
Parenting Tips (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
पूर्वी लहान मुलं म्हटलं की शिस्त, आदर आणि संयम हे आलंच. पण आजकाल चित्र पूर्ण बदललंय. छोटं लेकरू पण पटकन रागावतं, चिडचिड करतं, वस्तू फेकून देतं, ओरडतात. एखादी गोष्ट नाही मिळाली की लगेच रडून गोंधळ घालतात. Parenting Tips:
हा प्रॉब्लेम एका घरातला नसून जवळपास सगळ्याच घरात पाहायला मिळतो, पण कधी विचार केलाय का? असं का होतं मुलं एवढ्या लवकर का चिडतात किंवा रागवतात. त्यांना कसं शांत करायचं चला पाहूयात..
आजकाल आई-वडील दोघेही कामात असतात. दिवसभर ऑफिसचा ताण, घरी आल्यावर पण मोबाईल, टीव्ही. मुलाशी बोलायलाच वेळ नाही. मुलाला वाटतं माझ्याकडे कोणी लक्षच देत नाहीये. मग ते आपली निराशा रागातून दाखवतात. त्यांना फक्त तुमचा वेळ हवा असतो, महागडं खेळणं देण्याऐवजी त्यांच्यासोबत बोला तुझा दिवस कसा गेला? काय केलसं दिवसभर हे विचारा.. ते काय बोलतात हे ऐका..
हेच सगळ्यात मोठं कारण आहे. मुलं तासनतास मोबाईलवर गेम खेळतात, रील्स पाहतात, टीव्ही पाहतात. यामुळे त्यांच्या मेंदूवर परिणाम होतो. त्यांचं लक्ष लागत नाही, अभ्यासात मन लागत नाही आणि छोट्या छोट्या गोष्टीवरून राग येतो. डॉक्टर पण सांगतात, जास्त स्क्रीन टाइममुळे मुलं चिडचिडी होतात. त्यांचा स्क्रीन टाइम कमी करा.
आधीची मुलं दिवसभर मैदानात खेळायची. पळायची, धावायची, घाम गाळायची. त्यामुळे शरीरातली सगळी एनर्जी बाहेर पडायची आणि मन शांत राहायचं. पण आताची मुलं घरातच बसतात. मोबाईल, व्हिडिओ गेम यातच दिवस जातो. शरीराची हालचाल होत नाही. एनर्जी आतच साचून राहते आणि मग ती रागाच्या रूपात बाहेर येते. त्यांना रोज बाहेर खेळायला पाठवा, सायकल चालवू द्या, मैदानात पळू द्या.
आपण मुलांना काय खायला देतो? कुरकुरे, चिप्स, बर्गर, पिझ्झा, कोल्ड्रिंक्स, खूप गोड पदार्थ. या जंक फूडमुळे मुलांच्या शरीरात थकवा येतो आणि स्वभाव चिडचिडा होतो. चांगलं पौष्टिक जेवण, हिरव्या भाज्या, फळं, डाळ-भात हे कमीच झालंय. जर आहार चांगला असेल तर मन पण शांत राहतं. त्यांच्या डब्यात हेल्दी पदार्थ द्यायला सुरुवात करा.
राग ही काही वाईट गोष्ट नाही, ती एक भावना आहे. मुलाला राग आलाय म्हणजे त्याच्या मनात काहीतरी खटकतंय. पण आपण काय करतो? लगेच ओरडतो, “गप्प बस, रागवायचं नाही”. असं केल्याने मूल अजूनच चिडतं. त्याला समजून घ्या. त्याला विचारा, “काय झालं बाळा, का राग आलाय तुला?” त्याचं म्हणणं शांतपणे ऐका. त्याला समजवा की राग आला तर मारायचं नाही, ओरडायचं नाही, तर बोलून दाखवायचं.
आपल्या मुलांना मारुन किंवा ओरडून शांत करुन नका. त्यांना तुमचा वेळ द्या. त्यांच्यासोबत रोज थोडावेळा गप्पा मारा, त्यांना मोबाईलपासून लांब ठेवा. बाहेर खेळायला लावा. चांगलं जेवण द्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही स्वतः शांत राहा. कारण मुलं तेच शिकतात जे आई-वडील करतात. तुम्ही जर छोट्या गोष्टीवरून चिडत असाल, तर मूल पण तेच करणार.थोडा वेळ, थोडं प्रेम आणि थोडा संवाद, एवढं दिलं तरी तुमचं मूल नक्कीच शांत आणि समजूतदार होईल.
Ans: पालकांसोबत संवादाचा अभाव, स्क्रीन टाइमचा अतिरेक, शारीरिक हालचालींची कमतरता आणि तणावपूर्ण वातावरण यांसारख्या कारणांमुळे मुलांमध्ये चिडचिड वाढू शकते.
Ans: अतिप्रमाणात स्क्रीन वापरल्याने मुलांच्या झोपेवर, एकाग्रतेवर आणि भावनिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे स्क्रीन टाइम मर्यादित ठेवणे महत्त्वाचे आहे.
Ans: मुलांचे म्हणणे शांतपणे ऐकावे, त्यांच्यासोबत वेळ घालवावा, त्यांच्या भावना समजून घ्याव्यात आणि राग व्यक्त करण्याचे योग्य मार्ग शिकवावेत.