Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 21 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राहुल गांधींची साडेतीन तासांनंतर सुटका; प्रियांका गांधींचा सरकारवर हल्लाबोल, राजधानीतील वातावरण तापले…

दिल्लीतील आंदोलनादरम्यान पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या राहुल गांधी यांची साडेतीन तासांनंतर सुटका करण्यात आली. सुटकेनंतर काँग्रेसने धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी कायम ठेवत सरकारविरोधातील आंदोलन आणखी तीव्र करण्याचे संकेत दिले.

  • By विवेक
Updated On: Jul 21, 2026 | 10:31 PM
राहुल गांधींची साडेतीन तासांनंतर सुटका; प्रियांका गांधींचा सरकारवर हल्लाबोल, राजधानीतील वातावरण तापले...

राहुल गांधींची साडेतीन तासांनंतर सुटका; प्रियांका गांधींचा सरकारवर हल्लाबोल, राजधानीतील वातावरण तापले...

Follow Us
Follow Us:

दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानासमोर काँग्रेसने आयोजित केलेल्या आंदोलनादरम्यान ताब्यात घेण्यात आलेले लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची साडेतीन तासांनंतर सुटका करण्यात आली. पोलिसांनी त्यांना छत्रसाल पोलीस ठाण्यात नेले होते. त्यांच्यासोबत ताब्यात घेतलेल्या समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनाही नंतर मुक्त करण्यात आले.

नीट पेपरफुटी प्रकरण आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेसने हे आंदोलन छेडले होते. आंदोलनादरम्यान परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि इतर विरोधी पक्षांच्या नेत्यांना ताब्यात घेतले. या कारवाईनंतर राजधानीतील राजकीय वातावरण अधिक तापले.

Jitendra Singh: ‘चर्चेची अट मान्य केली, तरीही मागण्या बदलल्या’; राहुल गांधींच्या ‘त्या’ विधानावर केंद्रीय मंत्री भडकले!

प्रियंका गांधींचा सरकारवर निशाणा

सुटकेनंतर प्रियंका गांधी यांनी सरकारवर जोरदार टीका करत विद्यार्थ्यांवरील कारवाईचा निषेध नोंदवला. सरकारने विद्यार्थ्यांच्या तक्रारी गांभीर्याने ऐकाव्यात, पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर कायदा आणावा आणि दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. आंदोलन करणे हा प्रत्येक नागरिकाचा घटनात्मक अधिकार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

सोनिया गांधींची पोलीस ठाण्यात भेट

राहुल गांधी ताब्यात असल्याची माहिती मिळाल्यानंतर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी पोलीस ठाण्यात दाखल झाल्या. त्यांनी राहुल गांधींची भेट घेत त्यांच्या प्रकृतीची आणि परिस्थितीची माहिती घेतली. या घटनेमुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये मोठी हालचाल पाहायला मिळाली.

Sonam Wangchuk Health Update: सोनम वांगचुक यांना सफदरजंगमधून मेदांता रुग्णालयात हलवा; दिल्ली उच्च न्यायालयाचे मोठे आदेश

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर काँग्रेस ठाम

काँग्रेसने स्पष्ट केले आहे की, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार आहे. विद्यार्थ्यांवरील कारवाई आणि नीट पेपरफुटी प्रकरणावर सरकारने उत्तर द्यावे, अशी मागणी विरोधकांकडून सातत्याने केली जात आहे. या घडामोडींमुळे दिल्लीतील राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.

Web Title: Rahul gandhi released after 3 hours police detention delhi protest

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 21, 2026 | 10:31 PM

Topics:  

  • Priyanka Gandhi
  • Rahul Gandhi
  • Sonia Gandhi

संबंधित बातम्या

राहुल गांधी ताब्यात; सोनिया गांधी पोलीस ठाण्यात दाखल, काँग्रेसचे आंदोलन अधिक तीव्र
1

राहुल गांधी ताब्यात; सोनिया गांधी पोलीस ठाण्यात दाखल, काँग्रेसचे आंदोलन अधिक तीव्र

Jitendra Singh: ‘चर्चेची अट मान्य केली, तरीही मागण्या बदलल्या’; राहुल गांधींच्या ‘त्या’ विधानावर केंद्रीय मंत्री भडकले!
2

Jitendra Singh: ‘चर्चेची अट मान्य केली, तरीही मागण्या बदलल्या’; राहुल गांधींच्या ‘त्या’ विधानावर केंद्रीय मंत्री भडकले!

Rahul Gandhi: राजधानी तापली! पंतप्रधान निवासाबाहेर ३ तास ठिय्या मांडणारे राहुल गांधी अन् अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात
3

Rahul Gandhi: राजधानी तापली! पंतप्रधान निवासाबाहेर ३ तास ठिय्या मांडणारे राहुल गांधी अन् अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात

तणाव वाढला! थेट PM हाऊसबाहेर राहुल आणि प्रियंका गांधींचे धरणे आंदोलन; धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी
4

तणाव वाढला! थेट PM हाऊसबाहेर राहुल आणि प्रियंका गांधींचे धरणे आंदोलन; धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.