Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rising Education Cost in India: शिक्षण घेणे झाले महाग! फक्त शाळा-कॉलेजची फी नव्हे, तर ‘या’ खर्चांमुळे पालकांचे बजेट कोलमडणार

पूर्वी मुलांना चांगल्या शाळेत प्रवेश मिळाला आणि फी भरली की शिक्षणाच्या मोठा खर्च संपला, असे अनेकांना वाटायचे, पण आता चित्र पूर्णपणे बदलले आहे. शाळेच्या फीबरोबरच कोचिंग क्लास, प्रवास, गणवेश पुस्तके, प्रोजेक्ट, डिजिटल साधने आणि पुढे महाविद्यालयाचा खर्च यामुळे पालकांच्या खिशावर मोठा ताण येत आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Jul 20, 2026 | 03:33 PM
खासगी शाळांतील पदांसाठी कमाल वयोमर्यादा लागू नाही

खासगी शाळांतील पदांसाठी कमाल वयोमर्यादा लागू नाही

Follow Us
Follow Us:
  • सरकारी शाळांमध्ये शिक्षणाचा खर्च तुलनेत कमी
  • पालकांसमोर आणखीन एक मोठे आव्हान
  • थेट परिणाम घराच्या आर्थिक नियोजनावर
 

Rising Education Cost in India: शिक्षण हा खर्च नसून भविष्यातील गुंतवणूक आहे, अशी भावना भारतीय कुटुंबांमध्ये कायम दिसून येते. अनेक पालक स्वत:च्या गरजा कमी करतात, पण मुलांच्या शिक्षणात कोणतीही कमतरता राहू देत नाहीत. मात्र वाढत्या महागाईसोबत शिक्षण क्षेत्रातील खर्चही वेगाने वाढत असल्याने अनेक कुटुंबांचे मासिक बजेट विस्कळीत होत आहे.

सरकारी शाळांमध्ये शिक्षणाचा खर्च तुलनेत कमी

सरकारी आणि खासगी शाळांमधील खर्चातही मोठी तफावत दिसून येते. सरकारी शाळांमध्ये शिक्षणाचा खर्च तुलनेने कमी असला तरी खासगी शाळांमध्ये फी विविध उपक्रमांचे शुल्क आणि इतर आकारणीमुळे वार्षिक खर्च अनेक पटींनी वाढतो. याशिवाय वह्या, पुस्तके, शालेय साहित्य आणि प्रवासासाठी वेगळी रक्कम खर्च करावी लागते.

पालकांसमोर आणखीन एक मोठे आव्हान

शहरांमध्ये राहणाऱ्या पालकांसमोर आणखी एक मोठे आव्हान म्हणजे कोचिंग क्लास. आज अनेक विद्यार्थी शाळेतील शिक्षणासोबत वेगळे शिकवणी वर्गही लावतात. स्पर्धा अतिरिक्त मार्गदर्शन घेणे अनेकांसाठी गरजेचे झाले आहे. त्यामुळे वर्षभरात केवळ कोचिंगवरच हजारो रुपये खर्च होतात. ग्रामीण भागातही हा कल वेगाने वाढताना दिसत आहे.

थेट परिणाम घराच्या आर्थिक नियोजनावर

शिक्षणाचा खर्च फीपुरता मर्यादित राहिलेला नाही. अनेक शाळा क्रीडा स्पर्धा, सहली, सांस्कृतिक कार्यक्रम, प्रयोगशाळा, विकास निधी आणि इतर उपक्रमांसाठी स्वतंत्र्य शुल्क आकारतात. त्यामुळे सुरुवातीला ठरवलेला खर्च वर्षभरात मोठ्या प्रमाणात वाढतो. याचा थेट परिणाम घराच्या आर्थिक नियोजनावर होतो.

“बापाचा माल आहे का?” CJP आंदोलनावरून भाजप नेत्याची मुक्ताफळे, ‘दिपके आणि ठिपके यांच्या कृपेने मोदीजी..’

विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्ण होत नाही.

तंत्रज्ञानामुळे शिक्षणाची पद्धत बदलली आहे. ऑनलाइन वर्ग, डिजिटल नोट्स, शैक्षणिक अॅप्स, लॅपटॉप, टॅबलेट आणि इंटरनेट याशिवाय आता अनेक विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्ण होत नाही. ही साधने पूर्वी पर्याय होती पण आता ती गरज बनली आहेत. त्यामुळे पालकांना या अतिरिक्त खर्चाचाही विचारा करावा लागतो.

अभ्यासक्रम काही वर्षांनी अधिक महाग

उच्च शिक्षणाचा खर्च तर आणखी मोठा आहे. अभियांत्रिकी, वैद्यकीय, व्यवस्थापन किंवा इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी लाखो रुपयांची आवश्यकता असते. दरवर्षी शुल्क वाढत असल्याने आज परवडणारा अभ्यासक्रम काही वर्षांनी अधिक महाग होऊ शकतो. त्यामुळे शेवटच्या क्षणी निधी उभारण्यापेक्षा आधीपासून बचत सुरू करणे अधिक शहाणपणाचे ठरते.

महागाईप्रमाणे पाहणे योग्य नाही

आर्थिक तज्ज्ञांचे मत आहे की शिक्षणाच्या खर्चाकडे सामान्य महागाईप्रमाणे पाहणे योग्य नाही. या क्षेत्रातील दर इतर खर्चांच्या तुलनेत अधिक वेगाने वाढू शकतात. म्हणूनच मुलांच्या वयानुसार आणि भविष्यातील शिक्षणाचा विचार करून दीर्घकालीन आर्थिक नियोजन करणे आवश्यक आहे.

CJP Protest : ‘संसद उखडून टाकू, नेपाळ बनवू’च्या घोषणांनी खळबळ; CJP आंदोलनात ‘विंचू’ घुसल्याचा दावा

छोटी बचत उद्या मोठ्या खर्चाची चिंता कमी

मुलांना चांगले शिक्षण देणे हे प्रत्येक पालकाचे स्वप्न असते. मात्र त्या स्वप्नाला आर्थिक आधार देण्यासाठी वेळेवर नियोजन करणे तितकेच महत्त्वाचे आहे. आज केलेली छोटी बचत उद्या मोठ्या खर्चाची चिंता कमी करू शकते. त्यामुळे शिक्षणाच्या वाढत्या खर्चाकडे दुर्लक्ष न करता त्यासाठी आतापासून तयारी करणे हाच सर्वात योग्य मार्ग ठरू शकतो.

Web Title: Rising cost of school coaching and college education in india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 20, 2026 | 03:33 PM

Topics:  

  • bmc school
  • College
  • tips for parenting

संबंधित बातम्या

राष्ट्रीय क्रिडा दिनानिमित्त गोयनका महाविद्यालयात विविध स्पर्धांचे आयोजन! मैदान गाजवणाऱ्या विजेत्या खेळाडूंचा गौरव
1

राष्ट्रीय क्रिडा दिनानिमित्त गोयनका महाविद्यालयात विविध स्पर्धांचे आयोजन! मैदान गाजवणाऱ्या विजेत्या खेळाडूंचा गौरव

Management Quota Admission 2026-27: मॅनेजमेंट कोट्यात मनमानीला ब्रेक! CET सेलची करडी नजर, नेमकं प्रकरण काय?
2

Management Quota Admission 2026-27: मॅनेजमेंट कोट्यात मनमानीला ब्रेक! CET सेलची करडी नजर, नेमकं प्रकरण काय?

Satara YC College : सातारा YC कॉलेजमध्ये विद्यार्थिनीच्या आत्महत्येने खळबळ; रॅगिंगचा आरोप प्राचार्यांनी फेटाळला
3

Satara YC College : सातारा YC कॉलेजमध्ये विद्यार्थिनीच्या आत्महत्येने खळबळ; रॅगिंगचा आरोप प्राचार्यांनी फेटाळला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.