Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rahul Gandhi : राहुल गांधींचा मोठा निर्णय! ‘उद्या संपूर्ण भारत सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा काढणार’

Rahul Gandhi : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून इंडिया आघाडीने आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. राहुल गांधी यांनी १२ ऑक्टोबरला सर्वोच्च न्यायालयापर्यंत मोर्चा काढून सरन्यायाधीशांना निवेदन देणार असल्याचे जाहीर केले.

  • By विवेक
Updated On: Oct 11, 2026 | 09:03 PM
Rahul Gandhi

Rahul Gandhi

Follow Us
Follow Us:
  • सर्वोच्च न्यायालयापर्यंत मोर्चा काढण्याची राहुल गांधींची घोषणा
  • ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी; SIR प्रक्रियेवर आक्षेप
  • “घाबरू नका”; राहुल गांधींचे कार्यकर्त्यांना आवाहन
 

Rahul Gandhi : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून देशातील राजकीय वातावरण तापले आहे. दिल्ली आणि मुंबईत आंदोलकांवर होणाऱ्या पोलिसी कारवाईवरून देशभर संतापाचे वातावरण आहे. अश्यातच आता इंडिया आघाडीने आंदोलनाची पुढील दिशा जाहीर केली आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी उद्या (सोमवार, 12 ऑक्टोबर) सर्वोच्च न्यायालयापर्यंत मोर्चा काढण्याचे आवाहन केले आहे.

या मोर्चानंतर सरन्यायाधीशांना निवेदन सादर करून मतदार यादीतील कथित अनियमितता, मतचोरीचा आरोप आणि विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण अर्थात SIR प्रक्रियेबाबत विरोधकांची भूमिका मांडली जाणार आहे. आपल्या सोशल मीडिया पोस्टमधून त्यांनी हि माहिती दिली,

सर्वोच्च न्यायालयापर्यंत मोर्चा काढण्याची राहुल गांधींची घोषणा

राहुल गांधी यांनी सोशल मीडिया पोस्ट आणि व्हिडिओच्या माध्यमातून आंदोलनाची भूमिका स्पष्ट केली. हा मोर्चा केवळ राजकीय पक्षांचा नसून भारतीय नागरिकांनी लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी एकत्र येण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी म्हटले.

CJP Protest Mumbai : मुंबईत CJP आंदोलनावरून राडा! आदित्य-तेजस ठाकरे आंदोलनात उतरले, ‘महाराष्ट्र बंद’चा इशारा

पक्ष, जात, लिंग, समुदाय आणि राज्यांच्या सीमा बाजूला ठेवून नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन राहुल गांधी यांनी केले. तरुण, विरोधी पक्ष, नागरी समाज आणि संविधानावर विश्वास ठेवणाऱ्या नागरिकांनी या आंदोलनात सहभागी व्हावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

नेमकं काय म्हणाले राहुल गांधी ?

“काल, दिल्लीमध्ये देशातील तरुण शांततापूर्ण निदर्शने करण्यासाठी एकत्र आले होते. त्यांच्या मनात प्रेम होते; द्वेष किंवा राग नव्हता. तरीही, पोलीस आणि भाजपच्या गुंडांनी त्यांना मारहाण केली. हे ते भारतवर्ष नाही जे आम्हाला अपेक्षित आहे. उद्या, आम्ही भारतीय म्हणून सर्वोच्च न्यायालयाकडे कूच करू—पक्ष, लिंग, जात, समुदाय आणि राज्य या पलीकडे जाऊन एकजुटीने. तरुण, सर्व विरोधी पक्ष, नागरी समाज संघटना आणि लोकशाहीवर व भारताच्या संविधानावर विश्वास ठेवणारे सर्वजण आमच्यासोबत चालतील.”

Yesterday, the nation’s young came out in Delhi to peacefully protest. They came with love in their hearts, not hatred or anger. They were beaten, both by cops and BJP goons. This is not the India we want. Tomorrow, we will march to the Supreme Court as Indians, united beyond party, gender, caste, community and state. Youth, all opposition parties, civil society groups, all those who believe in democracy and stand by the Constitution of India, will walk with us. We will submit a memorandum to the Chief Justice on behalf of the nation, demanding an end to vote chori, halting of SIR and the resignation of Gyanesh Kumar. Narendra Modi, Amit Shah, Ajit Doval and Mohan Bhagwat cannot silence India’s voice. These cowards cannot intimidate us. They will have to step aside. We will march together, with love, brotherhood and patriotism. Daro mat. Tomorrow, all of India will march to the Supreme Court. कल दिल्ली में देश का युवा शांतिपूर्ण विरोध के लिए सड़कों पर उतरा। उनके दिलों में नफ़रत या गुस्सा नहीं, मोहब्बत थी। लेकिन उन्हें पुलिस और BJP के गुंडों, दोनों ने पीटा। ऐसा भारत हम नहीं चाहते। कल, सोमवार 12 अक्टूबर को, हम भारतीय होने के नाते सुप्रीम कोर्ट तक मार्च करेंगे। पार्टी, महिला-पुरुष, जाति, समुदाय और राज्य की हर दीवार से ऊपर उठकर, हम सब एक साथ चलेंगे। देश का युवा, तमाम विपक्षी दल, सिविल सोसाइटी और लोकतंत्र में विश्वास रखने वाले, भारत के संविधान के साथ खड़े सभी लोग हमारे साथ चलेंगे। हम देश की ओर से मुख्य न्यायाधीश को एक ज्ञापन सौंपेंगे। हमारी माँग है – वोट चोरी बंद हो, SIR पर रोक लगे और ज्ञानेश कुमार इस्तीफ़ा दें। नरेंद्र मोदी, अमित शाह, अजित डोभाल और मोहन भागवत भारत की आवाज़ को दबा नहीं सकते। ये कायर हमें डरा नहीं सकते। इन्हें पीछे हटना ही होगा।
हम सब साथ चलेंगे – मोहब्बत, भाईचारे और देशभक्ति के साथ।
डरो मत। कल पूरा भारत सुप्रीम कोर्ट तक मार्च करेगा। #ChaloDilli — Rahul Gandhi (@RahulGandhi) October 11, 2026

“आम्ही देशाच्या वतीने सरन्यायाधीशांना एक निवेदन सादर करू, ज्यामध्ये ‘मतांची चोरी’ थांबवणे, एसआयआर (SIR) रद्द करणे आणि ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा या मागण्या केल्या जातील. नरेंद्र मोदी, अमित शहा, अजित डोवाल आणि मोहन भागवत भारताचा आवाज दाबू शकत नाहीत. हे भित्रे लोक आम्हाला घाबरवू शकत नाहीत. त्यांना बाजूला व्हावेच लागेल. आम्ही प्रेम, बंधुभाव आणि देशभक्तीच्या भावनेसह एकत्र कूच करू. घाबरू नका. उद्या, संपूर्ण भारत सर्वोच्च न्यायालयाकडे कूच करेल.”

आंदोलनाला नवे वळण मिळण्याची शक्यता

इंडिया आघाडीच्या या मोर्चामुळे ज्ञानेश कुमार यांच्या विरोधातील आंदोलनाला नवे वळण मिळण्याची शक्यता आहे. मात्र, मोर्चाचा मार्ग, सहभागी होणाऱ्या नेत्यांची संख्या आणि प्रत्यक्ष कार्यक्रमाचे तपशील याबाबत अधिकृत घोषणांमधील माहिती महत्त्वाची ठरणार आहे.

या मोर्चात कोणते नेते सहभागी होणार, सरन्यायाधीशांना निवेदन स्वीकारण्यासाठी भेट मिळणार का आणि विरोधकांच्या मागण्यांवर पुढे काय घडणार, याकडे लक्ष लागले आहे. आंदोलनाच्या पुढील टप्प्यामुळे निवडणूक आयोग, SIR प्रक्रिया आणि मतदार यादीतील कथित अनियमिततेचा मुद्दा पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी येण्याची शक्यता आहे.

CJP Mumbai Protest : आंदोलकांची धरपकड सुरूच! शिवाजी पार्क परिसरात पोलिसांची फिल्डिंग, दंगली भडकवण्याचा पोलिसांचा डाव? मनसेचा आरोप

Web Title: Rahul gandhi supreme court march october 12 gyanesh kumar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 11, 2026 | 09:03 PM

Topics:  

  • Gyanesh Kumar
  • INDIA Alliance
  • Rahul Gandhi

संबंधित बातम्या

CJP Protest Mumbai : मुंबईत CJP आंदोलनावरून राडा! आदित्य-तेजस ठाकरे आंदोलनात उतरले, ‘महाराष्ट्र बंद’चा इशारा
1

CJP Protest Mumbai : मुंबईत CJP आंदोलनावरून राडा! आदित्य-तेजस ठाकरे आंदोलनात उतरले, ‘महाराष्ट्र बंद’चा इशारा

Aditya Thackeray : ‘भाजप विरुद्ध भारत’! आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल, मुंबईतील SIR आंदोलनावरून राजकारण तापलं
2

Aditya Thackeray : ‘भाजप विरुद्ध भारत’! आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल, मुंबईतील SIR आंदोलनावरून राजकारण तापलं

SIR आंदोलनात आता सोनम वांगचुक यांची एंट्री! उद्यापर्यंत नेत्यांना सोडलं नाही तर… सरकारला दिला मोठा इशारा
3

SIR आंदोलनात आता सोनम वांगचुक यांची एंट्री! उद्यापर्यंत नेत्यांना सोडलं नाही तर… सरकारला दिला मोठा इशारा

ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक! CJP, काँग्रेसनंतर आता मनसेही मैदानात, SIR विरोधात ठरवला मोठा प्लॅन
4

ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक! CJP, काँग्रेसनंतर आता मनसेही मैदानात, SIR विरोधात ठरवला मोठा प्लॅन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.