Raja Raghuvanshi's brother demands Sonam's narco test
इंदूर : मेघालयात हनिमूनसाठी गेलेल्या पतीची पत्नीनेच हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. मागील अनेक दिवसांपासून सोनम आणि राजा रघुवंशी हे चर्चेमध्ये आहेत. इंदूरचे असणारे दोघे हनिमूनसाठी गेले होते. सोनमने भाड्याने हत्यारे घेऊन राजाचा मर्डर केला. या प्रकरणाचा मेघालय पोलिसांनी अवघ्या आठ दिवसांमध्ये छडा लावला. या घटनेची देशभर चर्चा असताना आता राजा रघुवंशीच्या भावाने पोलिसांकडे मोठी मागणी केली आहे.
हत्या झालेल्या राजा रघुवंशी यांच्या इंदूरच्या वाहतूक व्यावसायिक मोठ्या भावाने शुक्रवारी मोठी मागणी केली आहे. या हत्येचे संपूर्ण सत्य उघड करण्यासाठी दोन मुख्य आरोपी – सोनम आणि राज कुशवाह – यांची नार्को चाचणी करावी अशी मागणी केली आहे. राजा रघुवंशी (वय वर्षे २९) यांच्या हत्येप्रकरणी कथित सहभाग असल्याच्या आरोपाखाली राजा रघुवंशी यांची पत्नी सोनम (२५) आणि तिचा कथित प्रियकर राज कुशवाह (२०) यांच्यासह पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
सोनमवर कुशवाह आणि त्याच्या तीन मित्रांच्या मदतीने तिच्या पतीला संपवण्याचा आरोप आहे. देशात चर्चेचा केंद्रबिंदू ठरलेल्या या खून प्रकरणातील पाचही आरोपी सध्या मेघालय पोलिसांच्या ताब्यात आहेत आणि त्यांच्या चौकशीतून या घटनेचे दुवे शोधले जात आहेत.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मृत राजा रघुवंशीचा भाऊ म्हणाले की, “मेघालय पोलिसांनी सोनम आणि कुशवाह यांची नार्को चाचणी करावी अशी आमची इच्छा आहे जेणेकरून माझ्या भावाच्या हत्येमागील संपूर्ण सत्य बाहेर येईल,” असे राजा रघुवंशी यांचे मोठे भाऊ सचिन रघुवंशी यांनी इंदूरमध्ये पीटीआयला सांगितले. सचिन म्हणाले की, मेघालय पोलिसांनी सोनम आणि कुशवाह यांच्या चौकशीबाबत आलेल्या अहवालांवरून आम्हाला वाटते की दोघेही संगनमताने काम करत आहेत आणि एकमेकांना या गुन्ह्याचा सूत्रधार (मुख्य सूत्रधार) म्हणून संबोधून तपासकर्त्यांची दिशाभूल करत आहेत. त्यांनी असा दावा केला की सोनम आणि कुशवाहा त्यांच्या भावाच्या हत्येचा कट स्वतःहून राबवू शकत नव्हते. सचिन म्हणाला की, मला वाटते की या हत्येत आणखी काही लोक सामील आहेत जे अजूनही मेघालय पोलिसांच्या आवाक्याबाहेर आहेत. सोनम आणि कुशवाह यांच्या नार्को टेस्टमधूनही या लोकांची नावे उघड होऊ शकतात.
राजा रघुवंशीच्या भावाने हत्येची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आणि असा संशय व्यक्त केला की महिलेच्या कुटुंबाला, विशेषतः तिच्या आईला, सोनम आणि कुशवाहाच्या कथित जवळच्या संबंधांची आधीच माहिती होती, परंतु तरीही, कुटुंबाच्या दबावाखाली सोनमला राजाशी लग्न करण्यास भाग पाडले गेले. राजा रघुवंशी हत्या प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवावा आणि दोषी आढळणाऱ्यांना ‘दुहेरी जन्मठेपेची’ शिक्षा सुनावली जावी अशी मागणीही त्यांनी केली.
अहमदाबादमधील विमान अपघाताच्या अपडेट जाणून घ्या
मेघालयच्या पूर्व खासी हिल्स जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक विवेक सयाम यांनी गुरुवारी पीटीआयला सांगितले होते की, ११ मे रोजी सोनमसोबत लग्न होण्यापूर्वीच इंदूरमध्ये राजाच्या हत्येचा कट रचण्यात आला होता. त्याचा ‘मास्टरमाइंड’ कुशवाह आहे, तर सोनमने या कटाला सहमती दर्शवली होती. राजा रघुवंशी हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेले इतर तीन आरोपी – विशाल चौहान, आकाश राजपूत आणि आनंद कुर्मी – सुरुवातीला “भाड्याने घेतलेले मारेकरी” असल्याचा संशय होता, परंतु मेघालय पोलिस आता त्यांना कुशवाहाचे मित्र म्हणून वर्णन करत आहेत.