Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Assam Election 2026 : हिमंत बिस्वा सरमा देशातील सर्वात भ्रष्टाचारी मुख्यमंत्री; आसाममधून राहुल गांधींचा आक्रमक पवित्रा

Rahul Gandhi Assam 2026 : आसाम विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी हे आसाम दौऱ्यावर गेले आहेत. यावेळी भाजप नेते आणि मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यावर निशाणा साधला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Apr 05, 2026 | 02:40 PM
Rahul Gandhi Targets Assam CM Himanta Biswa Sarma at Assam Assembly Elections 2026

Rahul Gandhi Targets Assam CM Himanta Biswa Sarma at Assam Assembly Elections 2026

Follow Us
Close
Follow Us:
  • आसाममध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी
  • काँग्रेस नेते राहुल गांधी आसाम दौऱ्यावर
  • हिमंत बिस्वा सरमा यांच्यावर सर्वात भ्रष्टाचारी मुख्यमंत्री म्हणत टीका
Assam Election 2026 : विश्वनाथ : आसाममध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. प्रचाराचा वेग वाढला असून भाजप आणि काँग्रेसमध्ये राजकीय वाद पेटला आहे. आसाममध्ये (Assam News) पंतप्रधान नरेंद्र आणि अमित शाह यांनी देखील प्रचार सभा घेत विजयाचा विश्वास व्यक्त केला. यानंतर आता लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आसाम दौरा केला आहे. यामुळे आसामच्या राजकीय वर्तुळामध्ये वातावऱण तापले आहे. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी भाजप सरकार आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. सरमा हे देशातील सर्वात भ्रष्टाचारी मुख्यमंत्री असल्याची टीका राहुल गांधींनी केली.

 

 

आसामधील विश्वनाथ जिल्ह्यात राहुल गांधी यांची भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रचार करताना त्यांनी हिमंत बिस्वा सरमा यांना धारेवर धरले. ते मुख्यमंत्र्यांना भारताचे “सर्वात भ्रष्ट मुख्यमंत्री” म्हटले आणि सरमा यांनी आपल्या जवळच्या सहकाऱ्यांना फायदा मिळवून देण्यासाठी शासकीय संसाधनांचा गैरवापर करत असल्याचा आरोप राहुल गांधींनी केला. राहुल गांधी म्हणाले की, “मुख्यमंत्र्यांच्या वक्तृत्वातून त्यांची निराशा आणि भविष्याबद्दलची चिंता दिसून येते. त्यांनी मुख्यमंत्र्यांवर द्वेष पसरवण्याचा आणि आसामची संस्कृती व बंधुत्वाला हानी पोहोचवण्याचाही आरोप केला.

हे देखील वाचा : सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय! ३२ वर्षांनंतर जोडप्याला घटस्फोट, एकाच दिवशी ६१ खटले निकाली

राहुल गांधी यांनी आपल्या ‘बब्बर शेर’ या वाक्प्रचाराचा वापर करत म्हणाले की, गौरव गोगोई यांच्यासारखे काँग्रेस नेते त्यांना तुरुंगात पाठवायला तयार आहेत आणि जेव्हा काँग्रेस सरकार सत्तेवर येईल, तेव्हा त्यांना जनतेची आणि नेत्यांची माफी मागावी लागेल.

LIVE: Public Meeting | Biswanath, Assam https://t.co/L0BFWNZZHS — Rahul Gandhi (@RahulGandhi) April 5, 2026

आसामचा कारभार दिल्लीतून

राहुल गांधी यांनी आसामचा कारभार पूर्णपणे दिल्लीतून चालत असल्याची टीका केली. ते म्हणाले की, नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या भ्रष्टाचाराची संपूर्ण माहिती आहे. आसामचा कारभार दिल्लीतून चालवला जात आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शाह जे सांगतात, तेच हिमंता करतात. हिमंता बिस्वा सरमा यांनी आपल्या संपूर्ण कुटुंबाला भ्रष्टाचारात गोवले आहे, ज्यामुळे आता तेही यात गोवले जातील. कायदेशीर कारवाईतून कोणालाही सोडले जाणार नाही, असा इशारा राहुल गांधींनी दिला.

हे देखील वाचा : मोठा धोका टळला! डोवाल यांना मारण्याचा रचला कट? पाक दहशतवाद्याकडून ट्रेनिंग घेणाऱ्या ४ जणांना अटक

राहुल गांधी काय म्हणाले?

राहुल गांधी यांनी आरोप केला की, आसाम सरकार द्वेषपूर्ण राजकारण करून बेरोजगारी आणि महागाई यांसारख्या खऱ्या समस्यांवरून लक्ष विचलित करत आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडी भाजपचा बालेकिल्ला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत आहे. आसाम बदलाची लाट नव्हे, तर वादळ अनुभवत आहे आणि जर भाजप सरकार पडले, तर मुख्यमंत्र्यांना त्यांच्या प्रत्येक कृतीचे उत्तर द्यावे लागेल. सभेतील प्रचंड गर्दीमुळे काँग्रेसचे मनोधैर्य वाढले असून काँग्रेस नेत्यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे.

Web Title: Rahul gandhi targets assam cm himanta biswa sarma at assam assembly elections 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 05, 2026 | 02:40 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.