पेपरफुटीमुळे त्यांच्या मेहनतीवर परिणाम होतो. श्रीमंत विद्यार्थ्यांना पेपर विकत घेण्याची संधी मिळते, असा आरोपही त्यांनी केला.

राहुल गांधींच्या कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच दोन परीक्षार्थींनी मंचावर येऊन आपले अनुभव सांगितले. शिक्षणासाठी पैसा खर्च करूनही रोजगाराच्या संधी उपलब्ध होत नसल्याची व्यथा त्यांनी मांडली.

“द्वेष आणि हिंसेने व्यवस्था बदलणार नाही”

यावेळी राहुल गांधी यांनी भाजपवरही गंभीर आरोप केले. “भाजप वोट चोरी करवाती है,” असा आरोप करत देशातील विविध संस्थांमध्ये आरएसएसशी संबंधित लोकांना स्थान दिले जात असल्याचे ते म्हणाले. भारतातील रोजगाराच्या संधींचे सर्व दरवाजे बंद असल्याचा दावाही त्यांनी केला.

ABVP Students Protest JPSC News: रांचीत विद्यार्थी आंदोलन पेटले!; मुख्यमंत्री निवासावर ABVP चा मोर्चा, पोलिसांशी झटापट

दरम्यान, पटना येथील काही विद्यार्थ्यांनी राहुल गांधी यांना आंदोलनादरम्यान झालेल्या लाठीचार्जची माहिती दिली. त्यावर प्रतिक्रिया देताना राहुल गांधी यांनी द्वेष आणि हिंसेच्या माध्यमातून बदल घडवून आणता येणार नाही, असे सांगितले.

“आपल्याला प्रेमाच्या माध्यमातून व्यवस्था बदलायची आहे,” असा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. त्यामुळे प्रयागराजमधील राहुल गांधींच्या या संवादात युवकांचे प्रश्न, रोजगार, पेपरफुटी आणि शिक्षण व्यवस्था हे प्रमुख मुद्दे ठरल्याचे पाहायला मिळाले.

Web Title: Rahul gandhi prayagraj youth speech dard data daulat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 08, 2026 | 09:07 PM

Topics:  

  • Congress
  • Prayagraj
  • Rahul Gandhi

संबंधित बातम्या

Sonia Gandhi Book : सोनिया गांधींचा मोठा खुलासा! आणीबाणीवरून राजीव – संजय गांधींमध्ये झाला होता वाद; इंदिरा गांधींची चूकही मान्य
1

Sonia Gandhi Book : सोनिया गांधींचा मोठा खुलासा! आणीबाणीवरून राजीव – संजय गांधींमध्ये झाला होता वाद; इंदिरा गांधींची चूकही मान्य

Hasan Mushrif ED Case : 2700 पानांची तक्रार कुठे गेली? हसन मुश्रीफ प्रकरणावरून काँग्रेसनं भाजपला घेरलं
2

Hasan Mushrif ED Case : 2700 पानांची तक्रार कुठे गेली? हसन मुश्रीफ प्रकरणावरून काँग्रेसनं भाजपला घेरलं

Amit Shah : हिम्मत असेल तर संसदेत येऊन चर्चा करा; अमित शाहांचे राहुल गांधींना थेट आव्हान
3

Amit Shah : हिम्मत असेल तर संसदेत येऊन चर्चा करा; अमित शाहांचे राहुल गांधींना थेट आव्हान

Kolhapur Gokul Politics : वोट चोरीनंतर आता सत्ता चोरी; गोकुळवरून सतेज पाटलांचा सरकारवर घणाघात
4

Kolhapur Gokul Politics : वोट चोरीनंतर आता सत्ता चोरी; गोकुळवरून सतेज पाटलांचा सरकारवर घणाघात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.