RSS@100: राष्ट्रहित से राष्ट्रनिर्माण! संघाचा शताब्दी समारंभ; सरसंघचालक काय संदेश देणार? रेशीमबागेत जय्यत तयारी
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्षे पूर्ण
आज देशभरात साजरा होणार विजयादशमी उत्सव
नागपूरच्या रेशमीबागेत जय्यत तयारी
राष्ट्रसर्वप्रथम या तत्वावर काम करणारी जगातील एकमेव संघटना म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. राष्ट्रहित सर्वोपरी म्हणत संघ स्वयंसेवक अनेक ठिकाणी समाजकार्य करताना पाहायला मिळतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला यावर्षी 100 वर्षे पूर्ण झाली आहेत. आज देशभरात संघ विजयादशमी उत्सव साजरा करणार आहे. दरम्यान या दिवशी सरसंघचालक मोहन भागवत काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
यंदाचा विजयादशमीचा उत्सव राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी विशेष आहे. यंदा संघाला 100 वर्षे पूर्ण झाली आहेत. 1925 मध्ये डॉ. केशव बळिराम हेडगेवार यांनी स्थापन केलेल्या संघटनेला 100 वर्षे पूर्ण झाली आहेत. आज सरसंघचालक मोहन भागवत स्वयंसेवकांना काय मार्गदर्शन करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या सोहळ्याला देशाचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपस्थित राहणार आहेत.
विजयादशमीच्या उत्सवानिमित नागपूरमध्ये जय्यत तयारी करण्यात आली आहे. नागपूरमधील रेशीमबाग हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय आहे. याच रेशीमबागेच्या मैदानावर उत्सव होणार आहे. आजपासून संघाचे शताब्दी वर्ष सुरू होणार आहे. 2026 च्या विजयादशमीपर्यंत संघ आपले शताब्दी वर्ष साजरे करणार आहे. या वर्षभरात संघ अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पार केली शंभरी
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) आणि भारतीय जनता पक्ष (भाजप) हे एकमेकांना पूरक मानले जातात. भाजपची स्थापना १९८० मध्ये झाली, परंतु भारतीय जनसंघ (भाजप) आणि हिंदू महासभा (हिंदू महासभा) सारख्या पक्षांनी हिंदुत्वाच्या अजेंड्याची राजकीय धार आधीच यशस्वीरित्या धारदार केली होती. भारतीय जनसंघ (भाजप) १९७७ मध्ये जनता पक्षात विलीन झाला. हे पक्ष आरएसएसपासून वेगळे नाहीत कारण आरएसएस आणि या पक्षांमध्ये दुहेरी सदस्यत्वाची तरतूद आहे. देशातील पहिले बिगर-काँग्रेसी जनता पक्ष सरकारचे पतन देखील दुहेरी सदस्यत्वामुळे झाले. याचे एक कारण म्हणजे जनता पक्षातील बहुतेक पक्ष काँग्रेसवर असंतुष्ट असूनही, हिंदुत्व आणि अतिरेकी राष्ट्रवादाच्या प्रतिमेपासून पूर्णपणे मुक्त होते. या पक्षांनी जनसंघ नेत्यांवर दबाव आणला की जनता पक्षात राहून आरएसएससारख्या संघटनेचे सदस्यत्व अशक्य आहे.
संघ शताब्दीनिमित्त मुस्लीम नेत्याची मोठी मागणी
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे शताब्दी वर्ष साजरे करत असून यानिमित्ताने संघाकडून अनेक कार्यक्रमाचे आय़ोजन करण्यात आले आहे. भाजप नेत्यांकडून देखील मोठ्या उत्साहाने संघाचे 100 वर्षे पूर्ती साजरी केली जात आहे. दरम्यान, संघ शताब्दीच्या निमित्ताने संघ संस्थापक डॉ. केशव बळिराम हेडगेवार यांना भारतरत्न देण्याची मागणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे एका मुस्लीम नेत्याने हेडगेवार यांना मरणोत्तर भारतरत्न देण्यात यावा अशी मागणी केली आहे. यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे.