मोठा धोका टळला! डोवाल यांना मारण्याचा रचला कट? पाक दहशतवाद्याकडून ट्रेनिंग घेणाऱ्या ४ जणांना अटक (फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
डोभाल यांची माहिती गोळा करण्याचे काम
एटीएसने अटक केलेल्या ४ संशयितांनी चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे केले. चौकशीत उघड झाले की, पाकिस्तानमध्ये बसलेल्या अबू बकरने त्यांना भारतातील गुप्तचर संस्था तसेच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्यासह अनेक महत्वाच्या वयवत्तींविषयी माहिती गोळा करण्याची जबाबदारी दिली होती. आरोपीच्या मोबाईलच्या सर्व हिस्ट्रीमध्ये अनेक महत्त्वाच्या व्यक्तीची नावे आणि संवेदनशील कीवर्ड आढळले आहेत.
बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण
पाकिस्तानातील अबू बकरशी संबंधित आणि स्लीपर मॉड्यूलप्रमाणे काम करणाऱ्या पश्चिम उत्तर प्रदेशातील या ४ संशयितांनी मोठा कट रचला होता. ते टाईम बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण घेत होते. देशातील अनेक मॉल्स आणि इमारतीमध्ये साखळी स्फोट घडवण्याची त्यांची योजना होती. तसेच केमिकल बॉम्बद्वारे मॉलव्या पार्किंगमध्ये आग लावण्याचीही योजना होती. रेल्वे सिग्नल बॉक्स उडवून रेल्वे अपघात घडवण्याचाही कट होता.
डेटा आणि सर्च हिस्ट्री डिलीट
या कामासाठी ते अनेक वेळा दिल्लीलाही गेले होते, अटकेदरम्यान आरोपीनी मोबाईलमचील डेटा आणि सर्व हिस्ट्री डिलीट केली होती; मात्र फॉरेन्सिक टीमने तो डेटा पुन्हा मिळवला. सुरुवातीला एटीएसने अरयाबला अटक केली, त्यावेळी साकिबला याची माहिती मिळाली आणि त्याने तत्काळ मोबाईल फॉरमेंट करून सर्व हिस्ट्री व जुनी चेंट डिलीट केली. नंतर एटीएसने साकिबला अटक करून मोबाईलची तपासणी केली आणि फॉरेन्सिक टीमने डेटा रिकव्हर केला, त्यातून आरोपी संवेदनशील माहिती गोळा करत असल्याचे सष्ट झाले.
हिंद महासागर क्षेत्राच्या सुरक्षेवर मंथन; नवी दिल्लीत अजित डोवाल यांच्या अध्यक्षतेखाली ‘CSC’ ची बैठक
डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.






