Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

धक्कादायक ! नगरसेवकाच्या वाहनचालकाचे फिल्मी स्टाईल अपहरण; तोंड दाबून गाडीत कोंबलं अन् नंतर…

डोळ्याजवळ जोरदार प्रहार करण्यात आला. सुदैवाने डोळा बचावला असला तरी डोळ्याच्या बाजूला व कानाच्या खाली गंभीर दुखापत झाली आहे. जखमी फैजान कर्जीकर सध्या कामथे उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 07, 2026 | 11:27 AM
गाडीत कोंबून दिव्यांगाचे फिल्मी स्टाईल अपहरण

गाडीत कोंबून दिव्यांगाचे फिल्मी स्टाईल अपहरण

Follow Us
Follow Us:

चिपळूण : शहरातील नगरसेवक साजिद सरगुरोह यांच्या चालकाचे तोंड दाबून गाडीत कोंबून अपहरण करण्यात आले. यातच वाहनचालकाला गाडीतच अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. प्रेमविवाहाच्या वादातून पत्नीच्या नातेवाईकांनी हा प्रकार केल्याचा आरोप जखमी दिव्यांग युवकाने केला आहे. याप्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नगरसेवक साजिद सरगुरोह यांचे चालक फैजान कर्जीकर (मजरे काशी, चिपळूण) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ते सोमवारी कामावर जात असताना मागून आलेल्या कारमधून तिघेजण उतरले. त्यांनी फैजान यांचे तोंड दाबून जबरदस्तीने गाडीत कोंबले व गाडी गुहागर बायपासमार्गे वेगाने नेली. काही अंतरावर गेल्यानंतर गाडीतच त्यांना मारहाण करण्यास सुरुवात झाली. गाडी मुंबई-गोवा महामार्गावरून वालोपे-कळंबस्ते मार्गे चिरणी रस्त्याने लोटेपर्यंत नेण्यात आली. यादरम्यान सतत मारहाण करण्यात आली. एका टप्प्यावर एका महिलेने गाडीत येऊन शिवीगाळ करत मारहाण केली.

हेदेखील वाचा : Mumbai Crime News : मुंबई लोकलमधील ‘सिरियल’ चेन स्नॅचरला बेड्या; विकलांग डब्याचा वापर करून महिलांना लुटणारा सराईत चोरटा जेरबंद

डोळ्याजवळ जोरदार प्रहार करण्यात आला. सुदैवाने डोळा बचावला असला तरी डोळ्याच्या बाजूला व कानाच्या खाली गंभीर दुखापत झाली आहे. जखमी फैजान कर्जीकर सध्या कामथे उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत असून, ते मानसिकदृष्ट्या भयभीत असल्याचे सांगितले जात आहे. फैजान कर्जीकर यांनी जानेवारी महिन्यात कोर्ट मॅरेज केले होते. या विवाहाला पत्नीच्या नातेवाईकांचा विरोध होता. पत्नीला सोडण्याचा दबाव टाकण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. याप्रकरणी चिपळूण पोलिस ठाण्यात ताबिश पेचकर, समीर पेचकर, मुस्कान दलवाई (गोवळकोट रोड) व अमान नाडकर (खेड) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

खोटे कबुलीजबाब देण्यास भाग पाडले

दरम्यान, आरोपींनी ‘आम्ही सांगतो तसे बोल, अन्यथा जाळून ठार मारू’, अशी धमकी देत त्यांचा जबरदस्तीने व्हिडिओ तयार केला. त्या व्हिडिओमध्ये ‘मी पत्नीला जबरदस्तीने पळवून नेले, अत्याचार केले व जबरदस्तीने लग्न केले’ असे खोटे कबुलीजबाब देण्यास भाग पाडल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.

कागदपत्रांवर सही करण्यासाठी दबाव

काही कागदपत्रांवर सही करण्यासाठी दबाव आणण्यात आला; मात्र, त्यांनी सही करण्यास नकार दिला. ही गाडी चिपळूणमधील एका कार्यालयात आणण्यात आली होती. दरम्यान नगरसेवक साजिद सरगुरोह व फैजान यांचे नातेवाईक पोलिसांत तक्रार देण्यासाठी धावले. ही माहिती मिळताच आरोपींनी फैजान यांना सोडून पलायन केल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे.

Web Title: Film style kidnapping of corporator driver

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 07, 2026 | 11:27 AM

Topics:  

  • Chiplun
  • crime news

संबंधित बातम्या

जुन्या वादातून तरुणावर प्राणघातक हल्ला, कुकरीने डोक्यावर वार; दापोडीतील घटनेनं खळबळ
1

जुन्या वादातून तरुणावर प्राणघातक हल्ला, कुकरीने डोक्यावर वार; दापोडीतील घटनेनं खळबळ

Pune Crime: अवघ्या थुंकण्यावरून वाद टोकाला; मुंढव्यात लोखंडी हत्याराने दोघांवर हल्ला
2

Pune Crime: अवघ्या थुंकण्यावरून वाद टोकाला; मुंढव्यात लोखंडी हत्याराने दोघांवर हल्ला

तोतया इंजिनीअरचा तरुणीवर अत्याचार, लग्नासाठी एक अट घातली अन्…; वसईतील संतापजनक प्रकार
3

तोतया इंजिनीअरचा तरुणीवर अत्याचार, लग्नासाठी एक अट घातली अन्…; वसईतील संतापजनक प्रकार

लोणीतील खुनाच्या प्रयत्नाचा लावला छडा, मुख्य आरोपी जेरबंद! सात साथीदार निष्पन्न
4

लोणीतील खुनाच्या प्रयत्नाचा लावला छडा, मुख्य आरोपी जेरबंद! सात साथीदार निष्पन्न

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.